आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्रलेख:मानवी मेंदूवरील या प्रयोगाचा अर्थ काय?

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एलन मस्क यांनी आपल्या कंपनीकडून नव्या संशोधनासाठी मानवांवर क्लिनिकल चाचण्यांसाठी एफडीएकडे परवानगी मागितली. अलीकडच्या काळात जगातील अनेक कंपन्या व संस्थांनी प्राण्यांच्या मेंदूतील न्यूरॉन्स आणि संगणक सिग्नल यांच्यात संदेशांची देवाणघेवाण करण्याच्या दिशेने मोठे यश मिळवले. याला ब्रेन-कॉम्प्युटर इंटरफेस (बीसीआय) म्हणतात. मानवी मेंदूवरील हा प्रयोग यशस्वी झाल्यास वैद्यकविश्वात मोठा चमत्कार घडेल. त्यामुळे जन्मतः अंध असलेल्यांना दृष्टी मिळेल, अपस्मारावर नियंत्रण मिळवता येईल, मेंदूला झालेली इजा, पार्किन्सन्स, अल्झायमर व अर्धांगवायूचे आजारही बरे होऊ शकतात. गेल्या वर्षी एका प्रात्यक्षिकात एका कंपनीने दाखवून दिले की, माकडही पाँग (टेबल टेनिससारखा खेळ) खेळू शकते, कारण त्याचा मेंदू संगणकाशी जोडला होता. मस्क म्हणाले की, यापैकी एका प्रयोगात ते स्वतः हे उपकरण त्यांच्या मेंदूत बसवू इच्छितात. ज्याला ब्रेन-मशीन इंटरफेस (बीएमआय) म्हणूनही ओळखले जाते, त्या बीसीआयचा शोध कॅलिफोर्नियातील एका प्राध्यापकाने १९७३ मध्ये लावला होता आणि तेव्हापासून मानवी मेंदू व संगणक यांच्यात संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. इथपर्यंत ठीक आहे, पण धोका असा की, मानवी मेंदूवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्याचा गैरवापर होऊ शकतो किंवा त्याला चुकीचे संदेश देऊन गुन्हा केला जाऊ शकतो. देवाने मानवाला विवेकबुद्धी आणि भूतकाळातील अनुभवांवर आधारित गोष्टींचे तर्कशुद्ध संश्लेषण करण्याची क्षमता दिली आहे. कोणत्याही प्रकारे मानवाच्या या ईश्वरप्रदत्त क्षमतेवर नियंत्रण आले तर नैतिक मूल्ये आणि सामाजिक संबंधांमध्ये आमूलाग्र बदल घडून येतील.

बातम्या आणखी आहेत...