आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Thoughtfully Speaking, The Value Of The Word Will Increase| Article By Pt. Vijayshankar Mehta

जीवनमार्ग:विचारपूर्वक बोलल्यास वाढेल शब्दाची किंमत

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विचार न करता बोललेले शब्द तणाव निर्माण करण्याचे किंवा तोडण्याचे काम करतात. त्यात हृदय, व्यवस्था, नातेसंबंध किंवा संस्था यापैकी कशालाही इजा होऊ शकते. सध्या वर्ड आॅफ माउथचे वर्ल्ड आहे. म्हणजे तोंडातून बाहेर पडणारा शब्दांचे जग. मी राहत असलेल्या शहरात नुकत्याच घडलेल्या दोन घटना धडे देणाऱ्या ठरतात. मी ब्राह्मण समाजातील आहे. तिथे संस्थेच्या निवडणुकीदरम्यान अपशब्द, शिवीगाळीचा आरोप झाला होता. पूर्वी अशा घटनांवर प्रतिक्रिया देण्याची व्यासपीठे मर्यादित होती, परंतु आता सोशल मीडियाचे युग आहे.

येथे सत्याला तथ्याने नव्हे, समर्थनाद्वारे पाहिले जाते. काही लोक ताबडतोब शब्दावतार घेतात. नृसिंह किंवा हरी अवतार घेण्याचीही देवाने इतकी घाई केली नव्हती. बोलल्या गेलेल्या शब्दांवर सोशल मीडियाच्या प्रतिक्रियेत असभ्य, शिवीगाळ करण्यासोबत दोष देण्याची पद्धतही विषारी ठरत आहे. याच ठिकाणी संत समाजात दुसरी घटना घडली. एका साधूच्या अश्लील शब्दांवर साध्वींचा प्रतिकार श्रद्धेची पाळेमुळे हादरवून गेला. एकांतात संतांचे शब्द किती असभ्य होते हे महंत किंवा भगवंतांनाच माहीत, पण माफीने प्रकरण थंडावले. सध्या वातावरण तापलेले आहे, कारण सोशल मीडिया ट्रायल सुरू आहे. एकांतात किंवा सार्वजनिक ठिकाणी शब्दांबद्दल खूप सावध राहा. विचारपूर्वक बोललात तर शब्दांची किंमत वाढेल.

पं. िवजयशंकर मेहता humarehanuman@gmail.com Facebook:Pt. Vijayshankar Mehta

बातम्या आणखी आहेत...