आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशनिवारी मी तुर्कीतील अंतालिया येथील गजबजलेल्या जुन्या बाजाराच्या रस्त्यावर खरेदी करत होतो. ही प्रसिद्ध खाऊ गल्ली आहे, तिथे वाहनांना प्रवेश निषिद्ध आहे, पण चार मुख्य रस्ते या गल्लीला मिळतात. त्यामुळे जेवणासाठी एका रेस्टॉरंटमधून दुसऱ्या रेस्टॉरंटमध्ये जाणाऱ्या लोकांच्या सुरक्षिततेसाठी चार पादचारी सिग्नल आहेत. संपूर्ण तुर्कीमधील कार मालकांना या पादचारी सिग्नलचे काटेकोरपणे पालन करावे लागते, ते फक्त तुमच्या-माझ्यासारखे लोक रस्ता ओलांडतात म्हणून नाही, तर अनेक भटके प्राणी ते सिग्नल ओलांडतात म्हणूनही. प्राणी आपल्या सिग्नल यंत्रणेचा आदर करतात हे पाहण्याचे हे ठिकाण आहे. मी या चारपैकी एका जंक्शनवर उभा होतो आणि लाल सिग्नलला हिरवा व्हायला ४० सेकंद लागले. अचानक माझ्या पायाखालून काही तरी बाहेर आले आणि माझ्या शेजारी उभे राहण्यासाठी मला किंचित डावीकडे ढकलले. माझ्या उजवीकडे असलेला तुर्की माणूस हसला आणि त्या लठ्ठ भटक्या मांजरीला अतिरिक्त जागा देण्यासाठी उजवीकडे थोडा पुढे सरकला. तो म्हणाला, ‘जॅक, तू पुन्हा इथे आलीस?’ जणू ते एकमेकांना ओळखत असावेत. मांजरीने आपले नाव ऐकताच डोके वर केले, परंतु अचानक सिग्नलवर लक्ष केंद्रित केले, जणू ती तेथील घड्याळावरील आकडे वाचू शकते. सिग्नलला अजून १६ सेकंद बाकी होते. पहिल्या ओळीत दुसरी मांजर आली. तिने पादचारी सिग्नल हिरवा होण्याची वाट पाहिली. मला आश्चर्य वाटले ते म्हणजे त्या दोघींना आधी सिग्नल ओलांडायचे होते म्हणून त्यांनी रांग मोडली, पण रस्त्यावरून एक इंचही हालचाल केली नाही. सिग्नल हिरवा होताच बाकीचे सगळे हलू लागले तेव्हाच त्या हलू लागल्या. माझ्या समोरच्याने फोटो काढला असता तर पहिल्या ओळीत रस्ता ओलांडताना तीन माणसं आणि दोन मांजरं असल्याचं दिसलं असतं! अशा जंक्शनवरून आणखी किती प्राणी गेले हे पाहण्यासाठी मी मागे वळलो तेव्हा रस्त्याच्या पलीकडे असलेल्या एका रेस्टॉरंटच्या मालकाने मला खुर्ची देऊ केली आणि मला बसून हे मजेदार प्राणी रेस्टॉरंटमधून रेस्टॉरंटकडे जाताना पाहण्यास सांगितले. कारण येथील स्थानिक लोक त्यांना खायला घालत राहतात आणि त्यांना त्यांची खाण्याची वेळदेखील माहीत आहे. या देशातील सर्व कुत्रे आणि मांजरी लठ्ठ आहेत, तर मानव तंदुरुस्त आहेत, कारण माणसांना जास्त चालावे लागते, तर प्राण्यांना मोफत अन्न मिळते. भटक्या मांजरी हे तुर्कीमधील प्रिय प्राणी आहेत, तिथे त्या रस्त्यावर मुक्तपणे फिरतात. स्थानिक लोक त्यांना मनापासून मदत करतात आणि अनेक ठिकाणी मांजरी शुभंकर आहेत. उदा. बोझी नावाचा भटका कुत्रा स्थानिक ट्रामने प्रवास करतो आणि इस्तंबूलच्या नगरपालिकेच्या वेतनावर आहे. त्याचप्रमाणे उइकुकू (स्लीपीहेड) नावाची मांजर कराओलू शाळेत प्राथमिक वर्गाच्या टेबलावर बसते आणि आवडीने वर्गात जाते. ही देखभालच मुलांना मजबूत बनवते! आश्चर्य वाटले? त्याचे उत्तर येथे आहे. फंडा असा की, स्ट्राँग म्हणजे बलवान लोक स्वतःसाठी उभे राहतात, तर अधिक बलवान म्हणजे स्ट्राँगर लोक इतरांसाठी उभे राहतात. भावंडांची किंवा प्राण्यांची काळजी घेऊन मुलांमध्ये हा गुण जोपासा.
एन. रघुरामन, मॅनेजमेंट गुरू [raghu@dbcorp.in]
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.