आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Why Did The Leaders Get Angry On The Word Hindu? What's So Bad About It? | Article By Navneet Gurjar

वृत्तवेध:हिंदू या शब्दावर का भडकले नेते? त्यात वाईट काय आहे?

औरंगाबाद5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नेत्यांमध्ये स्पर्धा लागली आहे. बोलायचे म्हणून ते काहीही बोलत आहेत. वादात पडणे केवळ हाच त्यांचा उद्देश आहे. जेणेकरून त्यांचे नाव हायकमांडपर्यंत पोहोचू शकेल. ही एक आंधळी शर्यत आहे. यात नव्या पिढीसाठी शिकण्यासारखे काही नाही. सकारात्मकतेने अनुकरण होईल असे काही पुढाऱ्यांनी करायला हवे, नकारात्मक नव्हे. अपशब्द आणि नेत्यांच्या बोलघेवडेपणाची अनेक उदाहरणे असली तरी ताजी घटना कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सतीश जारकीहोळी यांची आहे. ते म्हणाले- हिंदू हा शब्द कुठून आला? त्याचा भारताशी संबंध काय? हिंदू शब्दाचा अर्थ कळला तर लाज वाटेल! लाज वगैरे काही नाही. कदाचित काँग्रेसच्या नेत्याला तसे वाटत असेल!

धर्म हा सनातन आहे आणि त्याचे पालन करणारे आपण सर्व सनातनी आहोत हे खरे आहे. हिंदू भौगोलिक नाव आहे. ते परिसर, क्षेत्राची अधिक ओळख करून देते. वास्तविक आपल्या देशाच्या बदलत्या नावाचा एक मनोरंजक इतिहास आहे. महाराज भरत यांनी या क्षेत्राचा पूर्ण विस्तार केला होता, त्यामुळे त्यांच्या नावावरून देशाचे नाव पडले. यावर एकमत नसले तरी मध्ययुगीन काळात तुर्क आणि इराणी येथे आले तेव्हा त्यांनी सिंधू खोऱ्यातून येथे प्रवेश केल्याचे सांगितले जाते. ते स चा उच्चार ह करत असल्याने ते सिंधूला हिंदू म्हणू लागले. त्यांनी इथल्या रहिवाशांना हिंदू म्हटले आणि जिथे हिंदू राहतात ते हिंदुस्थान झाले. म्हणूनच तुम्ही ऐकले असेल की, रा. स्व. संघ किंवा सरसंघचालक मोहन भागवत हे अधून मधून सांगत असतात की, भारतात राहतात हिंदू.

या अर्थाने त्यांचे अगदी बरोबर आहे, कारण आपला देश ज्या भागात वसला आहे, तेथे राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हिंदू म्हटले गेले. येथे सनातनी मुबलक प्रमाणात राहत असल्याने हिंदू हा शब्द त्यांच्याशी आणि पुढे धर्माशीही जोडला गेला. तथापि, सनातन धर्माची ओळखच ही आहे की, तो अतिशय विस्तृत आहे आणि सर्व काही नम्रपणे स्वीकारतो. म्हणूनच मुंडकोपनिषदात म्हटले आहे की, शाश्वत देव जगाची निर्मितीही करू शकतो आणि जग होऊही शकतो. तो राम आणि कृष्णासारखा अवतारही घेऊ शकतो. म्हणजेच सनातनींना जसा देव सुलभ आहे तसा जगातील इतर कोणत्याही ईश्वरवाद्याला नाही. उदा. सनातनींना तीन प्रकारचे देव सुलभ आहेत - निर्गुण-निराकार, सगुण-निराकार आणि सगुण-साकारदेखील. असो, गोष्ट सिंधू आणि हिंदू यांच्याबद्दल आहे. याचा इंडस आणि इंडियाशीही संबंध आहे. सिंधूचे दुसरे नाव इंडसदेखील होते आणि लॅटिन भाषेत इंडसला इंडिया म्हटले गेले, त्यामुळे इंग्रज हिंदुस्थानला इंडिया म्हणू लागले. एवढेच नव्हे, तर संविधान सभेत एकदा भारत आणि इंडिया ही दोन्ही नावे चालवावीत की नाही, यावर वाद झाला होता. इंडिया हे नाव वगळले पाहिजे, देशाचे नाव फक्त भारतच राहू द्यावे, असे अनेक सदस्यांचे मत होते. मात्र, सहमती होऊ शकली नाही आणि दोन्ही नावे पुढे सुरू राहिली.

आता कर्नाटकच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना हिंदू या शब्दात काय वाईट दिसत आहे, हे नक्कीच समजण्यापलीकडचे आहे. राजकीयदृष्ट्या विचार केला तर काँग्रेस पक्षाचे लोकच सातत्याने काँग्रेसला खाली नेण्यासाठी टपलेले आहेत. इतर पक्षांना विरोध करण्याच्या नादात ते स्वतःचे आणि आपल्या पक्षाचेच नुकसान करू लागतात.

नवनीत गुर्जर नॅशनल एडिटर, दैनिक भास्कर navneet@dbcorp.in

बातम्या आणखी आहेत...