आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • We Are Not Looking For Alternatives, We Are Just Looking For Alternatives| Article By Chinmay Mishra

विशेष:आपण पर्यायी दृष्टिकोन नाही, तर केवळ पर्याय शोधत असतो

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या छांदोग्योपनिषदात म्हटले आहे, ‘हे सोम्य! हे (जग) सुरुवातीला सत्, एकमेव, अद्वितीय होते.” “हे सोम्य! हे कसे घडू शकते? असत्यातून सत्य कसे होईल?’ त्याला वाटले, ‘मी अनेक व्हावे, माझा विस्तार व्हावा.’ त्याने तेज उत्पन्न केले. तेजाने विचार केला, ‘मी अनेक व्हावे, माझा विस्तार व्हावा.’ त्याने जल उत्पन्न केले. त्या पाण्याने विचार केला, ‘आपण पुष्कळ होऊया, आपण विस्तारूया.’ त्यांनी अन्न तयार केले. या सर्व जीवांमध्ये फक्त तीनच बीजे आहेत, म्हणजे फक्त तीन प्रजाती किंवा प्रकार आहेत. अंडज (अंड्यातून जन्माला येणारा जीव), जीवज (बालकांसारखे जीवनाने परिपूर्ण) व उद््भिज (पृथ्वीतून बाहेर येणारे. उदा. झाडे, झुडपे, झरे इ.)

जीवनाची ही व्याख्या लक्षात ठेवली तर सृष्टीचे मूळ नियमही समकालीन असल्याचे स्पष्ट होते. यात कोणताही मूलभूत फरक होणे शक्य नाही. मग गेल्या काही दशकांत पृथ्वीवरील जीवसृष्टी धोक्यात दिसायला लागली असे काय घडले? हे संकट वर नमूद केलेल्या तिन्ही बीजांमध्ये स्पष्टपणे दिसून येते. पशू-पक्षी, मानव व प्राणी आणि वनस्पती जग सर्व धोक्यात आहेत. निसर्ग स्वयंनिर्मित असेल तर तो नष्ट करता येईल का? काही दशकांपूर्वीपर्यंत आपण निसर्गावर पुरुषाचा (मानव) विजय साजरा करत होतो, पण प्रत्यक्षात तो पद्धतशीर पराभवच होता. आपण ज्या विकासाच्या डोंगरावर चढत होतो, त्या चढण्याच्या प्रक्रियेत आपण आपला उतरण्याचा मार्ग नष्ट करत होतो. पायवाट वापरण्याऐवजी आपण तयार केलेली वाट हळूहळू रुंद होत गेली. त्या रुंद रस्त्यासाठी वापरलेल्या विकास ब्रँडच्या रोडरोलरने ती सारी जमीन नापीक केली. आता तिथे कोंब फुटतच नाहीत.

पृथ्वीने लाखो-कोट्यवधी वर्षांपासून स्वतःमध्ये खूप काही साठवून ठेवले होते. माणसाने एकीकडे निसर्गावर अतिक्रमण केले असताना दुसरीकडे स्वत:वरही अतिक्रमण केले आहे. त्याचे प्रत्येक पाऊल अमरत्व प्राप्त करण्यासाठी कमी-अधिक प्रमाणात प्रेरित होते. अशा स्थितीत भविष्य हे आपलेच आहे असे त्याला वाटू लागले. अमरत्वाची ती प्रक्रिया निदान त्याला दीर्घायुष्य देऊ शकली. १९५० मध्ये जगाची लोकसंख्या २.५ अब्ज होती, आज ती ७.५ अब्ज आहे. म्हणजे तिप्पट वाढ. त्याच प्रमाणात हरितगृह वायूंचे उत्सर्जनही वाढले आहे. आपण पृथ्वी किंवा पर्यावरण वाचवण्याचा प्रयत्नच करत नाही. आपल्याला फक्त अर्थव्यवस्था वाचवायची आहे. वापर वाढवायचा आहे. यामुळे निसर्ग वाचेल? आपण केवळ पर्याय शोधतो, पर्यायी दृष्टिकोन नाही, ही वस्तुस्थिती आहे. आपल्याला हरित व्यवस्था हवी, पण हरित तंत्रज्ञान हा श्रीमंत देशांचा वारसा आहे. त्याची पातळी युरोप-अमेरिकेच्या पातळीपर्यंत पोहोचेल तेव्हा भारतही कार्बन उत्सर्जन घटवेल. ३५ कोटींचा देश व १३५ कोटींच्या देशात सारखेच प्रदूषण पसरले तर त्याचे परिणाम काय होतील?

भारताला ५० अंश तापमानात काचेच्या बाह्य भिंती बनवून तापमानवाढ रोखायची आहे का? प्रत्येक घरात कार आणून प्रदूषण थांबवायचे आहे? शेती रसायनावर अवलंबून करून नद्या वाचवायच्या आहेत? धरणे बांधून नद्या वाचवायच्या आहेत का? वाचायचे आणि वाचवायचे असेल तर उत्पादन घटकांमध्ये बाह्य ऊर्जेचा वापर अत्यंत मर्यादित करावा लागेल. गांधींचे फक्त स्मरण करून उपयोग होणार नाही, त्यांना स्वीकारावे लागेल. अन्यथा, आपण पश्चात्तापाने त्यांच्या मूर्तीवर डोके आपटत असू, तो दिवस दूर नाही.

(ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.) चिन्मय मिश्र ज्येष्ठ पर्यावरणवादी chinmay.saroj@gmail.com

बातम्या आणखी आहेत...