आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराया वर्षी खेळ आणि बॉलीवूडमध्ये महिलादिनाचा जल्लोष चार दिवस आधीच सुरू झाला आहे. खेळांमध्ये क्रिकेट पुढाकार करत आहे. कारण आहे गर्दी आकर्षित करण्याची क्षमता. ७ देशांच्या ८७ महिला खेळाडूंना मैदानाच्या दिशेने अभिमानाने पुढे जाण्याची आणि जाऊन आपली चुणूक दाखवण्याची संधी आहे, ज्याची त्यांनी स्वप्ने बघितली होती. आजवर केवळ पुरुष खेळाडूच येथे असायचे. आयपीएल म्हणण्याची सवय लागलेल्या माध्यमांना आता स्वत:ला डब्ल्यूपीएल (वूमन प्रीमियर लीग) म्हणायचे प्रशिक्षण द्यावे लागणार, जे या शनिवारी रात्री सुरू झाले. क्रिकेट प्रेमी असल्या कारणाने मी त्यांना ब्रेबॉर्न स्टेडियम आणि डीवाय पाटील स्टेडियममध्ये खेळताना बघणार आहे. हे स्थळ माझ्या घरापासून फार दूर नाही. अनेक दिवसांपासून आम्ही शिकत आलोत की महिला ट्रक, रेल्वे, विमान चालवत आहेत, वाहतूक सांभाळताहेत, पोलिस, अॅस्ट्रोनॉट झाल्या आणि खेळांच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये कठीण खेळांत पदक आणले, लष्करात गेल्या आणि आता सीमेवर सुरक्षा दलाचे नेतृत्व करणे एखाद्या उत्सवापेक्षा कमी नाही. पण क्रिक्रेटचा हा लहान फॉरमॅट अनेक कारणांनी वेगळा आहे.
प्रथम मनोरंजन आहे, ज्यामुळे गर्दी होते. त्यामुळे याला रोजच्या चर्चेत चांगले महत्त्व मिळते आणि हळूहळू एका विशिष्ट वयोगटात अपेक्षा निर्माण करते. मुलींसाठी तर हे खूप महत्त्वाचे आहे. मी याला आत्मविश्वास म्हणू शकतो. कारण कामानिमित्त मी ज्या शिवाजी पार्क मैदानावरून जातो, तेथे क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरही राहत होते आणि श्वासांत क्रिकेट होता, तेथे तरुण मुले मैदानात धावताना दिसतात. तेथे महिला खेळाडूंच्या माता असायच्या ज्या प्रार्थना करत की त्यांचा मुलगा पुढचा सचिन बनावा. ज्या दिवशी डब्ल्यूपीएल मीडिया जाहिरातीत बरोबरीने छापल्या जातील, त्या दिवशी शिवाजी पार्कमध्ये तरुण मुलीही दिसू लागतील.
आता बॉलीवूडविषयी.. तीन नट्या माझ्या आवडीच्या आहेत. प्रियंका चोप्रा, दीपिका पदुकोण आणि सुश्मिता सेन. पडद्यावर आणि पडद्याबाहेरही त्यांच्या वेगळ्या भूमिका आहेत. पहिल्या दोन अभिनेत्रींनी तर आपल्या विक्रमाला आव्हान दिले आणि नव्या उंचीवर पोहोचल्या. तामिळ चित्रपटांपासून सुरुवात करत प्रियंका आज हॉलीवूडमध्ये ओळखीचे नाव झाले आहे. लाजरी-शांत स्वभावाची दीपिका लॉल एंजलिसमध्ये अकॅडमी अवॉर्ड्सची प्रस्तूतकर्ता बनली आहे. मला विश्वास आहे की, केवळ दीपकामुळेही ऑस्कर अवॉर्डला मोठे प्रेक्षक मिळतील. कला सुश्मिता सेन तिचा निश्चय, दिसणे आणि अभिनयासाठी निवडलेल्या पात्रांमुळे आवडते, किमान सध्या तरी! मला एक अशी व्यक्ती दाखवा जी ट्विट करते, ‘काही दिवसांपूर्वी मला हृदयविकाराचा झटका आला होता. अँजिअाेप्लास्टी झाली. स्टेंट लावला गेला सर्वात मोठी बाब म्हणजे कार्डियोलॉजिस्टने माझे हृदय मोठे असल्याची पुष्टी केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.