आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा:यशस्वीतेसाठी, तुमची स्वप्ने तुमच्या भीतीपेक्षा मोठी असली पाहिजेत

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘जेव्हा लाखो गोष्टी तुम्हाला खाली खेचण्यासाठी तयार असतात तेव्हा स्वतःला उचलण्यासाठी फक्त एक कारण शोधा.’ मी हे शुक्रवारी एका अत्यंत निराश शाळकरी मुलाला सांगितले, ज्याला पुढे शिक्षण घ्यायचे नव्हते. तेव्हा तो उद्धट स्वरात बोलला.?’ मी म्हणालो, ‘भावना आणि मौन या दोन शक्तिशाली ऊर्जा आहेत. भावना तुम्हाला मानसिकदृष्ट्या मजबूत बनवते आणि शांत राहणे तुम्हाला भावनिकदृष्ट्या मजबूत बनवते’. तरीही त्याने मानले नाही. म्हणाला, ‘तुम्ही माझ्या जागी या आणि मी काय चालले आहे ते समजून घ्या. उपदेश करणे सोपे आहे.’ नंतर मला होशियारपूरच्या राधिका नरुलाची गोष्ट सांगावी लागली. ती त्याला नंतर पटली. किती तरुण कष्ट करून मिळालेली मेडिकलची जागा सोडू शकतात? राधिकाने हे केले. काही जण म्हणतील, तिला आरोग्याच्या अनेक समस्या होत्या, परंतु तिने एकांतात रोगाशी लढण्यासाठी मेडिकलची जागा सोडली आणि नंतर दोन वर्षांपूर्वी सोडलेले यश परत मिळवलेे. राधिकाने २०२० मध्ये राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा (NEET) उत्तीर्ण केली होती. आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्चमध्ये प्रवेशासाठी ती पात्रही ठरली होती. भविष्यात ती डॉक्टर होणार याचा तिला आनंद होता. कारण त्यावेळी संपूर्ण जग कोविडची भीषणता पाहत होते. १२ डिसेंबर २०२० रोजी समुपदेशनाच्या दिवशी तिला भयंकर डोके दुखण्याचा त्रास झाला. किराणा दुकान चालवणाऱ्या कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात नेले. तिच्यात काही तरी गंभीर लक्षणे दिसली आणि चाचण्यांसाठी एम्समध्ये पाठवले.

१५ डिसेंबर २०२० रोजी अहवालात क्रॉनिक किडनी डिसऑर्डर (सीकेडी) आणि दोन्ही किडनी ९२% खराब झाल्याचा खुलासा झाल्यामुळे राधिका आणि तिच्या कुटुंबाला धक्का बसला. दरम्यान, त्यांचा सर्वात मोठा आधार असणाऱ्या त्यांच्या आजीचे निधन झाले. या अतीव दुखा:त असतानाही तिचे उपचार चालू राहिले. प्रकृती अधिकच बिघडत गेली आणि सीकेडी स्टेज-५ वर पोहोचली. एक तर राधिकाला आयुष्यभर डायलिसिसवर राहावे लागेल किंवा प्रत्यारोपणासाठी दाता शोधावा लागेल, असे कुटुंबीयांना सांगण्यात आले. तिची आई रुचीची किडनी मॅच झाल्याची गोड बातमी डॉक्टरांनी दिली तेव्हा कुटुंब अजूनही दात्याचा शोध घेत होते. ज्या आईने तिला जन्म दिला तिने यावेळी आपली किडनी देऊन तिला जीवनदान दिले. २३ सप्टेंबर २०२१ रोजी प्रत्यारोपण करण्यात आले. डॉक्टर बनण्याची तिची आवड, समाजसेवा करण्याच्या तिच्या पालकांच्या उत्कटतेने तिला NEET २०२२ ची तयारी करण्याचे बळ दिले. ती शांतपणे तयारीला लागली. तिला संसर्ग होण्याची शक्यता असल्याने, तिला प्रथम तीन महिने अतिदक्षाता विभागामध्ये, नंतर काही महिने सामान्य वॉर्डमध्ये आणि जुलै २०२२ पर्यंत घरी ठेवण्यात आले. तिला पहिल्यांदा NEET साठी बाहेर जावे लागले. या नऊ महिन्यांत तिने एकट्याने या कठीण परीक्षेची तयारी केली.

बातम्या आणखी आहेत...