आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या काही दिवसांपासून मी वेगवेगळ्या ठिकाणी एकानंतर एक बोर्ड मीटिंगमध्ये सहभाग घेत होतो. अशीच एक बैठक पाच तासांहून अधिक काळ चालली आणि ३० लोकांसोबत झालेल्या बैठकीत मला लक्षात आले की, आम्ही लोकांचे मत विचारले तेव्हा किमान दोन लोकांंनी कोणत्याही विषयावर आपले मत दिले नाही. त्यांची ओळख पटवून निवडक प्रश्न विचारले असता त्यांनी अतिशय संक्षिप्त आणि सरळ उत्तरे दिली. चेहऱ्यावर हसू होते, पण ते खोटे होते. ते ज्या टेबलावर बसले होते त्या टेबलावर त्यांची नजर बहुतांश वेळा स्थिर होती आणि फक्त काही वेळा ते आपला चेहरा वर करून वक्त्याकडे पाहत असत. संपूर्ण बैठकीत त्यांची नजर फक्त एकदाच वक्त्याला भेटली आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक उदासीन भाव होता. वक्त्याप्रती उत्साह, चैतन्य किंवा कौतुक नव्हते.
मी त्यांना पाहताच खासगी समुपदेशनासाठी बोलावले आणि ते दुःखी असल्याचे कळले. त्यांचे बॉस त्यांना वेगळी वागणूक देत असल्याचे स्पष्ट झाले. खरं सांगायचं तर आगामी प्रोजेक्टसाठी त्यांची निवड झाली नव्हती. मी अधिक चौकशी केली तेव्हा मला कळले की, खरे तर त्यांची निवड झाली नाही म्हणून ते दुःखी नव्हते, तर कमी पात्रतेच्या लोकांची प्रोजेक्टसाठी निवड झाल्यामुळे ते जास्त नाराज होते. २०२२ च्या शेवटच्या महिन्यांत हा शब्द सार्वजनिक चर्चेत आला. गॅलप सर्वेक्षण संस्थेने सप्टेंबरमध्ये अहवाल दिला की, अमेरिकेतील १८ वर्षांवरील ५०% पूर्णवेळ किंवा अर्धवेळ कामगार ‘क्वाइट क्विट्स’ असतील, जे लोक कामावर इतरांपेक्षा जास्त किंवा चांगले काम करत नाहीत आणि जेवढ्यास तेवढे काम करतात त्यांच्यासाठी ही संज्ञा आहे. त्यांना चांगल्या किंवा सरासरी कर्मचाऱ्यांच्या श्रेणीत ठेवणे खूप घाईचे असले तरी या लोकप्रिय शब्दाचा उदय रंजक आहे, कारण तो लीडर्स, व्यवस्थापक, विभागप्रमुख व नियोक्ते यांच्या स्तरावर त्यांनी सोपवलेल्या कामाव्यतिरिक्त एकूणच तेथील वातावरणाबाबत एक प्रकारची चिंता दर्शवतो. त्यांच्या मनावरील भार काढून टाकण्यास मला काही तास लागले. मी प्रयत्न केले, कारण ते चांगले कर्मचारी होते आणि संस्थेसाठीही चांगले होते. मला त्यांना इशारा द्यावा लागला की, मार्चच्या वेतनवाढीची वेळ जवळ आहे आणि कामावरील वर्तनाचा कौटुंबिक जीवनावरही परिणाम होत आहे. सर्व काही लक्षात ठेवा-प्रत्येक माणसाकडे उद्देश पूर्ण करण्यासाठी काही तरी वेगळे असते. पाणी करू शकते ते पेट्रोल करू शकत नाही. आवडता कर्मचारी होण्यासाठी स्वतःला म्हणा, ‘माझ्यात सामर्थ्य व उणिवा असूनही मी माझ्याशिवाय दुसरा कसा असू शकतो? दुसऱ्याची ताकद भावली तरी मी दुसरा कुणी होण्यासाठी का धडपडावे?
फंडा असा ः कामाच्या ठिकाणी विशेषत: वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांत कधीही ‘क्वाइट क्विट्स’ होऊ नका, कारण याचा २०२३-२४ च्या वेतनवाढीवर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे आणखी तणाव निर्माण होईल.
एन. रघुरामन, मॅनेजमेंट गुरू [raghu@dbcorp.in]
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.