आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा:आजच्या शिक्षकांत प्रशासकीय कौशल्यही हवे

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

१९६० च्या दशकाची सुरुवातच होती. नागपुरात सरस्वती विद्यालयाच्या प्राचार्य आर.डी. स्वामी यांनी मी वर्गात जात असतानाच बोलावले. माझा वर्ग केबिनसमोरच होता. त्या कडक आवाज, कठोर वागणे अाणि उंचीमुळे ओळखल्या जात होत्या. मला वाटले त्या मला उशिरा आल्याने रागावतील. मी आत जाताच वॉशरुमला गेलो होतो, असे सांगितले. त्या म्हणाल्या, मला माहीत आहे. इकडे या आणि पैसे व चिठ्ठी घेऊन अकाउंटंटला द्या. एखादी प्रतिष्ठित प्राचार्या तुमची जबाबदारीच्या कामासाठी निवड करते आणि तुमच्यावर विश्वास ठेवत असेल तर तुमच्यात किती आत्मविश्वास निर्माण होईल. मी धावतच ऑफिसमध्ये गेलो काम फत्ते केले. नंतर मी वर्गात गेलो. सायंकाळी शाळा सुटण्यापूर्वी त्यांनी मला पुन्हा बोलावले आणि छोटे पाकीट देत ते माझ्या घराजवळ राहणाऱ्या वर्गमित्राच्या घरी देण्यास सांगितले. मी प्रश्न न करता हेही काम केले. दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या आईने स्वामी मॅडमला देण्यासाठी आणखी एक कव्हर दिले. मी विचार करू लागलो की, शेवटी हे काय चाललेय. माझा पोस्टमनसारखा का वापर केला जातोय? पण आईने कोडे सोडवले. माझा मित्र वडिलांसोबत गावी गेला होता. त्याने महिन्याला द्यावी लागणारी २ रुपये फी तीन महिन्यांपासून भरली नव्हती. तो फी भरण्याचा शेवटचा दिवस होता आणि स्वामी मॅडम त्या छोट्या शहरातील बहुतांश कुटुंबाना ओळखत होत्या. त्यामुळे त्यांनी आपल्या खिशातून ६ रुपये फी भरून माझ्या मित्राच्या घरी पावती पोहोचवली होती. सोबत टिपण लिहिले की, जेव्हा तुमचे पती येथील तेव्हा ते परत करा. मध्यवर्गीय कुटुंबांत मान-सम्मान मोठी गोष्ट असते. त्यामुळे त्या महिलेने एका पाकिटात ६ रुपये ठेवून माझ्या घरी दिले होते, जेणेकरून मी ते स्वामी मॅडमपर्यंत पोहोचवू शकेल.

सहा दशकांपूर्वीची ही घटना च्रिजेशविषयी ऐकल्यानंतर या शनिवारी आठवली. यूपीच्या श्रावस्ती जिल्ह्यातील या १३ वर्षी मुलाचा याच अाठवड्यात कथितरीत्या अनुपम पाठक या शिक्षकाच्या मारहाणीत मृत्यू झाला. कारण त्याच्याकडून फी भरण्यास उशीर झाला होता. यापूर्वी दहा दिवसांआधी पाठकच्या मारहाणीमुळे त्याच्या नाकातून रक्तही निघाले आणि चेहरा सुजला होता. घटना ८ अॉगस्टची आहे. गुरुवारी त्याच्या मृत्यूची माहिती त्याच्या काकांनी दिल्यानंतर गुन्हा दाखल झाला. पोलिस प्रत्यक्षदर्शी विद्यार्थ्यांचे जबाबही घेऊ शकले असते. पण शिक्षकाला अजून अटक झाली नाही. अनेक शाळांत शिक्षकांकडून प्रशासकीय कामे करून घेतली जातात. यात फी जमा करून घेणेही आलेे. याआधीही असे होत होते. पण सध्या पूर्वीपेक्षा अधिक होत आहे. बहुधा पुढील काळात ते आणखी वाढेल. शिक्षण आता उद्योग बनत आहे. त्याचे नियंत्रण सरकारऐवजी खासगी हातात जात आहे. वाढत्या दबावामुळे आता संतुलन सुटू न देणे व हिंसक न होणे ही शिक्षकांची जबाबदारी बनली आहे. पण हे वरील घटनेत घडले नव्हते.

फंडा असा की, सध्याच्या काळात शिक्षक प्रशासकीय कामांच्या दबावाखाली येऊन मुलांवर राग काढू शकत नाहीत. आज शिक्षक समुदायाकडून शिक्षण आणि प्रशासकीय कामामध्ये ताळमेळ बसवण्याच्या कौशल्याची अपेक्षा शाळा व्यवस्थापनाकडून नक्कीच केली जात आहे.

एन. रघुरामन, मॅनेजमेंट गुरू [raghu@dbcorp.in]

बातम्या आणखी आहेत...