आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा४५ वर्षांच्या सुंदरी मुंबईत पनवेलमध्ये लोकांच्या घरोघरी जाऊन काम करतात. त्यांच्यावर कर्ज झाले आहे. मुलीचे लग्न झाल्यानंतर आणखी कर्ज होईल, याची त्यांना जाणीव आहे. त्यामुळे इतर पालकांप्रमाणे त्यांनी आपले सोने गहाण ठेवण्याचा निर्णय घेतला. लोकांच्या नजरेपासून दूर २५ वर्षांत त्यांनी ११७ ग्रॅम सोने जमा केले होते. तीच त्यांची बचत होती. १३ जून रोजी त्यांनी सोने एका पाऊचमध्ये पॅक केले आणि ती प्लास्टिकची थैली घेऊन कामावर गेल्या.
दुपारी २ वाजता काम संपल्यावर घराच्या मालकाने त्यांना आणखी एक प्लास्टिकची थैली दिली, त्यात काही वडापाव होते. रस्त्यात एखाद्या गरिबाला दे किंवा प्राण्यांना देण्याचे सांगितले. हो, सांगत त्यांनी ती थैली त्याच पॉलिथिनच्या थैलीत टाकली आणि बँकेकडे निघाल्या. रस्त्यात एक भिकारी महिला दोन मुलांसह दिसली, त्यांना दया आली आणि त्यांनी ती थैली तिला देत वडापाव शिळे असल्याचे सांगितले. १५ मिनिटांनंतर त्या बँकेत पोहोचल्या तेव्हा कळाले सोनं ठेवलेली थैली तर वडापावच्या थैलीतच ठेवली होती. ती थैली त्यांनी त्या भिकारी महिलेच्या मुलाला दिली होती.
त्या पळतच त्यांना शोधायला गेल्या पण तेथे कोणीच सापडले नाही. तेथे कुणाला सांगितले तर लोक सोने शोधून चोरून घेतील, त्यामुळे त्या थेट पोलिस स्टेशनला गेल्या. पोलिसांना सर्व प्रकरण सांगितले. १० मिनिटांच्या आत पोलिस त्या भिकारी महिलेच्या शोधात त्या जागी गेले. रिक्षावाले आणि स्थानिक लोकांच्या मदतीने पोलिसांना त्या भिकारी महिलेचे लोकेशन कळण्यात मदत झाली, तिने काही महिन्यांपूर्वीच आपली जागा बदलली होती. पोलिस नव्या ठिकाणी पोहोचले आणि माहिती काढली, भिकारी महिलेला विचारल्यावर कळाले की, वडापाव शिळे होते म्हणून तिने ती थैली डस्टबिनमध्ये टाकली, आता अधिकाऱ्यांकडे कोणताच पुरावा नव्हता. पोलिसांनी डस्टबिनच्या जवळपासचे फुटेज पाहण्यासाठी सुमारे चार सीसीटीव्ही पाहिले. पहिल्या फुटेजमध्ये थैली दिसली, त्यानंतर पोलिसांनी पुन्हा डस्टबिनला चांगल्या प्रकारे चेक केले. येथे थैली सापडली मात्र त्यात सोन्याचे पाऊच नव्हते. नंतर दुसऱ्या फुटेजमध्ये पाहिले तेव्हा थैली हलताना दिसली, तेव्हा कळाले गटारातील उंदराने थैली ओढली. त्यानंतर संशय उंदरावर गेला आणि पोलिसांनी गटार उघडण्यासाठी मजुरांना बोलावले. साेनं सापडलं, १२ तासांच्या आत सुंदरीला तिचे सोने परत मिळाले.
पोलिसांनाच अशा कामाची संधी मिळते, असे नाही. पुण्याच्या सिटी बसमधील चालक अरुण दसवाडकर आणि कंडक्टर नागनाथ ननवारे यांच्या संवेदनशीलता आणि नोकरीच्या पलीकडे जाऊन त्यांच्या प्रयत्नांचे उदाहरण पाहा. या बुधवारी रात्री ११ वाजता एक महिला आणि तिच्या बाळाला तिच्या पतीने बसमध्ये बसवले. शेवटच्या बस स्टॉपवर महिलेला तिचा दीर घ्यायला येणार होता, पण तो आला नाही. ६०० मीटर दूर त्या महिलेच्या कॉलनीपर्यंत सुनसान रस्ता होता. त्यामुळे बसमधील चालक-वाहकांनी उतरून मदत मागण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी तेथुन जाणारे माजी मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी मदत केली. त्या महिलेला आपल्या गाडीतून घरी सोडले. दोन्ही कर्मचाऱ्यांचा त्यांच्या कामामुळे दुसऱ्या दिवशी सन्मान करण्यात आला.
मॅनेजमेंट गुरू raghu@dbcorp.in एन. रघुरामन
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.