आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्यभान:मोकळ्या हवेत फिरा

औरंगाबाद9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्यापैकी अनेक जण असतील जे क्वचितच घराबाहेर पडतात. उदा. काही गृहिणींचा संपूर्ण दिवस घरकाम करण्यात जातो. ज्या महिला वर्क फ्रॉम होम करतात त्यांचा संपूर्ण वेळ कॉम्प्युटरसमोर व्यतीत होतो. सामान्यपणे यात काही विशेष वाटत नाही. पण, जास्त वेळ घराबाहेर न पडल्याने मन आणि तब्येतीवर परिणाम दिसून येतो.

आरोग्य आणि मनावर परिणाम : नेहमी घरात बसल्याने ताजी हवा आणि सूर्यप्रकाश मिळत नाही.घराबाहेर फिरून आल्याने मूड सुधारतो, तणाव, उच्चरक्तदाब कमी होतो. झोपेचे चक्र व्यवस्थित राहते. चिडचिड कमी होते. शिवाय सूर्यप्रकाशातील व्हिटॅमिन डी जे मानसिक आरोग्यासाठी आवश्यक आहे ते तुम्हाला मिळते.

गृहिणी असाल तर काही घरगुती कामे जी बाल्कनी, अंगण, गच्चीवर बसून करता येण्यासारखी असतात ती तिथे जाऊन करा. उदा. कपडे गोळा करणे, भाजी निवडणे, कापणे इ.

निसर्ग फोटोग्राफीसारखे काही छंद ज्यासाठी तुम्हाला बाहेर जाण्याची गरज आहे ते जोपासा. वर्क फ्रॉम होम असेल आणि बाहेर जायला वेळ नसेल तर सकाळी फिरायला वेळ काढा. बेडचा वापर वर्क डेस्क म्हणून करू नका. खिडकीजवळ टेबल-खुर्चीची व्यवस्था करा. प्रत्येक आठवड्यात मित्र किंवा कुटुंबासह निसर्गरम्य ठिकाणी जाण्याची योजना करा. या निमित्तानेे, आपण खुल्या हवेच्या संपर्कात येऊ शकतो.

टीम मधुरिमा

बातम्या आणखी आहेत...