आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • To Know The Status Of The Rupee, One Must First Understand The Dollar | Article By Ujjwal Dipak

अर्थव्यवस्था:रुपयाची स्थिती जाणून घेण्यासाठी आधी डॉलर समजून घ्यावा लागेल

औरंगाबाद25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे एक वक्तव्य नुकतेच व्हायरल झाले आहे. ‘रुपया कमकुवत होत नसून डॉलर मजबूत होत आहे’ असे त्या म्हणताना दिसल्या. अर्थमंत्र्यांच्या या विधानाकडे दुर्लक्ष न करता त्यावर गंभीर चर्चेची गरज आहे. रशिया-युक्रेन संकटात अभूतपूर्व चलनवाढ आणि जागतिक अस्थिरतेमुळे भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत नीचांकी पातळीवर आला आहे. फेब्रुवारीमध्ये (युद्धाची सुरुवात) ७४.६४ रुपयांवरून डॉलरच्या तुलनेत १ नोव्हेंबर रोजी तो ८२.५३ रुपयांपर्यंत खाली आला आहे, त्याच्या मूल्यात सुमारे १०% घट झाली आहे. गेल्या वर्षभरात प्रमुख जागतिक चलने डॉलरच्या तुलनेत कमी कामगिरी करत आहेत - ब्रिटिश पाउंड डॉलरच्या तुलनेत २३% , तर युरो जवळपास २०% खाली आला आहे. ब्रिटिश पाउंडच्या तुलनेत रुपयात १०%, तर युरोच्या तुलनेत रुपयात ७.९% वृद्धी आहे.

हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की, जगभरात आधी महामारी, त्यानंतर रशिया-युक्रेन युद्धामुळे अनिश्चिततेचे वातावरण आहे आणि अमेरिका-युरोपसह जवळजवळ सर्व प्रमुख अर्थव्यवस्था ऐतिहासिक चलनवाढ दर, बेरोजगारी दरामुळे आर्थिक सलोखा साधण्यात अपयशी ठरल्या आहेत. वाढत्या व्याजदरामुळे पैशांचा ओघ ठप्प झाला असून विदेशी गुंतवणूकदारही थबकले आहेत. डॉलर इतका शक्तिशाली होण्याचे बीज १९४४ मध्ये अमेरिकेच्या न्यू हॅम्पशायर येथे झालेल्या ब्रेटन वुड्स कराराद्वारे दुसऱ्या महायुद्धानंतर पेरले गेले, तेथे ४४ मित्रराष्ट्रांच्या ७३० प्रतिनिधींनी जागतिक चलन म्हणून अमेरिकन डॉलरशी सोन्याचे मापदंड बदलून जागतिक अर्थव्यवस्थेत अमेरिकेला एक शक्तिशाली राष्ट्र म्हणून प्रस्थापित करण्याचा मार्ग मोकळा केला होता. या परिषदेत झालेल्या करारानुसार फक्त अमेरिकेला डॉलर छापण्याची क्षमता मिळाली आणि बाकीच्या देशांनी आपली चलने डॉलरशी जोडली, तर डॉलरला सोन्याच्या किमतीशी जोडले गेले. जगाच्या सोन्याच्या पुरवठ्यापैकी तीनचतुर्थांश सोने अमेरिकेकडे असल्याने कालांतराने इतर चलनांच्या तुलनेत डॉलरचे मूल्य वाढू लागले आणि उर्वरित देशांच्या अर्थव्यवस्थांवर डॉलरचे वर्चस्व वाढल्याने डॉलर मजबूत होत गेला. १५ ऑगस्ट १९७१ रोजी अमेरिकेने ब्रेटन वूड्स प्रणाली रद्द करून डॉलरचे सोन्यात रूपांतर करण्याची क्षमता संपुष्टात आणली, परंतु तोपर्यंत डॉलरचे वर्चस्व प्रस्थापित झाले होते आणि अमेरिकेने या ताकदीचा चांगलाच वापर केला.

अमेरिका ही जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असल्याने डॉलरला इतर विदेशी चलनांच्या तुलनेत अधिक स्थिरता मिळते. जगातील विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडे ठेवलेल्या आंतरराष्ट्रीय चलन साठ्यापैकी सुमारे ६०% डॉलर्समध्ये आहेत. देशांनी घेतलेली बहुतांश कर्जेही डॉलरमध्ये दिली-घेतली जातात. आंतरराष्ट्रीय व्यापारातही डॉलरचा सर्वाधिक वापर केला जातो. नव्वदच्या दशकातील आर्थिक सुधारणांपासून भारताने आपल्या चलनाचा विनिमय दर निश्चित करण्यासाठी व्यवस्थापित फ्लोटिंग दर प्रणाली लागू केली आहे, तेव्हापासून इतर चलनांच्या तुलनेत रुपयाचा विनिमय दर बाजार-आधारित मागणी-पुरवठ्यावर आधारित आहे. या घटकांमध्ये अप्रत्यक्षपणे देशाच्या सरकारचा फारसा हस्तक्षेप नसतो. तथापि, प्रतिकूल परिस्थितीतही रुपया संपूर्ण ताकदीने आपल्या देशाच्या मजबूत अर्थव्यवस्थेचा ध्वजवाहक होऊन कायम राहिला आहे.

(ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.) उज्ज्वल दीपक कोलंबिया युनिव्हर्सिटीतून शिक्षण uvd2000@columbia.edu

बातम्या आणखी आहेत...