आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवनमार्ग:निसर्गाचे संकेत समजून घेणे

औरंगाबाद9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मानवापेक्षा प्राणी-पक्षी निसर्गाच्या अधिक जवळ आहेत. त्यामुळे त्यांना निसर्गाचे संकेत, त्याची भाषा आपल्यापेक्षा जास्त कळते. स्वामी रामानुजाचार्य यांची आज जयंती आहे, त्यांनी देह आणि आत्मा-परमात्मा या विषयाला निसर्गाशी अतिशय चांगल्या प्रकारे जोडले होते. ते म्हणत, आत्मा-परमात्मा-निसर्ग हे तिन्ही एकच आहेत, हे समजताच आपला माणूस असण्याचा अर्थ बदलतो. आपण निसर्गाच्या जितके जवळ जाऊ तितके त्याचे संकेत समजणे सोपे होईल. पावसाचे संकेत माणसाच्या आधी मोराला मिळतात, असे म्हणतात.

हा आमच्यासाठी पुरेसा संकेत आहे. म्हणून आत्मा, परमात्मा आणि निसर्ग नीट समजून घेतल्यावर शरीराचा अर्थही समजेल. आपण शरीरावरच केंद्रित राहत असल्याने प्रत्येक जिवंत माणसाला एक तर मृत्यूची भीती वाटते किंवा मरण्याची घाई असते. मरण्याच्या घाईला आत्महत्या आणि मृत्यूच्या भीतीला नैराश्य म्हणतात. हे दोन्ही चांगले नाहीत. म्हणून आत्मा, परमात्मा व निसर्ग यांना योग्य वेळी समजून घेतले पाहिजे. हीच वेळ आहे हे समजून घेण्याची...

पं. िवजयशंकर मेहता humarehanuman@gmail.com Facebook:Pt. Vijayshankar Mehta

बातम्या आणखी आहेत...