आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा:अडचणींवर उपाय नेहमीच सापडतात!

औरंगाबाद25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेळघाटात अस्वलाचे हल्ले सर्रास होतात, पण जखमींना तातडीने वैद्यकीय मदत पुरवणे ही माखला गावातील लोकांची समस्या आहे, त्यांना कोणत्याही रुग्णालयात पोहोचण्यास दोन तास लागतात. अशा अनेक प्राण्यांचे हल्ले पाहिलेली सपना सावरकर अशा लोकांना मदत करण्यासाठी नेहमीच डॉक्टर बनण्याचा विचार करत असे. अमरावतीच्या डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात तिला पहिल्या फेरीत प्रवेश मिळाल्याने तिचे स्वप्न गेल्या आठवड्यात पूर्ण झाले.

तिला बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांनी लिफ्ट फॉर अपलिफ्टमेंट (एलएफयू) या गटाकडून मोफत एनईईटी कोचिंग मिळाले. हा गट वंचित मुलांना कठीण परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी प्रशिक्षण देतो. अशक्तपणा आल्याने सपनाला दोन महिन्यांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण तिने परीक्षेची तयारी थांबवली नाही. ऑनलाइन क्लासेस आधीच सुरू झाले असले तरी सपना केवळ कठोर परिश्रमच करत नव्हती, तर ५ एकर शेतीत वडिलांना मदतही करत होती. बहुतांश आदिवासी मुले गणित-इंग्रजीत कच्चे असल्याने तब्येतीत थोडी सुधारणा झाल्यानंतर एलएफयूने तिला ऑफलाइन कोचिंगसाठी उस्मानाबादच्या वसतिगृहात हलवले. पीडितांच्या दुरवस्थेने अखेर या मेळघाटातील मुलीला एमबीबीएसची जागा मिळण्याची प्रेरणा मिळाली. सपना ही केवळ एलएफयूची पहिली यशोगाथा नाही, तर ती तिच्या गावातील पहिली डॉक्टर होणार आहे.

सपनाने मला रिचर्ड टुरेरे या मुलाची आठवण करून दिली, त्याने केनियामध्ये पाळीव प्राण्यांचे सिंहापासून संरक्षण करण्यासाठी नवीन शोध लावला होता. त्याला सिंह आवडत असत, पण समस्या अशी होती की, एका आठवड्यात त्याच्या घरातील ९ गायींची शिकार झाली होती. मानव-वन्यजीव संघर्षामुळे रिचर्डच्या समुदायावर खोलवर परिणाम झाला होता. किंटेगेला नैरोबी नॅशनल पार्कच्या अतिक्रमण केलेल्या टाउनशिप्समध्ये अडकलेली ‘समुदायांची जमीन’ आणि वन्यजीव यांच्यामध्ये फक्त एक छोटी नदी आहे. दररोज रात्री जंगली प्राणी-झेब्रा ताज्या चाऱ्यासाठी समुदायाच्या जमिनीवर येत असत, त्यांच्या मागे सिंह येत. दुसरीकडे मानवी संघर्षामुळे शेकडो सिंहांचा मृत्यू झाल्याने केनियाची वन्यजीव सेवा चिंतित होती, २०१८ मध्ये फक्त १७०० सिंह उरले राहिले. सिंहही आवश्यक आहेत, हे जाणून रिचर्डला कायमस्वरूपी उपाय हवा होता. त्याने डरकाळ्यांनी सुरुवात केली, पण दोन दिवसांनी सिंहाने त्याकडे दुर्लक्ष केले, नंतर त्याने गोठ्यात गाय दिसू नये म्हणून गडद रंगाचे शेड केले, तरीही त्याने वासाने गाय ओळखून मारली. एका रात्री तो टॉर्च घेऊन फिरत होता, त्या रात्री सिंह हल्ला करायला आला नाही. रिचर्डला वाटले की, हलणाऱ्या प्रकाशात फरक पडला असेल आणि रात्रभर थांबून लक्ष ठेवण्याऐवजी टॉर्चच्या हलणाऱ्या झोताची काॅपी करायचे ठरवले. त्याचा शोध पूर्ण करण्यासाठी त्याला वेळ लागला. वस्तू तोडून तो इलेक्ट्रॉनिक्स शिकला. हलणारे दिवे समजण्यासाठी आईचा नवीन रेडिओ तोडला. आई वेरोनिका नाराज झाली. पण, कसा तरी तो अचूक हलणारी प्रकाश प्रणाली तयार करण्यात यशस्वी ठरला, त्यामुळे सिंहांना वाटले की काही अंतरावर मानव आहेत. आज त्यांचे तंत्रज्ञान समाजातील शेकडो घरांमध्ये आहे, त्याला ते ‘द लायन लाइट्स सिस्टिम’ म्हणतात, त्यात काही सुधारणांसह नवीन आवृत्त्या आणत आहेत. हा शोध लावला तेव्हा तो फक्त ११ वर्षांचा होता!

फंडा असा ः आपण उपाय काढू शकतो, लोकसमूह हे प्रोटोटाइप म्हणून प्रयत्न आजमावेल, दुसरा मार्ग म्हणजे समस्येचे निराकरण करण्यासाठी स्वतःला समर्पित करणे. दोघेही आपापल्या परीने बरोबर आहेत.

एन. रघुरामन, मॅनेजमेंट गुरू [raghu@dbcorp.in]

बातम्या आणखी आहेत...