आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्रलेख:आरोग्यात तत्काळ दर्जेदार संशोधनाची नितांत गरज

छत्रपती संभाजीनगर13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इ न्फ्लुएंझाचा एच ३ एन २ स्ट्रेन अधिक संसर्गजन्य आहे. नीती आयोगाने केंद्रातील सर्व संबंधित मंत्रालयांबरोबर परिस्थितीचा आढावा घेतला. आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना सतर्क राहण्यास सांगितले आणि डॉक्टरांनी मास्क व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. विकासाच्या या युगात जग एका अदृश्य विषाणूसमोर सतत खुजे दिसत आहे. हे खरे आहे की, सेल्युलर बायोलॉजी, जनुकीय अभियांत्रिकी आणि विषाणूशास्त्र या अजूनही सूक्ष्मजीवशास्त्राच्या क्षेत्रात तुलनेने नवीन शाखा आहेत आणि त्यावरील संशोधन फारसे विश्वासार्ह नाही. हेदेखील खरे आहे की, विषाणूचे स्वरूप बदलत असताना जेनेटिक बदल किंवा म्युटेशन समजून घेण्यासाठी वैज्ञानिक साधने अद्याप विकसित झालेली नाहीत. पण हे नवे संकट पाहता जगातील वैज्ञानिक समुदायाला त्यात पूर्ण बौद्धिक शक्ती पणाला लावावी लागेल. अडचण अशी आहे की, काही देश गुप्तपणे विज्ञानाच्या नावाखाली जनुकीय बदलाचे प्रयोग करत आहेत, जेणेकरून त्याचा शस्त्रासारखा वापर करता येईल. वुहानमध्ये होत असलेल्या जनुकीय संशोधनाची चीनने जागतिक समुदायासमोर माहिती दिली नाही. या सर्वांसाठी ‘नागोया प्रोटोकॉल’ तयार करण्यात आला होता आणि त्यानंतर डब्ल्यूएचओनेही अनेक बैठका घेतल्या, परंतु जागतिक स्तरावर योग्य प्रोटोकॉल आणि त्याअंतर्गत क्रांतिकारी संशोधन करण्याची परिस्थिती आजही निर्माण झालेली नाही. दिवसेंदिवस जगाला धोका निर्माण करणाऱ्या, वेश बदलणाऱ्या विषाणूंविरुद्ध जनुकीय विज्ञान संशोधनाला जागतिक स्तरावर नवी उंची द्यावी लागेल आणि त्यांची म्युटेशन व प्रसाराची शक्ती थांबवण्याचे मार्ग शोधावे लागतील. जास्त लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये मास्क आणि शारीरिक अंतर जास्त काळ टिकू शकत नाही.

बातम्या आणखी आहेत...