आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकतारमध्ये आयाेजित फिफा वर्ल्ड कप २०२२ मध्ये संसर्गजन्य आजाराचा इशारा देण्यात आला आहे. स्पर्धेत सहभागी लाेकांना काेविड-१९ सारखी श्वासासंबंधी बाधा हाेऊ शकते. मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम (एमईआरएस) या आजाराची भीती व्यक्त करण्यात आली आहे. सौदीच्या अनेक शहरांत असे अनेक बाधित आढळले. त्याबद्दल जाणून घेऊया..
कॅमल फ्लू कसा पसरताे? कतारमध्ये एमईआरएसचे २८ बाधित आढळून आले. बाधितांमध्ये उंटाच्या संपर्कात आलेल्यांची संख्यात जास्त हाेती. कतारमध्ये या संसर्गाचे प्रमाण प्रति १० लाखांमागे १.७ एवढे आहे. अशा प्रकारच्या संसर्गाचा धाेका असलेल्या लाेकांना कुबड असलेल्या उंटांच्या संपर्कात येऊ नये, असा सल्ला दिला जाताे. त्याशिवाय अशा लाेकांना उंटाचे दूध तसेच मांसापासून दूर राहण्यासही सांगितले जाते. असा संसर्ग झालेला पहिला रुग्ण २०१२ मध्ये समाेर आला हाेता. लक्षणे काय आहेत? श्वास घेण्यास त्रास, ताप, खाेकला, थंडी वाजणे, मांसपेशीत वेदना इत्यादी कॅमल फ्लूची सर्वसामान्य लक्षणे आहेत. यामुळे बाधिताला वांत्या हाेतात. हगवणही लागू शकते. या संसर्गातून मूत्रपिंड निकामी हाेणे, न्यूमाेनियासारखे गंभीर आजारही हाेऊ शकतात. परंतु बहुतांश आधीपासून एखाद्या आजाराने ग्रस्त असलेल्यांना अशा प्रकारची बाधा हाेऊ शकते. कारण अशा व्यक्तींची राेगप्रतिकारशक्ती क्षीण झालेली असते. मूत्रपिंड, कर्कराेग, मधुमेह असलेल्यांनी जास्त दक्षता घेतली पाहिजे. बचाव कसा करावा ? तूर्त तरी या आजारावर लस उपलब्ध नाही. संसर्ग लक्षात घेऊन औषधी दिली जाते. परंतु बचावासाठी परिसरात स्वच्छता ठेवा. प्राण्यांना स्पर्श केल्यावर हात धुतले पाहिजेत. कच्चे मांस खाणे टाळा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.