आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापहिले दृश्य आहे मुंबईतील गणेश उत्सवाचे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी १८९० मध्ये महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. या उत्सवाने देशातील लोकांमध्ये स्वाभिमान व एकतेची भावना निर्माण केली. राष्ट्रीय चळवळीत त्याचा मोठा वाटा होता. दुसरे दृश्य १९०७ मधील काँग्रेसच्या सुरत अधिवेशनाचे आहे. छायाचित्रात टिळक संबोधित करताना दिसत आहेत.
अधिवेशनात गदारोळ झाला. कारण टिळक, लाला लजपत राय व बिपिन चंद्र पाल असे नेते स्वातंत्र्यासाठी स्वराज्य व बहिष्कारासाठी आग्रही होते. त्यांना आंदोलनाला आक्रमक स्वरूप द्यायचे होते. त्यात त्यांना काही प्रमाणात यशही आले. यामुळेच लंडन टाइम्सच्या पत्रकाराने टिळकांना ‘फादर आॅफ इंडियन अनरेस्ट’ म्हणजे ‘भारतातील असंतोषाचे जनक’ म्हटले होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.