आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • War Is Happening Anywhere In The World; It Is Fought On The News Channels, A Pointless Interview With A TV Expert|Marathi Article By Alok Puranik

होळी स्‍पेशल निरर्थक मुलाखत:युद्ध जगभरात कुठेही होत असो; ते वृत्तवाहिन्यांवर हमखास लढले जाते, एका टीव्ही तज्ज्ञाची निरर्थक मुलाखत

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

होळीच्या वेळी दिवाळीसारखे वातावरण आहे, बॉम्ब फुटत आहेत. रशियाच्या बॉम्बफेकीने टीव्ही चॅनेल्सची मजा झाली आहे. जनता टीव्हीवर बॉम्बवर्षाव मोठ्या आवडीने पाहते. युद्ध कुठेही असले तरी ते टीव्हीवर लढले जाते... निवेदक भांडतात... एक निवेदक रागाने ओरडत असतो... काल रात्री बॉम्ब टाकण्याचा अल्टिमेटम दिला होता आणि तो अजूनही टाकलेला नाही. बॉम्ब का टाकले जात नाहीत?... युद्धादरम्यान एक टीव्ही अँकर आणि तज्ज्ञ यांच्यातील संभाषणातील ठळक मुद्दे-

अँकरः युक्रेन संकटाची ताजी परिस्थिती काय आहे? तज्ज्ञः हे बघा.. खूप मोठे संकट आले आहे. सासू-सुनांच्या मालिका कोणी पाहत नाही. स्त्रियादेखील टीव्हीवर सकाळपासून संध्याकाळपर्यंत युक्रेन युद्ध पाहत आहेत. सासू-सुनांवरील मालिकांचे प्रायोजक आता काय करायचे या चिंतेत आहेत. अँकरः मग या समस्येवर उपाय काय? तज्ज्ञः माझ्या मते एक सोपा उपाय आहे की, जे ब्रँड्स सासू-सुनांवरील मालिका प्रायोजित करत आहेत, त्यांनी या युद्धाच्या वृत्तंकनाचे प्रायोजकत्व घ्यावे. उदा. बॉम्ब वर्षावाच्या या भागाचे प्रायोजक आहेत अमुक टूथपेस्टवाले... बॉम्बवर्षावाच्या त्या भागाचे प्रायोजक आहेत बाबा छाप कॅप्सूल्स. अँकरः असं कसं बोलताय तुम्ही? तज्ज्ञः तुम्हाला टीव्हीचे गणित माहीत नाही, प्रेक्षकांना आवडते, त्याला प्रायोजक मिळतात, मग तो बॉम्बवर्षाव असो किंवा गांजा-चरस ओढणे. उदा.- युक्रेनमध्ये कुमकुम भाग्य. युक्रेनमध्ये नागीनचा नवीन सिझन, हे सर्व काही नवीन असू शकते.

बातम्या आणखी आहेत...