आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देखभाल:फ्रिज वापरताना...

औरंगाबाद25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

फ्रिजच्या स्वच्छतेसोबतच त्याची देखभाल आणि विविध कप्प्यांचा योग्य वापरही होणे अतिशय आवश्यक आहे. जर रेफ्रिजरेटरची नियमित देखभाल केली तर तो बराच काळ नवीन ठेवता येतो. आजकाल बाजारात अनेक प्रकारचे फ्रिज आहेत. त्यामध्ये वस्तू ठेवण्याचे आणि वापरण्याचे नियम जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

- भाजी आणल्यानंतर थेट फ्रिजमध्ये ठेवू नका.भाज्या स्वच्छ धुऊनच फ्रिजमध्ये ठेवा. भाज्या धुण्यासाठी वेळ नसेल, तर त्या वर्तमानपत्रात गुंडाळून किंवा झिप-लॉक बॅगमध्ये ठेवा. यामुळे फ्रिज स्वच्छ राहील आणि सर्व भाज्या व्यवस्थितही राहतील.

- वस्तू ठरलेल्या ठिकाणीच ठेवा. उदा. स्लायडिंग ड्रॉवरमध्ये फळं, दाराच्या अरुंद शेल्फमध्ये मसाले. - दूध, दही, पनीर, मावा वगैरे फ्रीजरमध्येच ठेवा. त्याच्या खालच्या कप्प्यात १२ तासाच्या आत वापरण्याच्या वस्तू ठेवा. - फळे आणि भाज्या एकत्र न ठेवता वेगवेगळ्या ठेवा. एकत्र ठेवल्यास ते लवकर खराब होण्याची शक्यता असते. - लसूण, कांदा फ्रिजमध्ये हवाबंद डब्यातच ठेवा. अन्यथा दुर्गंधी पसरते. - ठराविक अंतराने फ्रिज पूर्णपणे रिकामं करून स्वच्छ करा. यावेळी फ्रिजमधल्या अनावश्यक वस्तू, पदार्थ काढून टाका.- रेफ्रिजरेटरच्या कंडेन्सरवर धूळ जमा झाल्याने त्याच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. महिन्यातून एकदा स्विच बंद करून कंडेन्सर फडक्याने स्वच्छ करा. - रेफ्रिजरेटरचा दरवाजा वारंवार उघडू नका. त्यामुळे फ्रिजच्या आतील तापमान वाढते आणि आतील वस्तु, पदार्थ खराब होऊ शकतात.

टीम मधुरिमा

बातम्या आणखी आहेत...