आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशाच्या आर्थिक विकासावर, निवडणूक निकालांवर परिणाम करणारी आणि प्रत्येक व्यक्तीच्या आर्थिक स्थैर्याशी संबंधित कोणती गोष्ट आहे? या तिन्ही प्रश्नांचे एकच उत्तर आहे : रोजगार. मागील वर्ष नोकऱ्यांच्या बाबतीत संमिश्र होते. सुरुवात चांगली झाली आणि सुरुवातीलाच भरती झाली. पण, दुसऱ्या तिमाहीनंतर स्थिती बदलू लागली. जगातील भू-राजकीय तणाव आणि मंदीचा फटका व्यापारी वर्गाला बसला. गेल्या काही महिन्यांत जगभरात, विशेषतः आयटी क्षेत्रात झपाट्याने कपात होत आहे. त्यामुळे भीतीचे आणि अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. तर, २०२३ मध्ये रोजगार बाजारामधून आपण काय अपेक्षा करावी? नवीन वर्षात थंडी पडूनही नोकरभरतीचे वातावरण निवळलेले नाही. भारताची रोजगार बाजारातील स्थिती मजबूत आहे. कार्यरत लोकसंख्या तरुण आहे आणि २०२७ पर्यंत ती जगातील सर्वात मोठी कार्यशक्ती होणार आहे. यावर्षी आपण रोजगारामध्ये समतोल स्थितीची अपेक्षा केली पाहिजे. अनेक विभागांत नवीन भरतीसाठी चांगली चिन्हे आहेत. डिकोडिंग जॉब्ज इंडिया सर्वेक्षणात ४५% नियोक्ते म्हणाले की, ते नवीन भरती २०% नी वाढवणार आहेत. २०२३ च्या उत्तरार्धात भारतीय प्रतिभेची जागतिक मागणी दिसून येत असतानाही भारताचा रोजगार दृष्टिकोन देशांतर्गत भरतीवर आधारित असेल. उद्योजकता वाढवणे हे त्याचे महत्त्वाचे परिमाण असेल. वेगवेगळ्या क्षेत्रांतील रोजगाराच्या परिस्थितीचा एकेक करून आढावा घेऊ.
फार्मास्युटिकल : जी-२० चे अध्यक्षपद मिळाल्यानंतर डिजिटल हेल्थ इनोव्हेशन, सार्वत्रिक आरोग्य कव्हरेज मिळवणे आणि औषधांचे वेळेवर वितरण इत्यादींचे महत्त्व वाढेल. येत्या सहा ते आठ महिन्यांत कार्यरत लोकसंख्येला प्रोत्साहन मिळेल. वैद्यकीय संशोधन, आरोग्य प्रशासन, सार्वजनिक आरोग्य, नर्सिंग, डेटा सायन्स, एपीआय, संशोधन इ. क्षेत्रांत नवीन संधी निर्माण होणे अपेक्षित आहे.
उत्पादन : भौगोलिक-राजकीय कारणांमुळे आणि सरकारच्या इंडस्ट्री ४.० आणि मेक इन इंडिया कार्यक्रमांमुळे उत्पादन क्षेत्र यावर्षी वाढेल आणि देशांतर्गत मागणी निर्माण होईल. अॅपल आणि व्होल्व्होसारख्या कंपन्या भारतात त्यांची इनोव्हेशन सेंटर्स स्थापन करणार आहेत. गेल्या वर्षी ऑगस्टपासून या क्षेत्रात ५० हजार नवीन नोकऱ्या निर्माण झाल्या असून ही प्रक्रिया थांबणार नाही. ऑटोमोटिव्ह : वाहन क्षेत्रात उत्साहाचे वातावरण असेल. उत्पादने लाँच करण्यासाठी आणि स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञानासाठी कंपन्या नवीन भरती करतील. कार्यक्रम व्यवस्थापक, इलेक्ट्रॉनिक आणि मेकॅट्रॉनिक अभियंते, सिस्टिम अभियंते इत्यादींना सर्वाधिक मागणी असेल. फ्युएल सेल्समधील कौशल्यही खूप उपयुक्त ठरणार आहे.
इंटरनेट आणि आयटी : स्थानिक ई-कॉमर्स देशांतर्गत मागणीमुळे वाढत राहील. डिलिव्हरी व्यावसायिकांची मागणी, विश्लेषणातील कौशल्य आणि परफॉर्मन्स मार्केटिंगमुळे चालू वर्षात रोजगार निर्मिती सुरू राहील. टेक कंपन्या प्रमाणापेक्षा गुणवत्तेवर भर देतील. या क्षेत्रात आधीच भरपूर भरती करण्यात आली आहे, परंतु विशिष्ट कौशल्यांना मागणी असणार आहे, उदा. सायबर सुरक्षा, ब्लॉकचेन, रोबोटिक प्रक्रिया ऑटोमेशन, ऑनलाइन गेमिंग कौशल्यांमध्ये एआर-व्हीआर इ. येत्या काळात रोजगार बाजारात जे बदल घडणार आहेत, त्यात कर्मचारी आणि संस्था या दोघांनीही लवचिक दृष्टिकोन ठेवून बदलांसाठी स्वत:ला तयार करणे आवश्यक आहे. व्हीबाॅक्स, टॅग्ड आणि सीआयआयच्या इंडियास्किल रिपोर्ट २०२३ नुसार, भारताने प्रथमच ५०.३% रोजगारक्षमता स्कोअर नोंदवला आहे, याचा अर्थ सहभागींपैकी ५०.३% रोजगारक्षम असल्याचे आढळून येईल. यामध्ये ५२.२८% महिला असतील. ज्या नोकरीसाठी अर्ज करत आहोत त्यासाठी आपल्याकडे कौशल्ये आहेत का, आपल्याला याची माहिती आहे का, नोकरी मिळाल्याच्या पहिल्या ९० दिवसांत आपण आपली संस्था कशी सुधारू शकतो इ. हे स्वतःला विचारा. आपल्याला फक्त एचआरच्या दृष्टिकोनातून नोकरी शोधण्यापेक्षा रोजगार -व्यवस्थापकाच्या दृष्टिकोनातून नोकरी शोधणे अधिक प्रभावी वाटेल. वरील प्रश्नांची उत्तरे होय दिली असतील तर माझ्यावर विश्वास ठेवा, यावर्षी सर्वोत्तम नोकऱ्या तुमची वाट पाहत आहेत. (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.)
पंकज बन्सल पीपलस्ट्राँग आणि वर्क युनिव्हर्सचे संस्थापक
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.