आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुकिंग टिप्स:सँडविच अधिक चविष्ट करण्यासाठी

टीम मधुरिमा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रेडपासून अनेक प्रकारचे सँडविच तयार केले जातात. कधी बटाटे तर कधी इतर भाज्या किंवा दही आणि मेयोनीज लावून त्यात टोमॅटो, काकडी ठेवून सँडविच करतात. परंतु हे तयार करताना काही गोष्टी केल्यास ते आणखी स्वादिष्ट बनतात, तसेच आरोग्यदायीही ठरतात.

भाजण्याची पद्धत
बऱ्याचदा लोक ब्रेडला आधी मिश्रण लावतात, मग तेल किंवा बटर लावून भाजतात. यामुळे सँडविच नरम पडते. तसेच ते पचनासाठीही योग्य नसते. यासाठी अगोदर ब्रेडला दोन्ही बाजूंनी तेल किंवा तुपावर भाजून घ्या. त्यानंतर मिश्रण लावून सँडविच करा. यामुळे ब्रेड व्यवस्थित भाजला जाईल, शिवाय क्रिस्पी आणि पचनासाठीही योग्य असा बनेल.

भाज्या शिजवणे
बऱ्याचदा भाज्या कच्च्या राहिल्यास अपचन होते. यासाठी भाज्यांना वाफेवर किंवा व्यवस्थितरीत्या शिजवून घ्यावे. यानंतरच सँडविचमध्ये भरावे.

जास्त भरलेले सँडविच नकोच
सँडविच जास्त भरल्यास चव खराब लागते. यासाठी मर्यादित भाज्याच भरल्या पाहिजे. जास्त भाज्या किंवा बटाटे टाकल्यास चव वाढेल हा विचार चुकीचा आहे. यामुळे ब्रेड फाटतात शिवाय सँडविच ओलसर वाटते. शिवाय भरलेले मसाले बाहेर येतात. त्यामुळे मर्यादित भाज्या भरूनच सँडविच करावे.

असे करा स्प्रेड
मेयोनीज़, स्प्रेड चीज़ किंवा एखादा सॉस सँडविचासाठी वापरायचा असल्यास थेट स्प्रेड न करता भाज्यांमध्ये मिक्स करून वापरल्यास चव वाढेल स्प्रेडही मस्त होईल.

बातम्या आणखी आहेत...