आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचित्रदुर्ग हा कर्नाटकातील ३० ऐतिहासिक जिल्ह्यांपैकी एक आहे. त्याने लोकसाहित्य जपले आहे, त्यात आदिवासी संस्कृतीच्या परंपरा, चालीरीती आणि श्रद्धा प्रतिबिंबित करणारी गाणी, श्लोक, महाकाव्यांचा समावेश आहे. चित्रदुर्ग त्याच्या विचित्र पुराणकथा, पाषाणयुगातील मानवी वस्ती, प्राचीन, ऐतिहासिक, सांस्कृतिक-धार्मिक महत्त्व, हजारो वर्षांची संस्कृती व पुरातनता आणि आधुनिकीकरणाच्या एकत्रीकरणाने समृद्ध आहे. या जिल्ह्यातील बोम्मनहल्ली या गावातील लोक १६ आणि १७ जानेवारी रोजी पाच दिवसांच्या ‘मरिकंबा जत्रे’मध्ये अनवाणी गेले होते. इथल्या लोकांचा असा विश्वास आहे की, या उत्सवाच्या पहिल्या दोन दिवशी गावातील देवता मरिकंबा, दुर्गांबिका आणि मरम्मा गावात फिरतात. आणि पादत्राणे घालणे त्यांच्यासाठी अनादर होईल, म्हणून प्रतिबंधित आहे. ३,००० लोकसंख्या असलेले गाव जत्रेदरम्यान स्वच्छ राहते, कारण प्रत्येकाने रस्त्यावर काहीही फेकू नये किंवा थुंकू नये किंवा कोणतीही गोष्ट टाकू नये, जेणेकरून अनवाणी पादचाऱ्यांना त्रास होईल. गावात कोणीही बाहेरचे बूट, चप्पल घालून प्रवेश करू नये, यावर तरुण लक्ष ठेवतात. मला गेल्या आठवड्यातील रविवारच्या उत्सवाची आठवण झाली, जेव्हा मी ऐकले की, येथून २०० किमीवरील बंगळुरूमध्ये अनेक ठिकाणी भूजलात नायट्रेट्स (निर्धारित मर्यादा ४५ मिग्रॅ/लि.) व क्लोराइड (निर्धारित मर्यादा २५० मिग्रॅ/लि.) चे प्रमाण अनुज्ञेय मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे आढळले. घरगुती सांडपाण्याची अशास्त्रीय विल्हेवाट लावल्यामुळे किंवा उघड्यावरील घाणीमुळे नायट्रेट्स जमिनीच्या पाण्यात जातात. शहरातील जलकुंभांमध्ये सांडपाणी मिसळले जात असल्याने भूगर्भातील पाण्यात नायट्रेटचे प्रमाण वाढले. वातावरण सुरक्षित नसेल तर बोअरवेलचाही उपयोग नाही.
केवळ भूजलच नाही, तर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (सीपीसीबी) नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालात देशातील २७९ नद्यांच्या बाजूने असे ३११ प्रदूषित पट्टे ओळखले आहेत व २०२२ पर्यंत महाराष्ट्रात सर्वाधिक ५२ असे रुव्हर स्ट्रेच आहेत. हे अध्ययन देशातील नद्यांच्या पाण्याच्या गुणवत्तेचे नियतकालिक मूल्यांकन होते व या भागांमध्ये बायोकेमिकल ऑक्सिजन मागणी (बीओडी) पातळी मोजली गेली. या भागात बीओडी ३ मिग्रॅ/लि. पेक्षा जास्त होते, ते पाण्याची कमी गुणवत्ता दर्शवते. महाराष्ट्रात सर्वात जास्त उद्योग आहेत, ते नदीतील प्रदूषणात भर घालतात व भूजल दूषित करतात, त्यामुळे अगदी १०० किमी खाली अत्यंत विषारी बनते. ते भूजल स्वच्छ करणे शक्य नाही. अहवालानुसार, बिहार, छत्तीसगड, हरियाणा, हिमाचल, झारखंड यासह १३ हून अधिक राज्यांमध्ये प्रदूषण वाढले आहे, ही आपल्यासाठी चिंतेची बाब आहे, कारण महाराष्ट्राच्या तुलनेत ही छोटी औद्योगिक राज्ये आहेत. मुलांसाठी व भावी पिढ्यांसाठी निसर्गाच्या या अनोख्या देणगीच्या संवर्धनाचा विचार करण्याची हीच वेळ आहे. बोमनहळ्ळी गावातील तरुण जशी निगराणी ठेवतात, त्याचप्रमाणे आपणही जलस्रोतांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. {फंडा असा की, ‘माझ्या पाण्यात काय आहे?’ अशी चिंता आपण व्यक्त करू लागल्यामुळे स्वच्छ पिण्याचे पाणी विकण्याचा किंवा त्याच्याशी संबंधित कोणताही व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांसाठी ही इशाऱ्यासह एक संधीही आहे.
एन. रघुरामन, मॅनेजमेंट गुरू [raghu@dbcorp.in]
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.