आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा:आज तुम्ही काय करता आहात हे जास्त महत्त्वाचे...

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

या आठवड्यात मी प्रशिक्षणात सहभागी होतो. तेथे सहभागींना येत्या १२ महिन्यांसाठी त्यांचे अल्पकालीन वैयक्तिक उद्दिष्ट आणि आगामी ३ वर्षांसाठी त्यांचे दीर्घकालीन उद्दिष्ट काय आहे, हे विचारण्यात आले. ज्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी त्या कार्यक्रमात भाग घेतला त्या कंपनीच्या सीईओंचा असा विश्वास होता की, सार्वजनिकपणे वैयक्तिक उद्दिष्टे सांगून सहभागी त्या ध्येयाशी एकनिष्ठ राहतील आणि ते साध्य करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतील. त्यांनी असेही सूचित केले की, वजन कमी करण्यापासून ते संगीत किंवा स्पोकन इंग्रजीसारखे नवीन कौशल्य शिकण्यापर्यंतची वैयक्तिक उद्दिष्टे असू शकतात. कार्यक्रमातील ७२ सहभागी २३ ते ४५ वयोगटातील होते, त्यापैकी कोणीही आपले ध्येय सांगण्यासाठी पुढे आले नाही. प्रशिक्षक म्हणाले की, ध्येय छोटे असो वा मोठे, वैयक्तिक असो की व्यावसायिक, त्यासाठी आपण दररोज वेळ काढणे महत्त्वाचे आहे. आपण शिस्तबद्ध राहावे, असाही त्याचा अर्थ होता. कर्मचाऱ्यांनी लक्ष्य सांगण्यास नकार दिला, कारण ते वचनबद्ध झाले असते. यामुळे अलीकडे माझ्या रस्तामार्गे अनेक दौऱ्यांमध्ये मी भेट दिलेल्या अनेक ढाब्यांची आठवण आली. ते पूर्णपणे रिकामे होते, तर बाहेर ढगाळ वातावरण आणि जोरदार वारे वाहत होते. हिरवळीवर बसून कँडल लाइट डिनरसाठी हवामान योग्य होते. हे ढाबे मुंबई-नाशिक रस्त्यावर होते, हा गुजरात आणि पुण्याकडे जाणाऱ्या द्रुतगती मार्गांनंतरचा तिसरा सर्वात वर्दळीचा महामार्ग आहे. समोरून येणाऱ्या वाहनांना एकाही ढाब्याने आकर्षित करण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांना किमान मोठा पडदा लावून आयपीएल दाखवता आले असते. त्यामुळे काही प्रवासी काही षटकांचा सामना पाहण्यासाठी तिथे थांबून काही जेवणाची ऑर्डरही देऊ शकले असते. परंतु, कोणत्याही ढाब्याने तसा प्रयत्न केला नाही, परिणामी बहुतेकांच्या समोर एकही वाहन नव्हते. यातून अप्रत्यक्षपणे तेथून जाणाऱ्या प्रवाशांना संदेश गेला की, तेथे कोणीच नसल्याने तेथील जेवण व इतर सेवांचा दर्जा चांगला नसावा. पैसा पैशाला आकर्षित करतो, अशी जुनी म्हण आहे. हीच गोष्ट गर्दीला लागू होते. गर्दी गर्दीला आकर्षित करते. या हायवेवर आमच्याकडे सर्वात स्वच्छ वॉशरूम आहे, असा बोर्ड ते रस्त्यावर लावू शकले असते, जेणेकरून ढाबा चालकाचा दावा खरा आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी लोकांना एकदा थांबावेसे वाटेल. वॉशरूमच्या गुणवत्तेबद्दल समाधानी झाल्यानंतर ढाबा चालक ग्राहकांना टिकवून ठेवण्यासाठी क्रिकेट सामने दाखवणारे स्क्रीन बसवण्यासारखे काही इतर उपक्रमही करू शकतात. यानंतर प्रवाशांच्या समाधानासाठी उत्तमोत्तम जेवण देणे ही त्यांची एकमेव जबाबदारी आहे. ढाबा चालकांना पहिले दोन महिने तिथून जाणाऱ्या दोन-तीन टक्के वाहनांना आकर्षित करता आले, तर हे पाहून इतर नवीन किंवा नियमित प्रवासी आपोआप तिकडे जातील. अनेक फूड-स्ट्रीट्स (खाऊ गल्ली) मध्ये एक गोष्ट माझ्या लक्षात आली. उदा. तुर्कीतील अंतालिया येथे हॉटेलवाले त्यांच्या मित्रांना जेवणाच्या वेळी रस्त्यावरच्या खुर्च्यांवर येऊन बसण्यास आमंत्रित करतात. फंडा असा की, तुम्ही जे करता त्यातूनच तुमचे व्यक्तिमत्त्व घडते, त्या कामाबद्दल बोलण्याने नव्हे!

एन. रघुरामन, मॅनेजमेंट गुरू [raghu@dbcorp.in]