आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • There Is No One In The World Who Is More Generous In Giving Blessings Than A Mother | Article By Pt. Vijayshankar Mehata

जीवनमार्ग:आशीर्वाद देण्यात आईपेक्षा उदार जगात कुणीच नाही

औरंगाबाद8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आई दुर्गेकडून आशीर्वाद देण्याचे अन् ते घेण्याचे दिवस सध्या सुरू आहेत. आशीर्वाद देण्यात आई जितकी उदार असते तितके कदाचित जगात कुणीच नसावे. श्रीरामासोबत आलेल्या वानर, अस्वलांनी गुरूनंतर आईला नमस्कार केला तेव्हा आईने जे केले त्यावर तुलसी लिहितात, कौसल्या के चरनन्हि पुनि तिन्ह नायउ माथ। आसिष दीन्हे हरषि तुम्ह प्रिय मम जिमि रघुनाथ।। मग त्या लोकांनी कौसल्याजींच्या चरणी माथे टेकले. कौसल्येने आनंदी होत आशीर्वाद दिले आणि म्हणाली, तुम्ही माझ्यासाठी रघुनाथासारखे प्रिय आहात. आईने आशीर्वाद देत त्याचा संबंध थेट श्रीरामाशी जोडला. माता आजही आपल्याला पंचतत्त्वांच्या माध्यमातून आशीर्वाद देत आहे आणि या नऊ दिवसांत आपल्याला तिथूनच घ्यायचे आहेत. लक्षात ठेवा- जल, वायू, अन्नधान्य, माता, पिता आणि जीवनसाथीचा कोणताच पर्याय नसतो. अशीच पंचतत्त्वे आहेत. त्यांचा पर्याय शोधणे त्रासदायक ठरेल. चांदी पिता येत नाही, सोने आपण खाऊ शकत नाही. आपण कितीही मोठे झालो असलो तरी हिऱ्यातून ताजेपणा काढू शकत नाही. त्यामुळे आपल्या आसपासच्या जिवंत व्यक्तींवर प्रेम करा. कारण माता-पिता, मशीन आणि जीवनसाथी केवळ शरीर नाहीत. हे नऊ दिवस हेच समजून घेण्याचे आहेत.

पं. िवजयशंकर मेहता humarehanuman@gmail.com