आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा:एचएनआयसाठी प्रवासाचे स्वत.चे नियम असावेत

औरंगाबाद23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

५४ वर्षे हे जाण्याचे वय नाही, विशेषत: उच्च नेटवर्थ व्यक्तींमध्ये (एचएनआय-अति-धनवान). तेही रस्त्यावरील एका अपघातात! सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते एकटेच नव्हते तर सोबत इतर एचएनआयदेखील होते. होय, मी दोन एचएनआय, टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्री आणि ग्लोबल स्ट्रॅटेजी ग्रुप, केपीएमजीचे संचालक जहांगीर पंडोले यांच्या अकाली मृत्यूबद्दल बोलत आहे. मुंबईपासून १०० किमी अंतरावर असलेल्या अहमदाबादहून परतत असताना रविवारी हा अपघात झाला.

मी दोघांनाही वैयक्तिकरित्या ओळखत होतो. पंडोले ड्यूकची शीतपेयांची फॅक्टरी चालवत होते तेव्हा त्यांच्या कुटुंबाला अनेक वेळा भेटलो आहे. ड्यूक माझे आवडते पेय मँगोला बनवत असे. टाटाचे चेअरमन होण्याच्या काही मिनिटे आधी सायरस यांच्याशी भेट झाली होती. ते अर्थशास्त्रात जाणकार होते. माझ्या मते, केवळ त्या उंचीच्या लोकांनीच नाही तर प्रत्येक एचएनआयने (लक्षात ठेवा प्रत्येकजण त्यांच्या कुटुंबासाठी एचएनआय असतो) प्रवासाशी संबंधित नियमांचे पालन केले पाहिजे. तपासात नेमके काय घडले हे उघड होणार असले तरी, कंपन्यांनी निवडक प्रमुख लोकांसाठी प्रवासाचे काही नियम असणे आवश्यक केले पाहिजे. या भीषण अपघाताच्या काही मिनिटांपूर्वी काय घडले हे आपल्याला माहीत नसले तरी, काही सावधगिरी बाळगणे केव्हाही चांगले आहे. सर्व प्रथम, जर दोन ठिकाणांदरम्यान कनेक्टिंग फ्लाइट असेल तर एचएनआयने देशातील रस्ता मार्ग निवडू नये. करोडो रुपये खर्चून कारमध्ये सेफ्टी फीचर्स असू शकतात पण रस्ते तसे नसतात हे लक्षात ठेवा. याशिवाय, आम्ही कोणालाही ड्रायव्हिंग लायसन्स देतो, यूएई आणि इतर देशांप्रमाणे ट्रॅफिक कायद्याच्या उल्लंघनावर लक्ष ठेवत नाही. याचाच परिणाम असा होतो की, आपल्याकडे सर्वात वाईट ट्रॅफिक सेन्स आहे. अशा परिस्थितीत, जर एचएनआय कोणत्याही कारणास्तव रस्त्याने प्रवास करत असेल, तर स्टँडबाय ड्रायव्हरसह पायलट वाहन आवश्यक आहे आणि त्याच्यासोबत नेव्हिगेटर असणे आवश्यक आहे. मी भारतात कुठेही पाहिलेले सर्वात शिस्तबद्ध ड्रायव्हिंग भारतीय सैन्यात आहे. त्यांच्यासाठी एक निश्चित वेगमर्यादा आहे - ताशी ६० किमी. ती फक्त टँकसाठी नाही. सीमावर्ती राज्यांमध्ये त्यांच्या गाड्या, व्हॅन, ट्रक कसे फिरतात ते पहा. प्रत्येक सामान्य माणूस त्यांना मागे टाकतो. एचएनआयला घेऊन जाणाऱ्या कारचीही वेग मर्यादा असावी. आणि शेवटी तुम्ही कोण आहात हे महत्त्वाचे नाही, तुम्ही नियमांचे पालन केले पाहिजे. रविवारी क्रॅश झालेल्या मर्सिडीजसह अनेक कार कंपन्यांचे म्हणणे आहे की मागे बसणाऱ्यांनीदेखील सीट बेल्ट घातला पाहिजे. सीटबेल्ट ही संरक्षणाची पहिली भिंत आहे आणि बेल्ट न घातल्यास एअरबॅगचा काहीही उपयोग होत नाही. जर तुम्ही बेल्ट व्यवस्थित बांधला नसेल तर एअरबॅग उघडणार नाहीत. माझ्यावर विश्वास ठेवा, मागच्या सीटवर बसलेल्या मिस्री आणि पंडोले यांनी सीट बेल्ट घातला असता तर त्यांचे प्राण वाचले असते.

फंडा असा आहे : लक्षात ठेवा की किमान तुमच्या कुटुंबासाठी तुम्ही एचएनआय आहात. रस्त्यावरुन प्रवास करण्याची वेळ असेल तर तुम्ही ‘काहीही होणार नाही’ असे न म्हणता प्रत्येक वाहतूक नियमाचे पालन केले पाहिजे.

एन. रघुरामन, मॅनेजमेंट गुरू [raghu@dbcorp.in]

बातम्या आणखी आहेत...