आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाही घटना आपल्याला करुणा आणि कृतज्ञतेच्या मूल्यांची आठवण करून देतात, जी आपण अनेकदा विसरतो. अलीकडेच क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या दुःखद अपघातानंतर स्थानिकांनी दाखवलेला सेवाभाव लक्षात घेण्यासारखा आहे. पंत लवकर बरा व्हावा, अशी आपली इच्छा आहे, पण इथे मुद्दा काही वेगळाच आहे. चालक आणि वाहक त्याला वाचवण्यासाठी देवदूत म्हणून आले. ते ऋषभ पंतला ओळखतही नव्हते. त्या सामान्य लोकांसाठी माणूसच सर्वकाही होता, सामान्य काय आणि विशेष काय? तो कोणत्याही आयडेंटिटी क्रायसिस किंवा नेटवर्किंगचा भाग नसतो. म्हणूनच त्या वेळचे त्यांचे मुख्य ध्येय कोणाचा तरी जीव वाचवणे हे होते. पण, रस्ते अपघातावेळी लोक सहज पाठ फिरवतात. एनसीआरबीच्या २०२० च्या अहवालानुसार, रस्ते अपघातांत संबंधित निष्काळजीपणामुळे ३ वर्षांत ३.९२ लाख लोकांचा मृत्यू झाला. या विषयावर मार्च २०१६ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशात पोलिसांनी पीडितांना मदत करणाऱ्या कोणालाही त्रास देऊ नये, असे म्हटले, परंतु लोक मदत करणे टाळतात. पण, लोक आता ज्या प्रकारे मदतीसाठी तत्परता दाखवत आहेत, ही महामारीनंतरची सामाजिक वागणूक बदलल्याचे लक्षण आहे का? कारण स्वयंसेवीपणाची ही भावना महामारीनंतरच्या जगाचे आचरण आहे. महामारीने निःसंशयपणे समाजाला जीवनाचे मूल्य समजावून सांगितले. म्हणूनच करुणा, सेवा, कृतज्ञता ही सर्वात मोठी जीवनमूल्ये म्हणून उदयास आली. कोविडने स्वतःच्या जिवापेक्षा दुसऱ्याच्या आयुष्याचे महत्त्व असल्याचे समजावून सांगितले. अखेर, जगाला कोविडमध्येही त्या एकाकीपणाचा सामना करावा लागला आहे. ‘कोविड-१९ : पोस्ट-ट्रॉमॅटिक ग्रोथ अँड स्ट्रेस...’ या अध्ययनात संशोधकांनी मानले की, कोविडदरम्यान ओळखल्या गेलेल्या प्रमुख तणावांपैकी एक म्हणजे सामाजिक वियोग आणि एकाकीपणाची भावना. सामाजिक वियोग, एकटेपणा, सहानुभूतीचा अभाव लोकांच्या पोस्ट-ट्रॉमेटिक ग्रोथ आणि पोस्ट-ट्रॉमेटिक स्ट्रेसवर कसा परिणाम होतो हेदेखील अध्ययनात शोधण्यात आले आहे. अनेक वर्षांपूर्वी प्रख्यात मानववंशशास्त्रज्ञ मार्गारेट मीड यांना एका विद्यार्थ्याने विचारले होते की, त्यांच्या मते संस्कृतीत सभ्यतेचे पहिले लक्षण कोणते? विद्यार्थ्याला वाटले, त्यांचे उत्तर मातीची भांडी, शिकारीची साधने इ. असेल. पण, मीड यांनी संस्कृतीत सभ्यतेचा रंग मानवतेने किंवा मानवी मूल्यांसह पाहिला. त्यांच्या मते, पहिला संकेत बरे झालेल्या माणसाच्या तुटलेल्या फीमरमधून मिळतो. म्हणजेच या व्यक्तीचे फीमर तुटले, तेव्हा इतर कोणीही त्याला एकटे सोडले नसते, याचा पुरावा ही घटना आहे. कोणी तरी थांबले असते, दुसऱ्याने या तुटलेल्या फीमर किंवा जखमेवर मलमपट्टी केली असती. कोविडनंतर जगात भीती, अशांतता, अनिश्चितता असताना चालक सुरेंद्र व वाहक परमजित यांनी मार्गारेट मीड यांच्या सभ्यतेचा पुनरुच्चार केला आणि ऋषभ पंतला एकटे सोडले नाही, तर सुरक्षितपणे रुग्णालयात पोहोचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. देशाची लोकसंख्या सुमारे १४१ कोटी आहे. मृत्यू ही संख्यात्मक ओळख आहे, पण जीवन हे गुणात्मक आहे. लोकसंख्येच्या एकचतुर्थांश लोकांनीही स्वयंसेवा स्वीकारली तर न जाणो किती लोक जगाला समजावून सांगत असतील की, मानवता ही कोणत्याही संस्कृतीतील सभ्यतेचे पहिले लक्षण आहे. (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.) नंदितेश निलय लेखक आणि विचारवं nanditeshnilay@gmail.com
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.