आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Today Should Be Dedicated To The Happiness Of Humanity | Article By :Pt. Vijayshankar Mehta

जीवनमार्ग:आजचा दिवस मानवतेच्या आनंदास समर्पित असावा

औरंगाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विज्ञानाच्या या युगात येऊ घातलेल्या भूकंपाचे संकेत देणारी यंत्रे बनवली गेली आहेत, पण तो थांबवण्याचे तंत्र आजतागायत तयार झालेले नाही. त्याचप्रमाणे माणसामध्ये येणाऱ्या वियोग, वेदना, दुःख किंवा नैराश्याच्या भूकंपावर बाहेरून उपचार करता येत नाहीत. या मानसिक आजारांवर उपचार म्हणजे त्यांची लक्षणे आणि समज. राम येणार आहे, असा भरत विचार करत होते आणि तुलसीदासांनी लिहिले- ‘राम बिरह सागर महं भरत मगन मन होत। बिप्र रूप धरि पवनसुत आइ गयउ जनु पोत।’

भरताचे मन रामाच्या विरहसागरात बुडत होते. त्याच वेळी पवनपुत्र हनुमान ब्राह्मणाच्या वेशात असा आला, जणू कोणाला बुडण्यापासून वाचवण्यासाठी बोट आली आहे. आपण सगळेच कधी ना कधी अशा खोलात बुडतो, पण हनुमान जीवनात आला तर आपण त्यावर मात करू शकतो. तसेच या वेळी अक्षय्य तृतीया आपल्याला दुःखातून बाहेर काढण्यासाठी हनुमानाच्या रूपात आली आहे. मग मानवतेच्या आनंदासाठी ही तिथी का समर्पित करू नये? हनुमानाचे स्मरण करून आज एक दिवा लावावा की, त्यामध्ये आपण जागृत व्हावेच, पण इतरांसाठीही प्रार्थना करूया की, सर्व जण निरोगी, आनंदी, प्रसन्न राहावेत. एक दिवा लावा यासाठी लावावा की आपण सुखी तर कुटुंब सुखी, कुटुंब सुखी तर समाज सुखी आणि समाज प्रसन्न असेल तर राष्ट्रही आनंदी होईल. Facebook:Pt. Vijayshankar Mehta

बातम्या आणखी आहेत...