आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • There Are Many Jobs, But Workers Are Not Available | Article By Richir Sharma

अर्थव्यवस्था:नोकऱ्या तर खूप आहेत, पण काम करणारे मिळत नाहीत

औरंगाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

फार पूर्वीची नाही, लेखक रोबोट्सच्या वाढीवर पुस्तके लिहीत होते आणि येत्या काळात रोबोट प्रत्येकाच्या नोकऱ्या कशा खातील हे सांगत होते तेव्हाची गोष्ट. ऑटोमेशनमुळे अमेरिकेतील किमान निम्म्या नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात, असा अंदाज होता, पण अलीकडील अहवाल वेगळेच चित्र मांडतात. यंत्रमानव माणसांची जागा घेतील, असे ते म्हणत नाही, तर ते म्हणते की, ते थोडी चपळाई दाखवतील आणि जगाची अर्थव्यवस्था वाचवतील का, कारण कामगारांची कमतरता भासत आहे. आज जगातील बेरोजगारीचा दर ४.५ टक्क्यांवर आला आहे, तो १९८० मध्ये जागतिक विक्रमानंतरचा सर्वात कमी स्तर आहे. महामारीच्या काळात काम सोडून गेलेले लाखो लोक अद्याप परत आलेले नाहीत. त्यामुळे साहेबांची बेचैनी वाढत आहे. १५ ते ६४ वर्षे वयोगटातील काम करणाऱ्या लोकांची लोकसंख्याही कमी होत आहे, तर वृद्ध लोकांची संख्या वाढत असल्याने दबावही अधिक आहे. अनेक दशकांपूर्वी झालेल्या सामाजिक बदलाचा हा उशिरा झालेला परिणाम आहे, त्यामध्ये लोकांनी कुटुंब नियोजनाचे उपाय सुरू केले आणि वैद्यकीय विज्ञानाने लोकांचे सरासरी वय वाढवले होते.

आज जवळपास ४० देशांत हीच परिस्थिती आहे, तिथे कार्यरत लोकसंख्या कमी होत आहे. त्यापैकी अनेक मोठ्या आर्थिक शक्ती आहेत. अमेरिकेतही कमी-अधिक प्रमाणात अशीच परिस्थिती आहे. कामगारांच्या कमतरतेमुळे आर्थिक वाढ मंदावते, त्यामुळे बहुतांश देशांना विकासाच्या मार्गावर राहण्यासाठी अधिकाधिक रोबोट्सची आवश्यकता असते. तंत्रज्ञानाकडे संशयाने पाहणारे इशारे देणे सोडत नाहीत. ते म्हणतात की, आता महामारी संपली आहे, लोक कामावर परततील आणि मग रोबोट्स ओझे बनतील. चीन, जपान, जर्मनी आणि दक्षिण कोरिया हे कामगार टंचाईचा सामना करणाऱ्या देशांमध्ये अव्वल स्थानावर आहेत. या सर्वांमुळे २०३० पर्यंत दरवर्षी कार्यरत लोकसंख्या चार लाखांनी कमी होण्याचा अंदाज आहे. या सर्वांमध्ये रोबोट्सने खूप काम करायला सुरुवात केली आहे आणि नवीन रोबोट्स कामाला लागले आहेत, हा योगायोग नाही. जपानचे उत्पादक दरवर्षी १०,००० कामगारांऐवजी ४०० रोबोट कामावर ठेवत आहेत. चीन रोबोट मार्केटला मोठ्या प्रमाणावर सबसिडी देत ​​आहे. २०३० पर्यंत रोबोट्सचे उत्पादन २० टक्क्यांनी वाढवण्याचे त्याचे लक्ष्य आहे. पण बर्नस्टाइनच्या विश्लेषकांचा अंदाज आहे की, या वेगानेही यंत्रमानव श्रमशक्तीचे सर्व खड्डे भरू शकणार नाहीत. पुढील तीन वर्षांत चीनला ३५ लाख कामगारांची कमतरता भासणार आहे.

तथापि, या समस्येला सामोरे जाण्याचे इतर मार्ग आहेत, उदा. पालकांना त्यांना अधिक मुले जन्माला घालण्यास प्रवृत्त करण्यासाठी बोनस देणे, महिलांना काम करण्यास प्रोत्साहित करणे, स्थलांतरितांचे स्वागत करणे किंवा सेवानिवृत्तीचे वय वाढवणे. मात्र, या सर्व पायऱ्यांना प्रचंड विरोधाला सामोरे जावे लागत आहे. तरीही रोबोट एक विचित्र आणि अस्पष्ट प्रकारची भीती निर्माण करतात. लोक यंत्रे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सबाबत नाॅर्मल झाले नाहीत. हे खरे आहे की, भूतकाळातील इतर नवकल्पनांप्रमाणे रोबोट काही नोकऱ्या खातील आणि काही नोकऱ्या निर्माण करतील. उदा. गॅस इंजिनने घोडागाडीला व्यवसायातून बाहेर काढले, परंतु टॅक्सी चालकांसाठी नवीन नोकऱ्याही निर्माण केल्या. आज अमेरिकेत निर्माण झालेल्या रोजगाराच्या संधींपैकी एकतृतीयांश २५ वर्षांपूर्वी अस्तित्वात नव्हत्या. १९५० पासून भाकीत केले जात होते की, २० वर्षांत कृत्रिम बुद्धिमत्ता सर्वकाही ताब्यात घेईल, परंतु अद्याप तसे झाले नाही. सेल्फ ड्रायव्हिंग वाहनांमुळे ट्रक ड्रायव्हर्स बेरोजगार होतील, असे आपण ऐकत आलो आहोत, पण सध्या फक्त चालकांचीच कमतरता आहे. (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.) रुचिर शर्मा ग्लोबल इन्व्हेस्टर व बेस्टसेलिंग रायटर breakoutnations@gmail.com

बातम्या आणखी आहेत...