आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा:अति प्रमाणातील ‘मध’ही विषासमान असतो

औरंगाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एक श्लोक आहे - ‘अतिकामाद्दशग्रीवः अतिलोभात् सुयोधनः। अतिदानात् हतः कर्णः अति सर्वत्र वर्जयेत्:।’ याचा अर्थ असा की, ‘अति लोभामुळे रावणाचा नाश झाला, दुर्योधन अति वासनेने आणि कर्ण अति दानधर्माने बुडाला. त्यामुळे अतिरेक वाईट आहे असे म्हणतात.’ दोन घटना वाचून मला या श्लोकाची आठवण झाली, एक महाराष्ट्रातील एका खेड्यातील आणि दुसरी ब्रिटनमधील लंडन या श्रीमंत शहरातील.

यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील बान्सी गावाने ११ नोव्हेंबरला सर्व मुलांसाठी मोबाइलवर बंदी घालण्याचा ठराव एकमताने मंजूर केला. दहावीनंतर कॉलेजला जाणाऱ्या मुलांना खुश होण्याची गरज नाही, कारण या गावाने नियमाचेही पालन केले आहे. युनायटेड नेशन्सने परिभाषित केल्याप्रमाणे मुले म्हणजे १८ वर्षांपेक्षा कमी वयाची मुले. त्यामुळे गावात १८ वर्षांखालील कोणीही मोबाइल वापरू शकत नाही. याचे उल्लंघन केल्यास २०० रु. दंड आहे. सरपंच गजानन टाले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत जनतेशी संवाद साधल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. कोविडच्या काळात शिक्षण ऑनलाइन असल्याने मुले मोबाइलचा अतिवापर करत होती, मोबाइल ही त्यांच्यासाठी अत्यावश्यक वस्तू झाल्याने ही सोय त्यांच्या जीवनात स्लो पॉयझन होऊन मुले व्यसनाधीन झाली. मोबाइलमुळे मुलांच्या शिक्षणावर परिणाम होत असून ते अनेकदा नको त्या अॅपचा वापर करू लागल्याकडे सरपंचांनी लक्ष वेधले. सभेचे सचिव पी. आर. आडे यांनी सांगितले की, आम्हाला हे माहीत होते, त्यामुळे आम्ही हा प्रस्ताव ग्रामसभेत आणला. यामुळे मुलांना अभ्यासात लक्ष घालण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल, असे सांगत अनेक गावकऱ्यांनी याचे स्वागत केले. विशेष म्हणजे तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या मुलांनीही स्वतःत चांगल्या सवयी रुजवण्यासाठी हे एक चांगले पाऊल असल्याचे सांगत या निर्णयाचे स्वागत केले आहे. वरवर पाहता पालकही या निर्णयावर खुश आहेत आणि त्यांनी आश्वासन दिले आहे की, केवळ त्यांची मुलेच नाही, तर गावातील इतर मुलांनीही मोबाइल पाहू नये. असा निर्णय घेणारे हे महाराष्ट्रातील पहिले गाव आहे. आजूबाजूच्या गावांतील लोकांनीही त्याचे कौतुक केले आहे.

दुसरीकडे लंडनच्या महापौरांनी व्हिजन झीरो रस्ता सुरक्षा कृती योजनेचा एक भाग म्हणून शहरातील वेगमर्यादा ३२ किमी (२० मैल) प्रति तास करण्याची योजना जाहीर केली आहे. प्रणाली अधिक सुरक्षित करण्याच्या उद्देशाने पुनर्रचना केलेले रस्ते, स्पीड कॅमेरे आणि वेगमर्यादा असलेले रस्ते कार्यान्वित केले जातील. वेगमर्यादेवर काम करण्याबरोबरच लंडनच्या महापौरांनी २००५-०९ च्या तुलनेत २०२२ च्या अखेरीस रस्त्यांवर मृत किंवा गंभीर जखमी होणाऱ्या लोकांची संख्या ६५% कमी करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. लंडनमधील अपघातांमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या शून्यावर आणण्यासाठी २०३० साठी वेगळे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, मोबाइल आणि वाहन या दोन्ही गोष्टींचा शोध मानवाने लावला, एक जलद प्रवासासाठी, तर दुसरी दळणवळणासाठी. परंतु, अति वेगाने त्यांचा अतिवापर केल्याने चांगल्यापेक्षा अधिक नुकसान झाले.

{ फंडा असा ः शोध गरजेचे आहेत, पुढे जाणे हा सभ्यतेचा भाग आहे, परंतु कोणत्याही गोष्टीचा गैरवापर हा शोध लावणाऱ्याच्या विरोधात जातो. त्यामुळे त्या शोधांचा आनंद कसा घ्यायचा हे आपल्यावर अवलंबून आहे.

एन. रघुरामन, मॅनेजमेंट गुरू [raghu@dbcorp.in]

बातम्या आणखी आहेत...