आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • We Need To Change The Way We Learn In The Age Of AI | Article By NIdi Kundliya

तंत्रज्ञान:एआयच्या काळात शिकण्याची पद्धत आपण बदलायला हवी

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपण यूपीआय, इलेक्ट्रिक वाहने, घरी लेझर हेअर रिमूव्हल, क्रिप्टोकरन्सी आणि डिजिटल हेल्थकेअरसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाची सवय करण्याचे प्रयत्न करत असतानाच आता अचानक एक असे नवे तंत्रज्ञान आले आहे, जे आपल्याला आणखी एका क्रांतीच्या तोंडावर उभे करू शकते. हे आहे ओपन एआय, ज्याची सुरुवात सॅन फ्रान्सिस्कोतील एका कंपनीने केली आहे. यात काही असे फीचर्स आहेत जे नेहमीसाठी आपल्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या गोष्टी बदलण्यात सक्षम आहेत, जसे काही लिहिणे, मुलांना शिकवणे, लिहिणे, वाचने वा विश्लेषण करणे आदी. एलन मस्क यांनी अर्थपुरवठा केलेल्या या फाउंडेशनच्या ताज्या चॅटबॉटमुळे प्राध्यापक, प्रोग्रामर्स, ग्राफिक डिझायनर्स आणि लहान पत्रकार काही वर्षांतच आपल्या नोकऱ्या गमावू शकतात.

ओपन एआयच्या सर्वात महत्वाच्या फीचर्सपैकी एक आहे- चॅटजीपीटी. हे एक सामान्य इंटरफेससारखे आहे, ज्यात तुम्ही काही प्रश्न विचारता वा काहीतरी सांगता, ज्याचे उत्तर चॅटजीपीटीद्वारे दिले जाते. तो आपला कंटेंट इंटरनेटमधून मिळवतो. मग ते गुगलपेक्षा वेगळे कसे? फरक असा आहे की, गुगल कोणत्याही शंकेचे उत्तर देण्यासाठी अनेक वेब पेजेसमधून आवश्यक माहिती गोळा करते, तर चॅटजीपीटी आपल्याला माहितीचे असे टेक्स्ट उपलब्ध करते जे अत्यंत अचूक आहेत आणि तुम्हाला जे काही जाणून घ्यायचे आहे ते तुम्हाला पूर्णपणे पुरवण्यात सक्षम आहे. तुम्ही चॅटजीपीटीला कोणताही सोपा प्रश्न विचारा, जसे ‘म्युचुअल फंड्समध्ये गुंतवणूक करणे योग्य आहे का?’ किंवा ‘तू हरिवंशराय बच्चन यांच्या शैलीत एखादी अशी कविता लिहू शकतो का ज्यामुळे मुलाला सोशल मीडियाचा कमी वापर करण्यास प्रेरणा देईल?’ यावर तुम्हाला चॅटजीपीटी असे उत्तर देईल जे एखादा माणूसच देऊ शकतो. ती उत्तरं अचूक आणि मूलभूत असतात. चॅटजीपीटी गेल्या नोव्हेंबरपासूनच सामान्यत: मोफत उपलब्ध आहे. ते कविता लिहू शकते, निबंध लिहू शकते, कथा आणि चित्रपटाच्या पटकथा लिहू शकते आणि वेबसाइट कोड स्निपेट्सही जनरेट करू शकते. ओपन एआयवर एका दुसऱ्या फीचरचे नाव- डेले-ई आहे, जे मूलभूत कलाकृती रचण्यात सक्षम आहे. ते लाेगो, पेंटिंग्ज, ग्राफिक्ससह विविध शैलीतील चित्र बनवू शकते. हे जाणून तुम्ही गोंधळून गेला असाल तर अजून थोडं ऐका. सध्या आेपनएआय आउटपुट्स तयार करण्यासाठी जेवढ्या माहितीचा वापर करते, ते हिंदी महासागराएवढे आहे. मात्र, यंदा त्याच्या ज्या नव्या आवृत्ती येणार आहेत, त्या पाचही उपखंडांएवढ्या माहिती तपासून आऊटपुट देण्यात सक्षम असतील.

यात मानवाचे भवितव्य काय असेल? एआय आपल्या सर्वात क्रिएटिव्ह जीनियसपेक्षाही जास्त बुद्धिमान होईल का? बहुधा, उशीरा का असेना, मात्र हो. आज संगणक जेवढ्या वेगाने मोजणी करण्यात सक्षम आहे, जेवढी माणूस कधी करू शकणार नाही. नवे तंत्रज्ञान शाळा, महाविद्यालये, लॉ फर्ममधील वकील, लेखापाल, डाटा विश्लेषण, फॅक्ट चेकिंग, डिझाइन फर्म्स, मार्केटिंग, फॅशन इत्यादींचे जग कायमचे बदलून टाकेल. मात्र यासोबतच आम्हाला या गोष्टीवर विश्वास ठेवावा लागेल की, आपण मानव त्याचा योग्य वापर करणे आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यात यशस्वी होऊ. कारण मानव विचार करू शकतो, जुळवून घेऊ शकतो. आपण जोपर्यंत जुळवून घेऊ तोपर्यंत आपले अस्तित्व टिकून राहील. शाळांमध्ये मुलांना अजूनही लिहिणे शिकावे लागेल, मात्र आता त्यांना घोकंपट्टीऐवजी विचार करण्याची क्षमता, वैयक्तिक ताकद आणि तांत्रिक कौशल्य विकसित करण्याकडे जास्त लक्ष द्यावे लागेल. अलेक्साच्या काळात तुम्ही टेप-कॅसेट वाचू शकत नाही. मात्र जोपर्यंत मानवात विचार करण्याची व आत्मसात करण्याची क्षमता आहे, तोपर्यंत तो त्याची प्रासंगिकता टिकवून ठेवू शकेल, अशी आशा आहे. (ही लेखिकेची वैयक्तिक मते आहेत.)

निधी डुगर कुंडलिया युवा लेखिका आणि पत्रकार nidhidugar@gmail.com

बातम्या आणखी आहेत...