आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विशेष:पंतप्रधान मोदींनी शिकवले वेळ व्यवस्थापनाचे कौशल्य

औरंगाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वैयक्तिकरीत्या अनेक गुण आणि वैशिष्ट्यांसाठी प्रशंसा केली जाते, परंतु त्यांचे वेळ व्यवस्थापन आणि विकास योजनांवर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता मला सर्वात जास्त प्रभावित करते. याहून अधिक प्रभावी बाजू म्हणजे त्यांनी हा गुण सरकारी कामकाजात अमलात आणल्याने त्याची उत्पादकता वाढली आहे आणि वेळेत उद्दिष्टे साध्य होत आहेत. माझा नोकरशाहीशी मर्यादित संवाद झाला असला तरी सरकारी यंत्रणेच्या कार्यपद्धतीत मूलभूत बदल झाल्याचे मला आतापर्यंत मिळालेल्या माहितीवरून स्पष्ट होते. मोदींच्या वाढदिवसानिमित्त मी यासंदर्भात काही विचार मांडत आहे.

२०१४ मध्ये मोदींनी पदभार स्वीकारला तेव्हा नोकरशाहीची कार्यक्षमता आणि वेळेच्या व्यवस्थापनाला चालना देणे हे त्यांच्या सरकारच्या अजेंड्यात निश्चित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी शीर्षस्थानी होते. मोदींनी प्रशासनाच्या विविध पातळ्यांवरील लालफीतशाही दूर केली, पण व्यवस्थेत मानसिक बदल घडवून आणण्यासाठी आणखी काम करण्याची गरज होती. तळागाळातील नेते म्हणूनही मोदी वेळेच्या व्यवस्थापनावर विशेष लक्ष देतात. १९९२ च्या एका घटनेचे वर्णन करताना गुजरातमधील एका कार्यकर्त्याने मला सांगितले की, एका बैठकीत मोदींनी उपस्थितांची माफी मागितली, कारण ते तीन मिनिटे उशिरा आले होते. मोदींनी या विषयावर आपले विचार तरुण-ज्येष्ठ सर्वांसमोर मांडले आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी डांग जिल्ह्यातील काही शाळकरी मुलांशी संवाद साधला. एका मुलाने त्यांना वेळ व्यवस्थापनावर प्रश्न विचारला, त्यावर त्यांनी उत्तर दिले, ‘या जगाचा वेळ व्यवस्थापनाचा एक सामान्य नियम आहे. कष्टाळू माणसाला वेळेच्या व्यवस्थापनात काहीही अडचण नसते, पण आळशी व्यक्तीकडे नेहमीच कमी वेळ असतो... आपल्या सर्वांकडे पुरेसा वेळ असतो, पण त्याचा उपयोग कसा करायचा हे माहीत नसते.’

मोदी हे त्यांच्या परदेश दौऱ्यांवरील चांगल्या वेळेच्या व्यवस्थापनासाठीही ओळखले जातात. २०१६ मध्ये बेल्जियम, अमेरिका आणि नंतर सौदी अरेबियाच्या अधिकृत भेटीदरम्यान मोदींना मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी वेळ मिळावा म्हणून त्यांनी हॉटेलऐवजी विमानात झोप घेतल्याचे समोर आले. एअर इंडिया वनमध्ये त्यांनी तीन रात्री आणि हॉटेलमध्ये फक्त दोन रात्री घालवल्याचे सांगण्यात येते. त्यांच्या प्रवासाचे नियोजन अशा प्रकारे करण्यात आले होते की, ते रात्री प्रवास करतील आणि सभांना उपस्थित राहण्यासाठी दिवसभर उपलब्ध असतील. पंतप्रधानांनी विमानात झोपण्याचा पर्याय निवडला नसता तर चार दिवसांचा प्रवास किमान सहा दिवसांचा झाला असता. लोकांना ‘मिनिमम गव्हर्नमेंट, मॅक्झिमम गव्हर्नन्स’चे आश्वासन देऊन मोदी सत्तेवर आले, पण ‘चालायचंच’ वृत्तीसह अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागले. यूपीए राजवटीने अनेक अधिकाऱ्यांना निराशावादी बनवून त्यांचे मनोधैर्य खचवले होते. एक विचित्र उतरंड सुरू होती, त्यात एक फाइल एकाकडून दुसऱ्याकडे आणि दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे शेरा न देता पाठवली जात होती. अखेरीस ती एका कॅबिनेट समितीकडे पाठवली जात असे, ती समस्यांवर चर्चा करण्यासाठी क्वचितच उपलब्ध असे. हा अक्षम दृष्टिकोन पाहून मोदी अवाक् झाले. अधिकाऱ्यांवर निश्चित वेळेत काम पूर्ण करण्याची जबाबदारी नव्हती. परिणामी काही दिवसांचे काम पूर्ण व्हायला काही महिने लागत. अनेक अधिकारी मनमानी वेळी कार्यालयात ये-जा करत असत. मोदींनी पदभार स्वीकारल्यानंतर काही महिन्यांतच सरकारने सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीचा मागोवा घेण्यासाठी बायोमेट्रिक अटेंडन्स सिस्टिम (बीएएस) सुरू केली. त्यांच्या उपस्थितीचे तपशील आता डॅशबोर्डवरील कोणीही ट्रॅक करू शकतात. या नव्या कार्यपद्धतीला सुरुवातीला काही लोकांच्या विरोधाला तोंड देण्यासाठी मोदींनी एक नवा उपाय केला. अधिकाऱ्यांसोबतच्या संवादादरम्यान ते अनेकदा कुटुंबासोबत अधिक दर्जेदार वेळ घालवण्यासह वेळ व्यवस्थापनाच्या फायद्यांना प्रोत्साहन देताना दिसले. मंत्र असा होता की, कुटुंबाबरोबर घालवलेला वेळ माणसाला आराम देतो आणि कामावर अधिक चांगले लक्ष केंद्रित करण्यास व उत्पादकता वाढवण्यास मदत करतो.

अनुपम खेर ज्येष्ठ अभिनेते Twitter@AnupamPKher

बातम्या आणखी आहेत...