आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआयुष्यात नियमित पायी चालणे अत्यंत फायदेशीर आहे. हे औषधासारखे काम करते. संगणकावर सतत तासन्तास काम करताना शरीराची हालचाल कमी होते. दीर्घकाळ अशा स्थितीत बसल्यामुळे हृदयरोग, कॅन्सर आणि मृत्यूची जोखीम वाढते. यामुळे आपल्याला आठवड्यात कमीत कमी १५० मिनिटे व्यायाम करणे आवश्यक आहे. यामुळे सर्जनशीलता वाढते, स्मरणशक्ती शार्प होते. एकटेपणा दूर होतो. मोकळ्या हवेत ३० मिनिटे चालल्यामुळे नकारात्मक विचारही येत नाहीत. द ब्रिटिश जर्नल ऑफ स्पोर्ट्स मेडिसिनमध्ये नुकत्याच प्रकाशित झालेल्या १९६ संशोधनावरील निष्कर्षात ही बाब समोर आली आहे. अभ्यासानुसार, यामुळे पाठीखालच्या भागात होणाऱ्या वेदनेपासून आराम मिळतो.
शरीराचा कोणताही अवयक दुखत असेल की आखडला असेल तर चालल्यामुळे ही समस्या कमी होण्यास मदत मिळते. उपचारादरम्यानही त्याची मदत मिळते. अभ्यासात आढळले की, रात्री चालल्यामुळे चांगली झोप येते. एका अभ्यासात ज्यांच्या गुडघ्यांमध्ये संधीवात होता,अशा ५० वर्षांहून जास्त वयाच्या लोकांना सहभागी करून घेतले. असे असतानाही ते नियमित चालत होते.डाॅ. ग्रेस हसाओ-वेई लो म्हणाले, सतत चालल्यामुळे सांधेदुखी कमी होते. सर्वसाधारणपणे याच्या उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रतिजैविक औषधासाठी प्रतिरोधक बनले आहे. ५% संसर्ग आता औषध प्रतिरोधक आहे.
मित्र करण्यात मदत मिळते, व्यक्ती सामाजिक होते कॅथरीन पियर्सन यांच्यानुसार, पायी चालल्याने आरोग्यासोबत सामाजिक संबंधासाठीही चांगले असते. नवीन मित्र करण्यात मदत मिळते. नवीन विचार येतो. व्यक्ती सामाजिक होण्यास मदत हाेते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.