आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • There Is A Huge Difference Between Expectation And Reality | Article By Anshuman Tiwari

अर्थात्:अपेक्षा आणि वास्तव यात खूप मोठा फरक असतो

औरंगाबाद6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्हिएतनाम युद्धाच्या वेळी अमेरिकेचे संरक्षणमंत्री रॉबर्ट मॅकनमारा हे जुन्या पिढीतील व्यवस्थापन गुरू होते. ते हार्वर्डचे प्राध्यापक, फोर्डचे अध्यक्ष, याशिवाय जागतिक बँकेचे अध्यक्षही होते. मॅकनमारा यांचा आकडेवारीचा आग्रह होता. एडवर्ड लॅन्सडेल हे व्हिएतनाम युद्धादरम्यान पेंटागॉनचे स्पेशल ऑपरेशनचे प्रमुख होते. ते मानसशास्त्रीय युद्धात निपुण होते. एका बैठकीत मॅकनमारा यांनी व्हिएतनाममध्ये अमेरिकेच्या विजयाच्या शक्यतांची आकडेवारी सादर केली. अमेरिकन सैन्य सर्व प्रकारे वरचढ होते. व्हिएतनामचे झालेले नुकसानही दिसत होते. मॅकनमारा यांनी लॅन्सडेलकडे प्रशंसेच्या अपेक्षित नजरेने पाहिले. लॅन्सडेल यांनी विचार करत सांगितले की, शक्यतांचे आकडे भक्कम असले तरी त्यात एक मोठी कमतरता आहे. व्हिएतनामच्या लोकांच्या भावना कुठे आहेत? हे आव्हान आकडेवारीत कसे सामावून घ्यायचे? अपेक्षा आणि वास्तव यात खूप फरक असतो. भारताच्या इंटरनेट अर्थव्यवस्थेत एकाच वेळी शक्यता आणि विनाशाचा गोंगाट चालू आहे. ६१% मोबाइलधारकांंकडे स्मार्टफोन आहेत, जवळपास ९४ कोटी इंटरनेट वापरकर्ते, १२ कोटींहून अधिक ऑनलाइन ग्राहक, ई-कॉमर्सच्या वाढीमध्ये जगात ९व्या क्रमांकावर, दरवर्षी २.३ ट्रिलियन डाॅलरचे ११० अब्ज यूपीआय व्यवहार... अशाच शक्यतांना भुलून २०१४ आणि २०२२ दरम्यान स्टार्टअप्सना १३१ अब्ज डाॅलरचा निधी मिळाला. १०६ युनिकॉर्न (एक अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त मूल्य) स्टार्टअप बनले. सर्व भारतीय स्टार्टअप्सचे मूल्यांकन ५४० अब्ज डाॅलरपेक्षा जास्त आहे. शेअर बाजारात १८ इंटरनेट कंपन्या नोंदणीकृत आहेत. गेल्या वर्षीपर्यंत असे सांगितले जात होते की, २०३० पर्यंत भारतात १.३ अब्ज लोक इंटरनेट वापरतील. ई-कॉमर्स बाजार सुमारे ४०० अब्ज डाॅलरचा असेल. येत्या आठ वर्षांत ऑनलाइन ग्राहकांची संख्या ३५ कोटींहून अधिक होईल.

मग हा काय गोंधळ आहे? : परंतु, ताज्या मथळ्यांमुळे हृदयाचे ठोके वाढतात. युनिकॉर्न हे बेरोजगारी आणि तोट्याचे उद्योग झाले आहेत. लहान-मोठ्या सर्व स्टार्टअप्समध्ये मोठी नोकरकपात होत आहे. आतापर्यंत २०,००० जणांना गुलाबी स्लिप देण्यात आल्या आहेत. या सप्टेंबरपर्यंत भारतातील स्टार्टअप फंडिंग गेल्या वर्षीच्या तुलनेत ८०% कमी झाली आहे. स्टार्टअप कंपन्या ५,००० ते ७६,००० रु. प्रति मिनिट नुकसान सोसत आहेत. गेल्या २४ महिन्यांत भारतातील प्रत्येक घरात ऑनलाइन शिक्षणाची क्रांती झाली. पण, या क्रांतीचे सुपरहीरो बायजूजने १८ महिने इकडे-तिकडे करत आर्थिक निकाल आणला तेव्हा आढळून आले की, कंपनीला २०२०-२१ मध्ये ४५८८ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे, तो गेल्या वर्षीच्या तुलनेत २० पट अधिक आहे. कपात सुरू झाली आहे. एज्युटेक आणि फिनटेक या गेल्या दोन वर्षांतील मोठ्या यशोगाथा आहेत. आता या दोन्ही क्षेत्रांतील गुंतवणूक कमी होत आहे. नोकऱ्या संपत आहेत. ई-कॉमर्स हा भारतीय इंटरनेट अर्थव्यवस्थेचा एक प्रमुख भाग आहे, परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावर १४% च्या तुलनेत भारतातील एकूण ग्राहक खरेदीपैकी फक्त ५% ऑनलाइन रिटेलचा वाटा आहे. संभाव्यतेच्या आधारावर येथे ३० अब्ज डॉलर्सचे भांडवल गुंतवले गेले आहे. ई-कॉमर्स कंपन्यांच्या एकत्रित मूल्यांकनाने १०० अब्ज डाॅलर ओलांडले आहे. बर्नस्टीनइंटरनॅशनल इन्व्हेस्टमेंट रिसर्च फर्मने सांगितले की, भारतीय बाजारपेठेतील अॅमेझाॅन या सर्वात मोठ्या कंपनीने गेल्या दशकात ६.५ बिलियन डाॅलरची गुंतवणूक करूनही नफा पाहिलेला नाही. तारे जमिनीवर : झोमॅटो, पेटीएम, पॉलिसी बाजार या स्टार्टअप कंपन्यांतील गुंतवणूकदारांचे अर्धे भांडवल बुडाले आहे. वर्षभरापूर्वी त्यांचा शेअर बाजारातील प्रवेश ही सर्वात मोठी क्रांती असल्याचे बोलले जात होते. त्यांच्या महागड्या मूल्यांकनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना टाळले जात होते, पण आता त्यांचे प्रवर्तक गुंतवणूकदार त्यांचे स्टेक विकत आहेत. गेल्या दहा महिन्यांत नवीन इंटरनेट कंपन्यांचे शेअर्स ५०% पेक्षा अधिक घसरले आहेत. इंटरनेट अर्थव्यवस्था ढासळत आहे. बाजार आणि गुंतवणूकदारांना तीन वास्तवांचा सामना करावा लागतो. एक, स्टार्टअप्स संभाव्यतेच्या गणितापेक्षा ठोस नफ्याचा हिशेब मागितला जात आहे. केवळ २-४% ग्राहक पैसे देऊन सेवा वापरण्यास सहमती दर्शवू शकतात. दुसरे, इंटरनेट मार्केटमध्ये ग्राहकांना प्लॅटफॉर्म किंवा ब्रँड बदलणे सोपे आहे. कंपन्या शाश्वत ग्राहक आधार तयार करू शकत नाहीत. बाजार मिळवण्यासाठी आणि वाचवण्यासाठी अधिग्रहणांमुळे कंपन्यांचे आर्थिक आरोग्य बिघडले आहे. तिसरे, इंटरनेट अर्थव्यवस्थेतील संभाव्यतेच्या तुलनेत पेमेंटसाठी वास्तविक कमाई करण्यायोग्य बाजारपेठ छोटी आहे. येस सिक्युरिटीजला आढळून आले की, भारतातील १४० कोटी लोकसंख्येपैकी केवळ ७ ते १० कोटी लोक इंटरनेट अर्थव्यवस्थेसाठी नियमित कमाईचे स्रोत असू शकतात. यामुळेच स्टार्टअपची शक्यता आणि कमाईचे निकाल यात मोठा फरक आहे. गेल्या पंधरा वर्षांत जगात चांगल्या नोकऱ्यांची स्वप्ने इंटरनेटच्या अर्थव्यवस्थेत एकवटली होती, तिथे आता नोकऱ्या संपत आहेत.

अर्थतज्ज्ञ जॉन केनेथ गॅलब्रेथ यांनी त्यांच्या द ग्रेट क्रॅश या पुस्तकात लिहिले की, काही व्यवसायांत दीर्घ कालावधीत कृत्रिम मूल्य तयार केले जाते, ते वास्तवापेक्षा वेगळे असते, परंतु लाखो लोक त्यावर विश्वास ठेवतात. काळ बदलला की सर्व काही कोलमडून पडते. मग आपल्या शतकातील उज्ज्वल व्यवसाय हजारो नोकऱ्या संपवण्याइतके पोकळ आहेत का? त्यांचे व्यवसाय मॉडेल जगातील सर्वात रंजक आर्थिक गुन्हे आहे का? निकाल बाकी आहे, पण वाद सुरू झाला आहे! (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.) अंशुमान तिवारी मनी-९ चे संपादक anshuman.tiwari@tv9.com

बातम्या आणखी आहेत...