आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Why Do We Associate Fair Color With Beauty And Status In Society? | Arrticle By Meghana Pant

अर्धे आकाश:गोऱ्या रंगाचा संबंध आपण सौंदर्य व समाजातील स्थानाशी का जोडतो?

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माझा जन्म सिमल्यात झाला तेव्हा अतिशय चांगली व्यक्ती असलेले माझे आजोबा थोडे निराश झाले होते. अजून एक मुलगी! नातवंडांच्या लांबलचक यादीत सातवी! पण माझा वर्ण गोरा होता आणि यामुळे बहुधा सगळ्यांनाच काहीसा दिलासा मिळाला - माझ्या आईच्या सासूबाई, तिची आई, तिचे डॉक्टर, नर्स, हॉस्पिटल क्लीनर, नातेवाईक, सहकारी आणि भाजी विक्रेतेही. माझ्या आईचे अभिनंदन करून ते सर्व म्हणाले - सुदैवाने तुझ्या मुलीचा रंग तुझ्यासारखा सावळा नाही. तथापि, माझी आई सुवर्णपदक विजेती पदवीधर होती आणि तिने नागरी सेवांच्या उच्च पदावर प्रवेश केला होता. पुढच्या वर्षी माझा भाऊ आणि स्टँडअप कॉमेडियन सौरभ पंतचा जन्म झाला. तो सावळा आहे. त्या वेळी सर्वांनाच त्याचे दुःख झाले. पण, आमच्या घरी शेवटी एक मुलगा जन्माला आल्याने सगळा विसर पडला! आपल्या देशात गोरा रंग म्हणजे सौंदर्य आणि समाजातील स्थान. अलीकडेच एका भारतीय महिला इन्फ्लुएन्सरने ती रस्त्यावरील विक्रेती असल्याचे दाखवण्यासाठी बनावट गडद त्वचा दाखवली. त्वचेच्या रंगाचे आपल्याला इतके वेड का आहे का जाणे. यामुळे आज आपण जगातील फेअरनेस क्रीम आणि लोशनची सर्वात मोठी बाजारपेठ बनलो आहोत. आणि गोऱ्या रंगाच्या ऐश्वर्या रायच्या जागी सावळी सुष्मिता सेन मिस युनिव्हर्स झाली होती, नंदिता दास सावळ्या रंगात अंतर्भूत असलेल्या सौंदर्याबद्दल आणि नीना गुप्तापासून चित्रांगदा सिंग, दीपिका पदुकोण व दक्षिण भारतातील अलीकडील अनेक यशस्वी अभिनेत्री गोऱ्या नसताना ही स्थिती आहे. बॉलीवूडसाठी पुरेशी गोरी न म्हटल्यामुळे प्रियंका चोप्राही नैराश्यात बुडाली तेव्हा अति झाले!

मी गोरी होते, तरीही माझ्या नातेवाइकांनी मला फेअर अँड लव्हली, केमिकल ब्लीच आणि मुलतानी माती माझ्या चेहऱ्यावर थापण्यात कोणतीही कसर सोडली नाही. कदाचित त्यांना वाटले असेल की, माझा गोरेपणा हा एक भ्रम आहे, तो वयानुसार नष्ट होईल. मी आई झाले तेव्हा मला सांगितले गेले की, तुझ्या गोऱ्या मुलींना उन्हात नेऊ नकोस, त्यामुळे त्या सावळ्या होतील, जणू सावळी असणे पाप असावे. मी त्यांना रोज सकाळी व्हिटॅमिन डीसाठी उन्हात बाहेर नेत असे. सौंदर्य ही एक सापेक्ष गोष्ट आहे. गोरी असल्याने मला भारतात सुंदर मानले जायचे. पण, मी स्वित्झर्लंडमध्ये शिकायला गेले तेव्हा मला विदेशी म्हटले गेले, कारण मी तिथल्या स्थानिक लोकांपेक्षा कमी गोरी होते. मी सिंगापूरमध्ये एमबीए करत असताना मला गोरी नसल्यामुळे कुरूप समजले गेले. मी अमेरिकेत काम केले तेव्हा मला गोंडस म्हटले गेले, सुंदर नाही, कारण मी त्यांच्या मानकांवर जास्त सावळी नव्हते. मी दुबईतही काम केले आहे. तिथे माझ्या त्वचेचा रंग प्रादेशिक मानला गेला. पाश्चिमात्य देशच फक्त डार्क इज ब्यूटिफुल मानतात.

परंतु, आपल्या आनुवंशिक रचनेकडे आणि हवामानाकडे दुर्लक्ष करून आपल्या रंगाकडे जास्त लक्ष देणारे आता इतिहासजमा होत आहेत. कारण कसे दिसणे मान्य आहे आणि कोणते नाही, हे आपल्याला मागे ठेवण्याचे धोरण असल्याचे स्त्रियांना समजले आहे. अखेर दिसण्याचा अर्थ काय? त्वचेच्या रंगापेक्षा आपली प्रतिभा महत्त्वाची आहे. स्त्रिया कशा दिसल्या पाहिजेत, याबद्दल आपण कोणतीही एकसमानता स्थापित करू नये. त्याच वेळी आपण वर्णभेदाला प्रोत्साहन देणे थांबवले पाहिजे आणि भौतिक प्रतिनिधित्वाच्या नवीन कल्पना आत्मसात केल्या पाहिजेत. समस्या सोडवणाऱ्या आणि स्वतःचे निर्णय स्वतः घेणाऱ्या महिलाच आपल्या प्रेरणा आणि नायिका असाव्यात. स्त्रिया अनेक रंग-रूपाच्या असतील तर काय अडचण आहे? आपण हे समजून घेतले पाहिजे की, सौंदर्याची व्याख्या आपल्या त्वचेचा रंग, शरीराचा आकार, वय यावरून ठरवता येत नाही. तुम्ही आतून कोण आहात, तुमच्यात किती ऊर्जा आहे, तुम्ही इतरांसाठी किती उदार होऊ शकता आणि समाजावर व लोकांवर तुमचा किती प्रभाव आहे यावरून सौंदर्य ठरते. गोरी जन्माला आलेली मुलगी सावळी असती तरी एवढीच खुश राहिली असती, हे तिला नक्की मान्य असेल! (ही लेखिकेची वैयक्तिक मते आहेत.) मेघना पंत पुरस्कारप्राप्त लेखिका, पत्रकार व वक्त्या meghnapant@gmail.com

बातम्या आणखी आहेत...