आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • There Is No Need To Imitate The West In Educational Policy | Article By Rajiv Malhotra

चर्चा:शैक्षणिक धोरणात पाश्चात्त्यांचे अनुकरण करण्याची गरज नाही

औरंगाबाद5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारताचे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० म्हणजेच एनईपी यात अमेरिकन सामाजिक तत्त्वे आणि धोरणांचे मोठ्या प्रमाणात पालन केले गेले आहे. अमेरिकन शिष्यवृत्ती आणि अभ्यासक्रम आंधळेपणाने भारतात लागू केल्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या गंभीर आहेत. भारताच्या पुढच्या पिढीची दिशाभूल केली जात आहे. अगदी अमेरिकन शिक्षण व्यवस्थेतही, त्याच्या प्रमुख शैक्षणिक संस्थांमध्ये विकसित झालेल्या अलीकडच्या काही सामाजिक विज्ञान सिद्धांतांच्या वापरावर संकट निर्माण झाले आहे. मात्र, केवळ महाविद्यालयांमध्येच नव्हे, तर प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण स्तरावरही विरोध होत आहे. यामध्ये आघाडीवर आहे लिंगभावाची विचारसरणी, जी शिक्षण क्षेत्रातील लिंग अध्ययनांचे फलित आहे. अनेक अमेरिकन पालकांना अगदी लहान मुलांना त्यांच्या लिंगाबद्दल प्रश्न विचारल्याबद्दल आक्षेप असतो. अनेक पुराणमतवादी पालक लहान मुलांच्या या ‘ग्रूमिंग’ला विरोध करतात, कारण ते लैंगिक संबंधांकडे नेतील आणि गोंधळात टाकतील. अचानक मोठ्या प्रमाणात तरुणांना आपण लैंगिकदृष्ट्या ‘चुकीच्या’ शरीरात आहोत, असे वाटू लागले आहे. संतप्त पालकांना मुलांमध्ये लैंगिक निराशेमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे आणि तज्ज्ञांकडेदेखील या समस्येचा सामना करण्याचा कोणताही मार्ग नाही. यामध्ये सोशल मीडियाचीही मोठी भूमिका आहे, विशेषत: त्रासलेल्या तरुणी, ज्या सार्वजनिकरीत्या स्वतःला ‘ट्रान्स’ असल्याचे घोषित करतात. पश्चिमेकडील पुराणमतवादी व्यक्तींना असे वाटते की, ही प्रवृत्ती अनैसर्गिक आहे आणि ती सामाजिक रूपाने निर्माण केली जात आहे. या प्रकारचे शैक्षणिक संशोधन जीवशास्त्राला सामाजिक न्यायाच्या विचारसरणीपासून दूर करण्याचा प्रयत्न करते. असाही युक्तिवाद केला जात आहे की, लिंग अत्याचारींनी निर्माण केलेल्या सामाजिकदृष्ट्या जुन्या संरचनांच्या दबावाखाली सामाजिक रूपाने तयार केले जाते आणि पीडितांच्या मुक्तीसाठी त्या संरचना तोडणे आवश्यक आहे. त्यामुळेच लिंगभावाला ‘स्थिर’ समाजरचना म्हटले जात आहे. याचा निर्मूलनासाठी पश्चिमेकडील सामाजिक अभियांत्रिकी कार्यकर्ते प्यूबर्टी ब्लाॅकर्ससाठी मोठा दबाव निर्माण करत आहेत आणि मुलांची जननेंद्रिये विकृत करणाऱ्या शस्त्रक्रियांना समर्थन देत आहेत. लिंग हे जैविक नसून निव्वळ ‘सामाजिक रचना’ आहे, या पाश्चात्त्य शैक्षणिक वर्तुळाच्या नव्या कथनाने वैद्यकीय विज्ञानावर परिणाम होत आहे. त्याचा प्रतिध्वनी भारतातही ऐकू येत आहे. प्रत्येक नवीनतम अमेरिकन फॅड कॉपी करणे येथे फॅशनेबल झाले आहे. भारताच्या नवीन शैक्षणिक धोरणाने पाश्चात्त्य उदारमतवादी कला शिक्षणाची दारे अभिमानाने उघडली आहेत. भारतीय विद्यापीठे विद्वानांऐवजी कार्यकर्त्यांनी निर्माण केलेल्या जेंडर स्टडीज विभागाद्वारे लैंगिक अध्ययनासंबंधी स्पर्धेत सामील झाली आहेत. उदारमतवादी कला शिक्षणासाठी महागडे शिक्षण शुल्क भरणाऱ्या बहुसंख्य भारतीय पालकांना अमेरिकन शिक्षणाचे परिणाम समजत नाहीत. लैंगिक अस्थिरतेचे प्रवक्ते काश्मीरसारख्या मुद्द्यांवर आपली सक्रियता भारतविरोधी राजकारणात मिसळत आहेत. ट्रान्सजेंडर समुदायाच्या सन्मानासह भारताने नेहमीच विविधता स्वीकारली आहे. पाश्चिमात्यांचे आंधळेपणे अनुकरण करण्यापेक्षा भारतीय शिक्षणतज्ज्ञांनी भारतीय मॉडेल्सचे परीक्षण करणे आणि त्यांना भारताच्या मानवतेच्या मॉडेलमध्ये समाविष्ट करणे चांगले होईल. वैविध्यपूर्ण लोकसंख्येवर विदेशी सामाजिक विज्ञानाचा निष्काळजीपणे वापर केल्याने अनपेक्षित आणि अस्थिर परिणाम होऊ शकतात, त्यासाठी भारत पूर्णपणे तयार नाही. (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.)

राजीव मल्होत्रा लेखक आणि विचारवंत rajivmalhotra2007@gmail.com

बातम्या आणखी आहेत...