आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्त्री ही उपभोगाची वस्तू नव्हे, तर तिला आईचा दर्जा आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. आजची प्रत्येक मुलगी ही भविष्यातील आई आहे आणि केवळ आईच पूजनीय असते, हे भारतीय संस्कृतीने आपल्याला शिकवले आहे. मग ती आई तुमची असो, माझी असो किंवा इतर कुणाची असो; ती सदैव पूजनीयच असते. कारण मी कुणालाही तिच्यापेक्षा मोठे मानत नाही!
श र्मिला टागोर यांच्या बिकिनी फोटोशूटमुळे असे काय घडले होते की ज्यामुळे त्यांचे वैयक्तिक आयुष्य अडचणीत आले होते, ते मी गेल्या आठवड्यात सांगितले. तर तत्कालीन समाजाच्या मते, हे बिकिनी फोटोशूट म्हणजे मोठे धाडसाचे आणि निर्भयपणाचे कृत्य होते.
मन्सूर अली खान पतौडी यांच्याशी शर्मिला यांचा विवाह ठरला होता. मन्सूर अली हे पुरोगामी विचारांचे होते. त्यांनी शर्मिलांच्या या बिकिनीवाल्या बिनधास्त पवित्र्यावर आक्षेप घेतला नाही. “अॅन इव्हिनिंग इन पॅरिस’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची वेळ आली होती, म्हणून देशभर त्याचे पोस्टर लावणे सुरू झाले होते. अशातच शर्मिला यांच्या भावी सासूबाईंनी आपल्या भावी सुनेला भेटायला मुंबईला जायचा निर्णय घेतला होता.
त्या काळी भोपाळ किंवा पतौडीहून मुंबईला जाण्यासाठी रस्तेमार्गे, विमान किंवा ट्रेन अशी तीन साधनं होती. कारण जुहू आणि जेव्हीपीडी स्कीम, विलेपार्ले, सांताक्रूझ आदी मुंबईच्या उत्तरेकडील इतर ठिकाणे पूर्ण विकसित झाली नव्हती. त्यामुळे माझा असा अंदाज आहे की, शर्मिला टागोर यांचे वास्तव्य त्या वेळी पाली हिल, वांद्रे, वरळी यांसारख्या जो दक्षिण मुंबईचा समृद्ध भाग होता तिथे असावे. तर बेगम साहिबा सजदा सुलताना यांना कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही मार्गाने सुनेला पाहण्यासाठी पोहोचायचे होते. त्यांच्या बिकिनीवाल्या भावी स्नुषेचे पोस्टर ओळखणे काही कठीण काम नव्हते. आणि ही शाही सासू आपल्या मुलाप्रमाणे उदार आणि पुरोगामी दृष्टीने शर्मिला यांच्या या पोस्टर्सकडे दुर्लक्ष करेल, हा मोठा गोड गैरसमज होता. शर्मिला यांना हे माहीत होते की, मन्सूर अली यांच्यासोबत लग्नाचे आपले स्वप्न तुटूही शकते. म्हणून विपरीत घडण्याच्या भीतीने शर्मिला यांनी निर्माता-दिग्दर्शक शक्ती सामंत यांना विनंती केली की, मुंबईत भिंतींवर, खांबांवर लावलेली आपली बिकिनीवाली पोस्टर्स काढून टाकावीत.
ही पोस्टर्स कुठून काढली गेली किंवा कुठे टांगण्यात आली आणि बेगम साहेब मुंबईत आल्या, तेव्हा त्यांना आपल्या सुनेची बिकिनी पोस्टर्स दिसले की नाहीत, याचा कोणताही तपशील किंवा पुरावा माझ्याकडे नाही. पण, शर्मिला टागोर आपल्या एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या, की तथाकथित बिकिनी फोटोशूट किंवा पोस्टरमध्ये काहीशी अश्लीलतेची झलक आपल्याला दिसली होती. त्यांना भावी सासूच्या नजरेत स्वत:ची प्रतिमा खराब करायची नव्हती. मला इंटरनेटवर शर्मिला टागोर यांचे कोणतेही बिकिनी पोस्टर दिसले नाही, परंतु मी वेगवेगळ्या शहरांतील आणि गावांमधील लोकांशी संपर्क साधला, तेव्हा त्यांच्यापैकी अनेकांनी सांगितले की, त्यांनी शर्मिला टागोर यांचे बिकिनी पोस्टर पाहिले आहे आणि ते त्यांना चांगले आठवते. कारण नायिकेचे अंगप्रदर्शन हे नेहमीच एक आकर्षणाचे केंद्र असते. ते पूर्वीही होते आणि आताही आहे.
तथापि, मला इंटरनेटवर “आमने सामने’ नावाच्या एका चित्रपटातील शर्मिला यांचे बिकिनीतील पोस्टर सापडले. पण, त्या चित्रपटात मला तसे कोणतेही दृश्य दिसले नाही. हा चित्रपटही १९६७ मध्ये आला होता. दिग्दर्शक सूरज प्रकाश किंवा अन्य काही लोकांंनी अंगप्रदर्शनाचे नाणे वाजवण्याचा प्रयत्न केला असावा. तसे पाहता, अशा प्रकारची बिकिनी पहिल्यांदा फ्रेंच अभियंता लुईस रेयार्ड यांनी डिझाइन केली होती आणि मिशलिन बरनारदिनी यांनी मॉडेलिंग करून ५ जुलै १९४६ रोजी ती लोकांसमोर प्रदर्शित केली होती. रेयार्डने या डिझाइनचे नाव बिकिनी अॅटोल या नावापासून प्रेरणा घेऊन ठेवले, जिथे दुसऱ्या महायुद्धानंतर अणुबॉम्बची चाचणी केली जात होती. या बिकिनीने कॅथोलिक चर्चला बॉम्बप्रमाणे हादरवले. चर्चने तीव्र निषेध केला! फक्त एकच कारण होते, स्त्रीचे अंगप्रदर्शन!
काळानुसार दृष्टिकोन बदलतात. पूर्वी जे अश्लील मानले जायचे, ते आज मान्य होऊ शकते. राज कपूर यांच्या ‘बरसात’ या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने ‘ए’ प्रमाणपत्र दिले, याचे कारण असे ऐकण्यात आले होते की, या चित्रपटातील नायिकेने एका गाण्यात सलवार कमीजसोबत दुपट्टा घेतला नव्हता. तर याच राज कपूर यांनी ‘राम तेरी गंगा मैली’तील दृश्यात आई मुलाला दुग्धपान करीत आहे आणि हे दृश्य नग्नता किंवा अश्लितेमध्ये मोडत नाही, असा युक्तिवाद करून “U” प्रमाणपत्र मिळवले होते. Sexual Titilation किंवा सृजनात्मक स्वातंत्र्य वा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकाराचा आधार घेऊन अनेकांनी त्याचा उपयोग करुन घेतला आणि सामान्य जनतेनेही त्याचा आनंद लुटला. म्हणून जोपर्यंत आपण सगळे सामूहिक जबाबदारी समजून घेत नाही आणि ती पार पाडत नाही तोपर्यंत कोणत्याही एका बाजूला दोष देणे किंवा ती नाकारणे अन्यायकारक ठरेल. तोपर्यंत असे प्रकार सुरूच राहणार!
तथापि, स्त्री ही उपभोगाची वस्तू नव्हे, तर तिला आईचा दर्जा आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. आजची प्रत्येक मुलगी ही भविष्यातील आई आहे आणि केवळ आईच पूजनीय असते, हे भारतीय संस्कृतीने आपल्याला शिकवले आहे. मग ती आई तुमची असो, माझी असो किंवा इतर कुणाची असो; ती सदैव पूजनीयच असते. कारण मी कुणालाही तिच्यापेक्षा मोठे मानत नाही!
युद्ध होतात, लोक मरतात. जे मरतात ते कुणाचे भाऊ, बहीण, वडील, नवरा असोत किंवा नसोत, पण कुणा आईची मुलं मात्र नक्कीच असतात. त्यामुळे एक आई आपले मूल गमावते. म्हणून जगातील सर्व मातांमध्ये एकतेची भावना निर्माण झाली आणि त्यांनी आपल्या मुलांना धर्म, जात, समुदाय, प्रदेश, रंग, वंश यांच्या नावाखाली मरायला पाठवणार नाही, असे जाहीर केले तर शांतता निर्माण होऊ शकते! तुम्हा सर्वांना मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
चला, मातृदिन साजरा करण्यासाठी आपण एक दिवस निश्चित केला, हे खूप चांगले आहे. जोवर आपण आहोत, आपले अस्तित्व आहे, तोवर आपली आई प्रत्येक क्षणी आपल्या पाठीशी असेल. कारण तिच्यामुळेच तर आपण आहोत!
मी प्रत्येक मातेला दंडवत प्रणाम करतो! माझा चरणस्पर्श स्वीकारून मला आशीर्वाद द्या! आज मी या सदराला पूर्णविराम देत आहे. आता आणखी लिहिता येणार नाही, काही सांगू शकणार नाही. प्रार्थनेच्या वेळी आठवण ठेवा.
आखरी गीत मोहब्बत का सुना लूं तो चलूं,
मैं चला जाऊंगा दो अश्क बहा लूं तो चलूं!
आणि खास तुमच्यासाठी...
उन्नति के मार्ग पर बढ़ते चलो तुम अग्रसर हम अगर संभव हुआ तो रास्ते में फिर मिलेंगे! जय हिंद! वंदे मातरम्!
तुमचा, अन्नू कपूर
श्रीमती कमल कपूर 'शबनम' यांचे पुत्र
सुप्रसिद्ध अभिनेता, निर्माता आणि सूत्रसंचालक
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.