आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • TV Media Has Become A Medium To Spread Hatred Everywhere| Article By Rajdeep Sardesai

दृष्टिकोन:सर्वत्र द्वेष पसरवण्याचे माध्यम झाला आहे टीव्ही मीडिया

औरंगाबाद16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नूपुर शर्मा वादानंतर भारतीय टीव्ही न्यूज मीडियावर सर्वत्र टीका होत आहे. डावे-उदारमतवादी म्हणतात की, न्यूज टीव्ही हे द्वेष करणाऱ्यांसाठी बोलण्याचे व्यासपीठ होत आहे. दुसरीकडे, उजव्या विचारसरणीचे आणि विशेषत: हिंदुत्ववादी म्हणतात की, न्यूज टीव्हीवर निवडक राग व्यक्त केला जातो आणि त्यावर काहीही बोलूनही मुस्लिम कट्टरतावादी वाचतात. मग अखेर सत्य काय आहे?

आधी डाव्या-उदारमतवाद्यांचा युक्तिवाद घेऊ. न्यूज टीव्ही द्वेष करणाऱ्यांचा आवाज बनत आहे का? याचे संक्षिप्त उत्तर होय आहे. आज जातीय विष ओकणाऱ्यांची संख्या वाढत आहे यात शंका नाही. १९९० च्या दशकात सरकारी दूरदर्शनच्या मक्तेदारीतून मुक्त होऊन खासगी वृत्तवाहिन्या उदयास आल्या, तेव्हा त्यांच्यात आज जी तीव्र स्पर्धा दिसते ती नव्हती. टीव्ही न्यूज इंडस्ट्री नवीन होती, तेव्हा संपादक व पत्रकारांवर बाजाराचा दबाव नव्हता आणि पत्रकारिता-प्रथम धोरण घेऊन ते काम करू शकत होते. पण, आज देशात २४ तास ४०० न्यूज चॅनेल्स सुरू आहेत आणि अधिकाधिक प्रेक्षक आपल्याकडे वळवण्याची स्पर्धा सुरू आहे, त्यामुळे खळबळ माजवण्याची स्पर्धा लागली आहे. यामुळेच आज न्यूज टीव्हीवर प्रचलित असलेल्या वादविवादातील चर्चांचे खूप ध्रुवीकरण झाले आहे. पूर्वी ग्राउंड रिपोर्ट््स हे बातम्यांचे स्रोत होते, पण आता टीव्ही स्टुडिओमध्ये बसलेले लार्जर दॅन-लाइफ अँकर बातम्यांऐवजी गोंगाटाची संस्कृती निर्माण करण्यात व्यग्र आहेत. आता चर्चांचे स्वरूपही आमूलाग्र बदलले आहे. मला आठवते की, १९९० च्या दशकात मी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विठ्ठलराव गाडगीळ यांना त्यांच्या धर्मनिरपेक्षतेवरील एका निबंधावर चर्चा करण्यासाठी आमंत्रित केले होते. गाडगीळांइतकेच प्रखर विचारवंत अरुण शौरी दुसरी बाजूला मांडतील, असा माझा प्लॅन होता. पण गंभीर विषयाला मला तू-तू-मैं-मैंमध्ये बदलायचे नाही, असे म्हणत गाडगीळ यांनी नकार दिला. त्या काळात एखाद्या विषयावर चर्चा करण्यासाठी किंवा वादविवाद करण्यासाठी दोन-तीन पाहुणे आणणे अवघड होते, पण आज टीव्ही चॅनेलवर दहा-दहा विश्लेषक असतात आणि ते एकमेकांवर ओरडत असतात. हे केवळ भारतातच नाही, तर जगभर घडत आहे, त्यामुळे बातम्या गोळा करण्याची पारंपरिक पत्रकारिता संपुष्टात येत आहे. केवळ धार्मिक विषयांवर गोंगाट करणारे प्रेक्षक मिळतील, असे टीआरपी नावाच्या सदोष रेटिंग प्रणालीच्या प्रभावाखाली अनेक वृत्तवाहिन्यांनी गृहीत धरले आहे. तथापि, महागाई किंवा अर्थव्यवस्था यांसारख्या नीरस समजल्या जाणाऱ्या विषयांवर कोणतेही चॅनल वादविवाद का करेल? अमेरिकेतील फॉक्स न्यूज द्वेषातून नफा मिळवण्यासाठी कुप्रसिद्ध आहे. तर भारतातील वृत्तवाहिन्या आता फॉक्सपेक्षाही पुढे गेल्या आहेत, पण समाजातच द्वेषयुक्त भाषणे रुजली आहेत, तेव्हा केवळ न्यूज-टीव्हीला दोष देऊन काय होणार? या वर्षाच्या सुरुवातीला एका हेट स्पीच ट्रॅकरने सांगितले की, २०१४ पासून मीडियामध्ये असंसदीय भाषेच्या वापराची सुनामी आली आहे.

आता उजव्यांच्या युक्तिवादाबद्दल बोलूया. आठवते का, फॉक्स न्यूज जवळजवळ एक दशकापूर्वी अमेरिकेत उदयास आली, कारण उजव्या विचारसरणीच्या राजकारण्यांचा डाव्या-उदारमतवाद्यांच्या मुख्य प्रवाहातील अमेरिकन वृत्त माध्यमांच्या वर्चस्वावर आक्षेप होता. सुरुवातीला फॉक्स न्यूजही फेअर अँड बॅलन्स्डबद्दल बोलली. हळूहळू उजव्या विचारसरणीला आणि त्यांच्या शब्दांना माध्यमांमध्ये अधिक स्थान मिळू लागले. भारताच्या दृष्टिकोनातून बोलायचे झाले तर एकेकाळी आपल्या प्रसारमाध्यमांमध्ये हिंदुत्ववादी विचारांना स्थान दिले जात नव्हते, हा आरोप नाकारता येणार नाही. पण, १९९२ नंतर भाजप भारतीय राजकारणाचा केंद्रबिंदू बनला तेव्हा बदल दिसू लागले. पूर्वी डावे-उदारमतवादी कथा तयार करायचे आणि चालवायचे, पण आता अनेक न्यूजरूममध्ये उजवे बोलतात. न्यूज टीव्हीमध्ये अल्पसंख्याक समाजातील कट्टरतावाद्यांना प्रोत्साहन दिले जाते हाही भ्रम आहे. बहुतेक वेळा टोपी घातलेल्या मुस्लिम प्रवक्त्यांची टीव्हीवरील वादविवादांमध्ये खिल्ली उडवली जाते आणि त्यांचा एक काळा चेहरा समोर ठेवला जातो. यातील काही टीव्ही-मौलानांचा प्रामाणिकपणाही संदिग्ध आहे. (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.)

राजदीप सरदेसाई ज्येष्ठ पत्रकार rajdeepsardesai52@gmail.com

बातम्या आणखी आहेत...