आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रत्येक सकाळ सारखीच दिसते, पण खरंच सारखी नसते. जीवनाचा प्रत्येक क्षण सारखाच दिसतो, पण वास्तव तसं नसतं. ढग दाटून आले आहेत, पावसाच्या सरी बरसल्या आहेत... मातीचा सुगंध चोहीकडे दरवळला आहे. कालच्या आणि आजच्या सकाळमध्ये हेच मोठे अंतर आहे. आज सकाळपासून अंथरुणावरून उठण्याची इच्छा होत नव्हती. कारण या रविवारी मुंबईत मान्सूनचा पहिला पाऊस पडला आणि आज आराम करावा असे मन म्हणू लागले. एक मन म्हणाले की मातीच्या सुगंधाचा आनंद घ्यावा, दुसरे मन म्हणाले की आज राजेशला भेटायला जावे.
राजेश रस्त्याच्या पलीकडे बनलेल्या रेस्टॉरंटमधून पळत येतो आणि बसमध्ये चढून निघून जातो. त्या वेळी मी मुंबईच्या पवई लेकच्या पाथवेवर ठरलेल्या वेळेवर स्ट्रेचिंग करत असतो. मात्र तो रोज बसमध्ये चढण्याआधी मला ‘गुड मॉर्निंग सर’ म्हणणे विसरत नाही. त्याच्या या अभिवादनाने माझे लक्ष त्याच्याकडे जाते, पण मी त्याला ओळखत नाही. एक दिवस मी ठरवले की, रेस्टॉरंटच्या सुरक्षा रक्षकाला त्याच्याविषयी जाऊन विचारणार. सुरक्षा रक्षकाने सांगितले, ‘कोण तो मोरीवाला राजेश?’ तो खूप दुरून येतो. ही बस हुकली तर घरापर्यंत जाणारी लोकल ट्रेनही निघून जाईल. मराठीत किचन सिंकला ‘मोरी’ म्हणतात आणि भांडे घासणाऱ्याला मोरीवाला म्हणतात. हा शब्द हॉटेल कर्मचाऱ्यांनी दिलेला आहे. तो त्यांच्या व्यवसायापुरताच मर्यादित आहे.
रविवारी मी स्वत:च बसस्टॉपवर जाऊन उभा राहिलो. तो पळत आला. तो म्हणायच्या आधी मी त्याला ‘गुड मॉर्निंग राजेश’ म्हणालो. ऐकून तो आश्चर्याने पाहू लागला. कारण पहिल्यांदाच त्याचे नाव कोणीतरी इतक्या आदराने घेतले होते. तो रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत काम करतो. तो टेबल-फरशी, टॉवेल, कपडे स्वच्छ करतो. भांडी-चमचे-चाकू घासून आणि पुसून ठेवतो. टेबलावर व्यवस्थित रचून ठेवतो. त्याला या कामाचे ९ हजार रुपये मिळतात. तो सर्व पैसे उत्तर प्रदेशात आपल्या घरी पाठवतो. त्यात त्याच्या कुटुंबाचा आणि एका मुलाच्या शाळेचा खर्च भागातो.
त्याचा खर्च सर्व्हिस चार्जमधून निघतो, जो दरमहिन्याला रेस्टॉरंट मालक देत असतो. ते अडीच हजार ते साडेचार हजारांपर्यंत असते. ते ग्राहकांची संख्या आणि ऑर्डरवर अवलंबून असते. यावर सध्या वाद सुरू आहे की, ‘ग्राहकाच्या बिलात सेवा शुल्क जोडणे कायदेशीर आहे का?’ अशा परिस्थितीत राजेशसारख्या लोकांचे काय? सेवा शुल्क संपले तर तो घरी परतण्याचा विचार करेन. या वादाचा निकाल काहीही लागला तरी आपण झोपेत असताना राजेशसारखे हे अनोळखी चेहरे आपापल्या कामात व्यग्र असतात याची जाणीव असावी? कोणी विमानतळावर टॉयलेट स्वच्छ करतो, तर कोणी आपली कार बाहेर काढण्याआधी रस्ते स्वच्छ करत असतात. रेल्वे प्लॅटफॉर्मवरील कचरा, रुग्णालयातील कचरा सर्व स्वच्छ करत असतात. राजेशच्या जीवनातील संघर्ष ऐकून माझं मन भरून आलं. असे बरेच लोक आहेत, जे आपल्या जीवनासाठी प्रत्येक क्षण काम करत आहेत याची जाणीव झाली. मग अशा लोकांना आपण ओळखत असू किंवा ओळखत नसूही, पण त्यांच्याविषयी नेहमी दयेचा भाव ठेवायला हवा.
एन. रघुरामन मॅनेजमेंट गुरू raghu@dbcorp.in
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.