आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Understand The Darkness And Light In Your Mind | Article By Pt. Vijayshankar Mehta

जीवनमार्ग:आपल्या मनातील अंधार आणि प्रकाश समजून घ्या

औरंगाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगात प्रत्येकाला कशाची तरी भीती असते. केवळ ईश्वर भयमुक्त आहे. भीती ही खूप वाईट गोष्ट आहे. त्यामुळे स्वत:ला आणि सोबत राहणाऱ्या इतर लोकांना त्यापासून मुक्त ठेवा. आपल्याला भविष्याची भीती वाटते आणि या भीतीमुळेच आपण इतरांना आपलेसे करतो. काही वेळा भीतीचे प्रमाण इतके असते की, पालक मुलांना धमकावून चांगले बनवण्याचा प्रयत्न करतात. भीतीबरोबरच एक गोष्ट असते की तिचा वर्तमानावर परिणाम झाला नाही, तरी ती भविष्यापर्यंत सरकत जाते. आज जे मूल पालकांच्या रागावण्याला घाबरून चांगले होण्याच्या मार्गावर गेले, उद्या ते एकटे पडताच आई-वडिलांनी त्याच्या मनात बिंबवलेली भीती कमी होईल आणि त्यातून मुक्त होण्यासाठी ते सर्वप्रथम चुकीचे काम करेल. म्हणून भीती हा एक आजार आहे, ती बाहेरून येते आणि त्याचा इलाज म्हणजे निर्भयता, ती आतून प्रकट होते. असा विचार करा की, भीती हा अंधार आहे, निर्भयता हा प्रकाश आहे. आपल्या मनातील अंधार व प्रकाश समजून घेतला तर भीतीचा अंधार व निर्भयतेचा प्रकाश जीवनात सहज आणता येईल.

Facebook:Pt. Vijayshankar Mehta पं. िवजयशंकर मेहता humarehanuman@gmail.com

बातम्या आणखी आहेत...