आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Unknown Villages In The Mountains That Support Celebrities! | Marathi Artical

पर्यटन:नामवंतांना साद घालणारे डोंगरांमधील अनोळखी खेडे!

औरंगाबाद5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मी आणि माझे मित्र गेल्या उन्हाळ्यात सेंट मॉरिट्झहून (स्वित्झर्लंडचे प्रसिद्ध पर्यटनस्थळ) एका गाइडसह निघालो तेव्हा आम्ही कुठे जात आहोत हेही आम्हाला माहीत नव्हते. मी गेली तीन दशके जगभ्रमंती करत आहे, पण याआधी इतका सुंदर दिवस मी कधीच घालवला नव्हता. डोंगरावर जाताना आम्ही एका जुन्या वाड्यापाशी थांबलो. माझी नजर एका दुर्गम गावावर खिळली होती. एन्गाडिनच्या हिरव्या दऱ्यांमध्ये ते जडवलेल्या रत्नाप्रमाणे दिसत होते आणि त्याच्या भोवती स्वच्छ पाण्याची सरोवरे होती. गाइडने त्याचे नाव ठेवले : सिल्स मारिया. मला लगेचच २०१४ चा क्लाउड्स ऑफ सिल्स मारिया हा अत्यंत गाजलेला चित्रपट आठवला. यात ज्युलियन बिनोशे आणि क्रिस्टीन स्टीवर्ट मुख्य भूमिकेत होते. तो चित्रपट या गावावरचा होता का? नक्कीच. मग आपण तिथे जाऊ शकत नाही का? का नाही? सेंट मोरिट्ज से महज छह किमी दूर स्थित इस सुंदर गांवसेंट मॉरिट्झपासून अवघ्या सहा किमी अंतरावर असलेल्या या सुंदर गावाचे तपशील आमच्या एका दिवसाच्या बाइक टूरमध्ये दिवसभर समोर येत राहिले. अनपेक्षित रहस्यांनी भरलेली ही कथा होती.

आम्ही गावाकडे जात असताना वाटेत एक लाकडी घर दिसले. गाइडने सांगितले की, फ्रेडरिक नित्शे १८८० च्या दशकात सर्जनशीलतेच्या शिखरावर असताना ते वारंवार इथे येत असत. इथेच त्यांना टेन स्पेक जरथुस्त्र लिहिण्याची प्रेरणा मिळाली. नीत्शे यांच्याकडून प्रेरणा घेऊन मार्सेल प्रुस्ट, थॉमस मान, बोरिस पास्टर्नक, कार्ल जंग, विल्यम फॉकनर इत्यादीही त्याकडे आकर्षित झाले. हरमन हेसेने तर सिल्सचे वर्णन पृथ्वीवरील स्वर्ग असे केले होते. यातील बरेच लेखक याच वाल्डहॉस म्हणवल्या जाणाऱ्या लाकडी घरामध्ये राहत होते. आज या जागेचे १४० खोल्यांच्या हॉटेलमध्ये रूपांतर झाले आहे. आम्ही त्याच्या टेरेसवर दुपारचे जेवण करायला गेलो तेव्हा त्याचे मालक पॅट्रिक डायट्रिच आणि व्यवस्थापक फ्लोरिना क्विझेल यांनी आमचे स्वागत केले. एवढ्या छोट्या गावात इतके महान लेखक येऊन गेले, असे आम्ही त्यांना सांगितले तेव्हा त्यांनी त्यात सुधारणा करत केवळ लेखकच नव्हे, तर रिचर्ड स्ट्रॉससारखे संगीतकार, अल्बर्ट आइन्स्टाइनसारखे शास्त्रज्ञ, चार्ली चॅप्लिनसारखे अभिनेते आणि मार्क चॅगलसारखे चित्रकारही येऊन गेले आहेत.

परंतु, त्याच्या मुळात सिल्स हे सुप्रसिद्ध नावांऐवजी जुन्या कुटुंबांचे एक संकलन आहे. वाल्डहॉसमध्ये राहणारे सुमारे ८० टक्के लोक पिढ्यान््पिढ्या येथे आलेल्या कुटुंबातील पाहुणे आहेत. नंतर आम्हाला कळले की, २०१९ मध्ये कोडा नावाच्या चित्रपटाचे चित्रीकरणही येथे झालेे, त्यात पॅट्रिक स्टीवर्टने वृद्ध पियानोवादकाची भूमिका केली होती. चित्रपट फारसा चालला नाही, परंतु सिल्सच्या विहंगम दृश्यांमुळे समीक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. शहरापासून दूर, वरच्या प्रदेशात आम्हाला १६ व्या शतकातील ग्रेव्हसलवास गावदेखील दिसत होते, ते २० दगडी घरांचे संकुल आहे. १९७८ मध्ये येथे हेइदी नावाच्या चित्रपटाचा रिमेक बनवण्यात आला. ब्लूबेल्स, यलो राॅक रोझेस आणि इतर जंगली फुलांनी सजलेला हा परिसर अजूनही त्या चित्रपटात वर्णन केलेल्या डोरफ्लायच्या काल्पनिक शहराची आठवण करून देतो. परतताना आम्हाला सांगण्यात आले की, १९३० च्या दशकात अॅन फ्रँकदेखील कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी वाल्डहॉसमध्ये आली होती. ती तिच्या डायरीसाठी प्रसिद्ध आहे. या दिवसाच्या धक्कादायक रहस्यांचा कधी अंत होईल का, असा प्रश्न मला पडला. सूर्यास्ताच्या केशरी चकाकीत आम्ही हळूहळू एन्गाडीनच्या खोऱ्यात हरवून गेलो. एखाद्या नामवंताच्या पाहुणचाराचा वर्षानुवर्षे अभिमान बाळगणारी काही गावे आहेत. आणि सिल्स मारिया असे आहे, ज्याच्याकडे सांगण्यासारखे बरेच काही आहे आणि त्याला गौरवगाथा कथन करण्यात रस नाही, असे दिसते!

रुचिर शर्मा ग्लोबल इन्व्हेस्टर व बेस्टसेलिंग रायटर breakoutnations@gmail.com

बातम्या आणखी आहेत...