आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • What Can Schools And Parents In Our Country Learn From The World? | Article By Dr. Pravin Zaa

दृष्टिकोन:जगाकडून आपल्या देशातील शाळा व पालकांना काय शिकता येईल?

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाॅर्वेसह अनेक देशांमध्ये इंटरमीडिएट तीन वर्षांचे आहे, म्हणजे १०+२ ऐवजी १०+३. दहावीनंतर तुम्ही काय कराल, यासाठी शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याशी चर्चा सुरू केली जाते. विचारमंथन घडते. त्याची तयारी आधीच सुरू असते, आणि त्याचे दस्तऐवजीकरणही होते. दोन्ही बाजू (विद्यार्थी आणि समुपदेशक) आपले मत मांडतात आणि ते योग्य आहे की नाही, पालक किंवा मित्राच्या दबावाखाली विद्यार्थी प्रवाहात जात आहे का, हे पाहिले जाते. विद्यार्थ्याने ठरवले की त्याला वैद्यकीय क्षेत्रात जायचे आहे, पण जागा कमी आहेत, स्पर्धा जास्त आहे, अभ्यासक्रम वेगळे आहेत, कमिटमेंट्स वेगळ्या आहेत, तर त्याला नर्सिंगमध्ये की वैद्यकशास्त्रात, कोणत्या दिशेने जायचे आहे. हे समजावून सांगता येते. दहावीनंतर कुठल्या दिशेला जायचे या फेऱ्यातून बहुतांश विद्यार्थी आणि पालक जातात. हा एक चौक आहे, तिथे एकत्र शिकलेले शाळासोबती वेगवेगळ्या दिशेने जाऊ लागतात. कोणी अभियांत्रिकी, कोणी कला, कोणी वैद्यकीय, कोणी वाणिज्य, कोणी इतर पर्यायांकडे वळतात. बरेच लोक पुढील पारंपरिक शिक्षण निवडत नाहीत. ज्या देशांमध्ये शालेय शिक्षण अनिवार्य आहे, तिथेही १० वीनंतर सक्ती संपते. पण, कुठे जायचे हे कोण ठरवणार? साधारणपणे दहावी उत्तीर्ण होण्याच्या वेळी वय १५-१६ वर्षे असते, तेव्हा घटनात्मक पूर्ण प्रौढत्व प्राप्त होत नाही. मतदानाचा अधिकार नाही, वाहन चालवण्याचा परवाना नाही. ज्यांना आपले लोकप्रतिनिधी निवडता येत नाहीत, ते आपले भविष्य निवडण्यास सक्षम असतात का? यासाठी भारतात पालक मदत करतात, परंतु पालकांनादेखील सर्व पर्याय पूर्णपणे समजतात का? अशा परिस्थितीत योग्य समुपदेशनाचे महत्त्व वाढते. अशा रीतीने भारतात रेल्वेमध्ये बसलेले सहप्रवासीही करिअर-कौन्सिलिंग करतात की, या ठिकाणचे शिक्षण चांगले आहे, या व्यक्तीच्या मुलाने हे निवडले आणि आज लाखोंची कमाई करत आहे. पण, मी त्यांच्याबद्दल बोलत नाही. काही विद्यार्थी आपल्या वरिष्ठांशी व शिक्षकांशी बोलतात आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गाचा अवलंब करतात. ही काहीशी चांगली पद्धत आहे, पण इथेही अनेकदा लोकांची गल्लत होते. एका मार्गाचा अवलंब करून एक वरिष्ठ यशस्वी झाला तर सर्व होतीलच, असे नाही. प्रत्येक व्यक्तीच्या क्षमता आणि कल वेगळे असतात. दुसरे म्हणजे, जेवढे ज्येष्ठ, तितकी जास्त चर्चा आणि मग कोणता मार्ग योग्य असेल याबाबत लोक भरकटतात.

युरोपातील काही देशांमध्ये विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील आवड आणि क्षमता यांचे विश्लेषण करून चर्चा केली जाते. काही लोक अनिश्चित असतात किंवा गणितातील कौशल्य थोडे कमी असले तरी आता मेहनत करून या दिशेने जाऊ, असे ठरवतात. त्यांना एक वर्षाचा गणिताचा अभ्यासक्रम घ्यावा आणि नंतर पुन्हा चर्चा करावी, असे सुचवता येते. ही व्यावसायिक सल्लागार आणि विद्यार्थी यांच्यात घडणारी एक गुप्त आणि वैयक्तिक चर्चा आहे. ते अनुभवी समुपदेशक असतात, त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेले असते. अशा प्रकारचे करिअर समुपदेशन भारतातही अस्तित्वात आहे, परंतु बहुतांश पदवीनंतरचे आहेत. काही शाळांनी असे उपक्रम सुरू केले आहेत. अशा मार्गदर्शनाला प्रोत्साहन दिले पाहिजे. एखादी व्यक्ती शाळांमधील विद्यार्थ्यांचे व्यावसायिक समुपदेशक बनून जिल्ह्यातील शाळांमध्ये फिरून त्यांना योग्य मार्ग दाखवते तेव्हाच करिअर घडवता येते.

(ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.) डॉ. प्रवीण झा नॉर्वे येथील लेखक-डाॅक्टर doctorjha@gmail.com

बातम्या आणखी आहेत...