आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकी शास्त्रज्ञांनी न्यूक्लियर फ्यूजन रिअॅक्शन यशस्वीरित्या पूर्ण केली आहे.यामुळे सूर्याप्रमाणे शुद्ध ऊर्जा तयार केली. शास्त्रज्ञांनी कोणती चाचणी केली आणि त्याचा फायदा हाय होणार हे जाणून घेऊया...
न्यूक्लिअर फ्यूजन काय असते? न्यूक्लिअर फ्यूजर माणसाद्वारे विकसित सूर्याप्रमाणे स्वच्छ ऊर्जा निर्माण करण्याची प्रक्रिया आहे. जेव्हा दोन किंवा त्यापेक्षा जास्त अणु(अॅटम) एका मोठ्या अणुशी जोडला जातात तेव्हा मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्मिती होते. यात प्रामुख्याने ड्युटेरियम आणि ट्रिटियम तत्त्वांचा वापर होतो. हे दोन्ही हायड्रोजनचे आयसोटोप्स(समस्थानिक)आहेत, हे पाण्यात आढळतात. या यश मिळाल्यास जीवाश्म इंधनावरील माणसांचे अवलंबित्व कायमचे संपुष्टात येईल. त्यास “कृत्रिम सूर्य’ म्हणतात.
यातून किती ऊर्जा मिळेल? एक ग्लास पाण्यात मिळणाऱ्या ड्युटेरियममध्ये ट्रिटियम टाकल्यास मिळणाऱ्या ऊर्जेतन एका घराला एका वर्षापर्यंत वीज दिली जाऊ शकते. ट्रिटियम दुर्मिळ आणि प्राप्त करण्यात कठीण असते, मात्र त्याच्याकडून ती तयार केली जाऊ शकते. ही ऊर्जा निर्मितीत कोळशाच्या तुलनेत कमी हायड्रोजनची गरज असते.
हे न्यूक्लिअर फिजनपेक्षा कसे वेगळे? न्यूक्लिअर फ्यूजनमध्ये दोन वा त्यापेक्षा जास्त अणु एकाचवेळी जाेडले जातात. न्यूक्लियर फिजनमध्ये त्या उलट असते. यात एक मोठा अणुस दोन किंवा त्यापेक्षा जास्त छोट्या भागात विभागले जाते. याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्मिती होते, ही सध्या जगातील अणुभट्ट्यांना उष्णता देते. न्यूक्लियर फ्यूजनप्रमाणे फिजनमध्येही अणु विघटनाने उष्णता होते. मात्र, हे बाष्पशील किरणोत्सारी कचऱ्याचे उत्पादन करतात. ते सुरक्षित ठेवणे खूप आवश्यक असते. न्यूक्लियर फ्यूजरद्वारे ऊर्जा निर्मितीवर हा धोका नसतो. मात्र, फ्यूजन ऊर्जेचा वापर करण्याचे मोठे आव्हान ती दीर्घकाळपर्यंत ठेवण्याचे आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.