आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावाटले तर याला ग्रॅज्युएशन वा पोस्ट ग्रॅज्युएशनची एखादी पदवी म्हणा, मात्र ते आपला वर्ग अटेंड करून स्वत:ला त्याच प्रकारे चांगला करत आहेत, जसे एखादा कॅरिअर सजग कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्ह नोकऱ्यांच्या जगात करतो. सर्वात आधी ते झारखंडमधील जामतारा, हरियाणातील मेवात वा राजस्थानातील अलवर आणि भरतपूरच्या बिगिनर्स स्कूलमध्ये करिअरच्या अडचणी समजून घेण्यासाठी गेले.
जागतिक बाजारात स्पर्धा करता यावी म्हणून कामात काटेकोरपणा आणण्यासाठी आता विदेशात जात आहेत. हो, ऑनलाइन फसवणुकीची सुरुवात करणारे सायबर चोरटे आता नवे कौशल्य शिकण्यासाठी नायजेरियापर्यंत प्रवास करत आहेत. तेथे अशा अनेक शाळा आहेत, ज्या सायबर क्राइमचे शिक्षण देतात आणि प्रात्यक्षिकचे वर्गही घेतात. हॅकिंग-फिशिंगसह दुसऱ्या सायबर फसवणुकींचा वापर करत लोकांना कसे लुबाडायचे हे शिकवतात. त्यांना हे करून कसे वाचता येईल हेही शिकवले जाते. त्यांना शिकवले जाते की, आपल्या लक्ष्याचे संपर्क सूत्र कसे मिळवायचे. प्रात्यक्षिकात हे ‘स्टुडंट्स’ किंवा ‘इंटर्न्स’ना शिकवले जाते की, टार्गेट्सला चांगल्या पद्धतीने बोलून जाळ्यात कसे अडकवायचे. या इंटर्न्सना असेही शिकवले जाते की, खरे दिसणारे बनावट सोशल मीडिया प्रोफाइल्स कसे बनवायचे.
सायबर तपास पथकाचे म्हणणे आहे की, नायजेरियात दिले जाणारे धडे पश्चिमेतील लाेकांना लक्ष्य करण्यासाठी असतात. याच्याशी आपला काय संबंध? असा विचार तुम्ही करत असाल. अहमदाबादमधून चालवल्या जाणाऱ्या ऑनलाइन फ्राॅडची चौकशी करणाऱ्यांना तीन-चार वेळा दिसले की, संशयितांनी आफ्रिका देशांचा प्रवास केला होता. बंगळुरू आणि मुंबईत एज्युकेशन फ्रॉड, ओटीपी फ्रॉड, जॉब फ्रॉडच्या घटनांमध्ये जी वाढ झाली आहे, त्यातून वेगळीच कथा दिसते. असे दिसते की, प्रॅक्टिकल लेसनचा वापर आपल्यावर करण्यात येत आहे. अहमदाबादच्या अधिकाऱ्यांना असेही आढळले की, प्रशिक्षणानंतर संशयितांनी दिल्लीतील उत्तमनगरात आपला तळ ठोकला आहे. ते राजधानीतील दाट लाेकवस्तीत आहे.
यामुळे आपल्या जवळपास फिरणाऱ्या या चोरट्यांपासून वाचण्यासाठी काय करायचे, ज्यांनी आपली वैयक्तिक माहिती शोधण्यात कौशल्य प्राप्त केले आहे? मी तुम्हाला दोन मुद्दे सांगत आहे, जे ऐकून तुम्ही हे तर मला आधीच माहीत होते असे म्हणाल. मात्र वास्तव असे आहे की, माहिती असूनही त्याचे पालन करत नाहीत. पहिला, कधीही केवायसी अपडेट करण्याचे सांगणारे कॉल्स, एसएमएस, ईमेल इत्यादींना उत्तर देऊ नका किंवा एखाद्या लिंकवर क्लिक करू नका. स्वत: बँकेत जाणे चांगले होईल. बहुतांशी वेळा जेव्हा मी बँकेत माहिती घेतली तेव्हा मला सांगण्यात आले की, त्यांनी केवायसी अपडेट करायला सांगितलेच नव्हते. दुसरा, कोणत्याही ठिकाणी पैसे देताना आपले क्रेडिट वा डेबिट कार्ड नजरेपासून लांब करू नका, मग ती संस्था कितीही प्रतिष्ठित असो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.