आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा:त्वरित आपली चांगली जागतिक प्रतिमा निर्माण करण्याची गरज

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

या आठवड्यात अमेरिका-भारत विमानातील घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण सोशल मीडियात खळबळ माजली आहे. २६ नोव्हेंबरला एअर इंडियाच्या बिझनेस क्लासमध्ये एका मद्यधुंद प्रवाशाने सहकारी महिला प्रवाशावर लघवी केल्यानंतर ही बाब उघडकीस आली. त्यानंतर माफी मागितल्यानंतर प्रवाशाला जाऊ देण्यात आले. महिलेने अध्यक्ष एन. के. चंद्रशेखरन यांना संतप्त पत्र लिहिले आणि दिल्ली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला तेव्हा वाद वाढला. आणि पोलिस त्याचा शोध घेत मुंबईत आले तेव्हा त्याने चुकीचा पत्ता दिल्याचे आणि लखनौला राहत असल्याचे समजले. मी तेथील उच्च अधिकाऱ्यांशी बोललो तेव्हा त्यांनी कबूल केले की, शुक्रवारपर्यंत (मी स्तंभ लिहिला तेव्हा) दिल्ली पोलिस त्याच्यापर्यंत पोहोचू शकले नव्हते. बँकॉक-भारत थाई स्माइल एअरवेजच्या विमानात काही प्रवाशांच्या शिवीगाळीसह मारहाणीचा असाच एक व्हिडिओ गेल्या आठवड्यात समोर आला होता. काही दिवसांपूर्वी प्रवासी-केबिन क्रूच्या भांडणाचा व्हिडिओही समोर आला होता, या इस्तंबूल-भारत इंडिगो एअरलाइनमध्ये एका प्रवाशाने क्रूला ‘नोकर’ म्हटले. आपण अशा सार्वजनिक वर्तनासाठी इंग्रजी शिकलो आहोत का, याचा विचार करणे भाग पडत आहे. आपण इथेच थांबलो नाही. माध्यमांत आणखी काही प्रकरणे आली, तिथे एक अमेरिकन पासपोर्टधारक भारतीय क्रूला विचारताना दिसला, ‘अमेरिकन पासपोर्ट धारकांसाठी स्वच्छतागृह कुठे आहे?’ मला प्रश्न पडतो की, पासपोर्टच्या कव्हरवर वेगळा देश लिहिला असेल तर वेगळे स्वच्छतागृह मिळते का? हवे ते अन्न न मिळाल्याने लोकांनी अन्नाचे ताट फेकून दिल्याच्या शेकडो घटना आहेत! नशेत असलेल्या आपल्यापैकी काहींना वाटते की, आपण ३५,००० फूट उंचीवर नव्हे, तर रेस्टॉरंटमध्ये आहोत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या प्रवाशांच्या अशा कृत्याचे अनेक दीर्घकालीन परिणाम होतील. प्रथम, नियम लागू केले जातील, ते कठोर असू शकतात आणि सर्व नियमांचे पालन करावे लागेल. उदा. विमानाच्या आत गुन्हा किंवा निवडक असभ्यता आढळल्यास (आंतरराष्ट्रीय टोकियो करार) वैमानिकाला विमान परत आणून प्रवाशाला पोलिसांच्या स्वाधीन करण्याचा अधिकार आहे. विचित्र परिस्थितीत हातकडी लावण्याचाही अधिकार आहे. ते तसे करत नाहीत, परंतु याचा अर्थ असा नाही की, काही प्रवाशांनी सीटवर लघवी करण्यापर्यंत जावे. हे खूप वाईट आहे. दोन वर्षांपूर्वी बंगळुरू विमानतळावरील एका प्रवाशाने चामड्याच्या पट्ट्यात शिवलेला स्विस चाकू कसा आणला होता, त्याचा सर्व भारतीय विमानतळांवर परिणाम झाला होता, हे आठवा. आज प्रत्येक विमानतळावर प्रवाशांना स्क्रीनिंगसाठी त्यांचे बेल्ट काढावे लागतात. उद्या प्रत्येक गुन्ह्यासाठी दारूला जबाबदार धरले जाऊ लागले तर आंतरराष्ट्रीय सेवेतून ती काढून घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रत्येक लक्झरी परत घेतली जाऊ शकते. { फंडा असा ः आपली जागतिक प्रतिमा सुधारण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी आणि कर्मचारी व सहप्रवाशांशी कसे वागावे याबद्दल शिष्टाचार मार्गदर्शक तत्त्वे असणे ही काळाची गरज आहे.

एन. रघुरामन, मॅनेजमेंट गुरू [raghu@dbcorp.in]

बातम्या आणखी आहेत...