आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायबर सुरक्षा:टीव्ही देखील होऊ शकतो हॅक!

सोनाक्षी सक्सेना5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्मार्ट फोनसारखाच अाता टीव्ही देखील स्मार्ट होऊ लागलाय. त्याला आपण इंटरनेटशी जोडू शकतो, अॅप्सचा वापर करू शकतो, ब्राउजर पाहू शकतो आणि अनेक प्रकारचे गेम्सदेखील यात असतात. ब्लूटूथ, सोशल मीडिया आणि कॅमेरासारखे बरेचसे फिचरही यात असतात. हा टीव्ही सॉफ्टवेअरवर आधारित असतो आणि इंटरनेटने कनेक्ट होऊ शकतो, त्यामुळेच हॅकर्ससाठी याला हॅक करणे आणि वैयक्तिक माहिती मिळवणे खूप सोपेे होते.

टीव्ही हॅक होतो कसा?
जर टीव्ही वाय-फायशी कनेक्ट असेल तर हॅकर्स मालवेअर पाठवून टीव्हीमध्ये असलेल्या कॅमेरा आणि मायक्रोफोनचा वापर करू शकतो. त्यांच्या मदतीने तो सर्व गोष्टी ऐकू शकतो आणि लक्षदेखील ठेवू शकतो. याशिवाय, वेब ब्राउजिंग आणि अॅप्सच्या मदतीने व्हायरसदेखील येऊ शकतो.
खरं तर टीव्हीमध्ये अँटिव्हायरस किंवा सायबर सिक्युरिटी सॉफ्टवेअर नसते, त्यामुळे त्यात व्हायरस येऊ शकतो. म्हणून ब्राउजिंग हिस्ट्री, पासवर्ड आणि माहिती काढणे सोपे होते.

सुरक्षित नेटवर्क
टीव्हीचे सॉफ्टवेअर आणि फर्मवेअरला वेळोवेळी अपडेट करा. सुरक्षिततेच्या दृष्टीनेही हे आवश्यक आहे. वाय-फाय राउटर सुरक्षित ठेवा. यामुळे फक्त टीव्हीच नाही, तर त्याच्याशी संबंधित इतर डिव्हाइसदेखील सुरक्षित राहतील. यासाठी राउटरमध्ये व्हीपीएन म्हणजे व्हिज्युअल प्रायव्हेट नेटवर्क इन्स्टाॅल करा.

या व्यतिरिक्त कठीण पासवर्ड ठेवा. कोणत्याही अनोळखी नेटवर्कला टीव्हीशी जोडू नका. बरेचदा कोणत्याही डिव्हाइसला कनेक्ट करण्यासाठी पॉप-अप येऊ शकतो, म्हणून टीव्ही स्क्रीनवर कनेक्ट करण्यासाठी कोणताही अनोळखी पर्याय आला तर तो स्वीकारू नका. टीव्हीमधील अनावश्यक, वापरात नसलेले अॅप्स काढून टाका.

कॅमेरा व मायक्रोफोन
टीव्हीमध्ये मायक्रोफोन आणि कॅमेरा असेल, तर तो पर्याय बंद ठेवा. याचा उपयोग गरज असेल तरच करा. कॅमेरा झाकून ठेवा.

हॅकिंग झाल्याचे कसे समजेल?
} टीव्हीच्या स्क्रीनवर पॉप-अप्स किंवा मेसेज दिसायला लागतात. टीव्हीचा रिमोट एकदम काम करणे बंद करतो. रिमोट अगदी चांगला असेल, सर्व बटन, बॅटरीदेखील चांगली असेल आणि तरीही रिमोट काम करत नसेल, तर या डिव्हाइसमध्ये मालवेअर येण्याचे हे संकेत आहेत.
} टीव्ही एकदम मंद चालत असेल, तर तेे धोकादायक आहे. टीव्हीमध्ये माहीत नसलेले अॅप्स इन्स्टॉल होत असतील तर हा देखील मालवेअरचा संकेत आहे. टीव्हीचे सेटिंग; जसे रंग, भाषा बदलले असतील आणि हा बदल तुम्ही केला नसेल तर तुमचे डिव्हाइस सुरक्षित नाही, हे लक्षात घ्या.
} समजा, तुम्ही आेटीटी अॅप्स उघडले आणि लॉग इन केलेल्या अकाउंटमधून लॉगआउट झालात. नंतर लॉग इन केल्यावरही एररचा मॅसेज येत असेल आणि पासवर्ड बदलल्यावरही एरर येत असेल, तर हे हॅिकंगमुळे देखील होऊ शकते. टीव्ही हॅक केल्यानंतर हॅकर त्या व्यक्तीला त्याच्या अॅप अकाउंटमधून ब्लॉक करतो किंवा पासवर्ड बदलतो. हॅक केलेल्या अकाउंटवर त्याचे पूर्ण नियंत्रण असते. एवढेच नाही, तर त्या व्यक्तीच्या क्रेडिट कार्ड, बँक खाते आदी माहितीवर देखील हॅकर नियंत्रण करू शकतो.

बातम्या आणखी आहेत...