आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • What Should Be Expected Of The New Prime Minister Of Britain? | Article By Dr. Dr. Vedapratap Vedic

विश्लेषण:ब्रिटनच्या नव्या पंतप्रधानांकडे कोणत्या अपेक्षेने पाहावे?

औरंगाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लिझ ट्रस या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मेरी एलिझाबेथ ट्रस या ब्रिटनच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान आहेत. त्यांची पंतप्रधानपदी जनतेने नव्हे, तर ब्रिटनच्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाने निवड केली आहे. निवडणूक लढवून त्या पंतप्रधान झाल्या नाहीत. ब्रिटनचे पंतप्रधान कोण होणार हे कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या एक लाख ६० हजार सदस्यांना ठरवायचे होते, कारण पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी राजीनामा दिला होता. जवळपास दोन महिने चाललेल्या या निवडणूक प्रचारात दोन उमेदवार होते. एक ट्रस आणि दुसरे ऋषी सुनक. बोरिस जॉन्सन यांच्या सरकारमध्ये सुनक हे अर्थमंत्री आणि ट्रस परराष्ट्र मंत्री होत्या. सुनक हे सुरुवातीला जॉन्सन यांचे आवडते होते, पण त्यांनी राजीनामा दिल्यानंतरच जॉन्सन यांच्या निरोपाचे वातावरण तयार झाले होते. भारतीय वंशाचे सुनक जिंकले असते तर ब्रिटनसाठीच नव्हे, तर भारतासाठीही ती मोठी ऐतिहासिक घटना ठरली असती. भारतीय वंशाचे नागरिक जवळपास डझनभर देशांतील सर्वोच्च किंवा त्याच्या जवळच्या पदापर्यंत पोहोचले असले, तरी सुनक यांचे ब्रिटनचे पंतप्रधान होणे ही वेगळीच बाब होती.

सुनक यांचा फक्त २१,००० मतांनी पराभव झाला, तो गेल्या दोन दशकांतील कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या प्रत्येक पराभवापेक्षा किमान होता. ट्रस यांना ८१ हजार, तर सुनक यांना ६० हजार मते मिळाली. सुमारे २० हजार लोकांनी मतदान केले नाही, म्हणजे ट्रस यांना ५० टक्के मतेही मिळाली नाहीत. सुनक यांना ट्रसपेक्षा अर्थमंत्री म्हणून अधिक यश आणि लोकप्रियता मिळाली असली तरी कंझर्व्हेटिव्ह पक्ष अजूनही बोरिस जॉन्सन यांच्या प्रभावाखाली आहे. ते ट्रसकडून होते, तर सुनक यांनी त्यांच्याविरुद्ध बंड केले होते. याशिवाय, सुनक अनेक छोट्या-छोट्या वैयक्तिक वादात अडकले होते, हेही सुनक यांच्या पराभवाचे कारण असू शकते. गोऱ्या ग्रेट ब्रिटनमध्ये सुनक यांच्या संदर्भात वर्णभेद हा मुख्य मुद्दा झाला नाही, हे थोडे आश्चर्यकारक आहे. त्याचा आतून कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या मतदारांवर किती परिणाम झाला असेल, हे सांगता येणार नाही. काहीही झाले तरी पराभवानंतरही सुनक यांनी ट्रस यांचे ज्या पद्धतीने अभिनंदन केले व कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे कुटुंब असे वर्णन केले, ते भारतीय औदार्य व सन्मानाचे निदर्शक आहे.

ट्रस पंतप्रधान झाल्या आहेत, पण त्यांच्याकडे फक्त दोन वर्षांचा कालावधी आहे. त्यानंतर त्यांना पुन्हा निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. या दोन वर्षांत त्यांच्या खुर्चीला कोणताही धोका नाही, तरीही पक्षाच्या खासदारांकडून त्यांना ११३, तर सुनक यांना १३७ मते मिळाली! ब्रिटनची अर्थव्यवस्था कोसळत असताना ट्रस पंतप्रधान झाल्या आहेत. गेल्या ७५ वर्षांत प्रथमच ब्रिटन आर्थिक यशात भारताच्या तुलनेत मागे पडले असल्याचे ताज्या सर्वेक्षणातून दिसून आले. ट्रस यांच्या अडचणी पाकिस्तानच्या शाहबाज शरीफ यांच्यासारख्याच असतील, कारण महागाई १३ टक्क्यांनी वाढली आहे आणि अर्थव्यवस्था पुढील दोन वर्षे ठप्प होण्याची भीती आहे. आर्थिक वाढ शून्य राहिली आणि ट्रस यांनी वचन दिल्याप्रमाणे कर माफ केला, तर ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेवर किमान ८० अब्ज डाॅलरचा भार वाढेल. तिथे कोरोनाच्या काळात उद्योग-व्यवसायातील मंदीपणामुळे आधीच बेरोजगारी आणि महागाईने सर्वसामान्यांचे जगणे कठीण केले आहे. पंतप्रधान होताच ट्रस यांना संप आणि निदर्शनांना सामोरे जावे लागेल.

लिझ ट्रस एक खूप कठोर महिला मानल्या जातात, परंतु ऑक्सफर्ड विद्यापीठात विद्यार्थी असल्यापासून त्यांनी अनेक वैचारिक कोलांडउड्या मारल्या. त्या ब्रेक्झिटच्या बाजूने नव्हत्या, पण अर्थमंत्री म्हणून जॉन्सन यांच्या ब्रेक्झिट धोरणाचे त्यांनी जोरदार समर्थन केले. युक्रेनच्या प्रश्नावर रशियाविरुद्ध बोलण्यात त्या पंतप्रधानांपेक्षाही कठोर होत्या. ब्रिटनचे युरोपियन युनियनसोबतचे संबंध सुधारावेत, असे आता त्यांना वाटेल. आग्नेय आशियात रशिया आणि चीनविरुद्ध आघाडी स्थापन करण्यात त्या जॉन्सन यांच्या मागे राहणार नाहीत. तथापि, लिझ ट्रस पंतप्रधान झाल्यामुळे रशियन सरकार खुश नाही, परंतु मॉस्कोशी टक्कर घेताना ट्रस यांना ब्रिटनच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेची काळजी घ्यावी लागेल.

ट्रस तीनदा भारतात येऊन गेल्या आहेत. युक्रेनबाबत भारताच्या धोरणावर त्यांचे मौन वाखाणण्याजोगे होते. त्यांना पंतप्रधान म्हणून भारतात यायला आवडेल, अशीही शक्यता आहे. त्या भारतासोबत मुक्त व्यापार करार करू शकल्या तर ते एक ऐतिहासिक पाऊल असेल. ट्रस यांचे अभिनंदन करणाऱ्या पहिल्या परदेशी नेत्यांमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा समावेश होतो. (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.)

डॉ. वेदप्रताप वैदिक भारतीय परराष्ट्र धोरण परिषदेचे अध्यक्ष dr.vaidik@gmail.com

बातम्या आणखी आहेत...