आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअसे अनेक लोक असतात जे तंदुरुस्त असतात, पण तरीही त्यांच्या पोटावर चरबी असते. ज्याला सेंट्रल ओबेसिटी किंवा बेली फॅट म्हणतात. शरीराच्या मध्यभागी जमा होणारी चरबी ही हृदयविकाराचा झटका, उच्च रक्तदाब, टाइप-२ मधुमेह इत्यादींसाठी मोठ्या प्रमाणात कारणीभूत असते. पोटावर चरबी का वाढते, त्यासाठी काय करावे? जाणून घेऊया...
रात्रीचे जेवण ७ ते ९ दरम्यान तुम्ही रात्रीचे जेवण योग्य वेळी म्हणजे ७ ते ९ दरम्यान केले नाही आणि रात्री उशिरा जेवलात तर ते लठ्ठपणाचे कारण बनते. खाणे आणि झोपणे यामध्ये किमान तीन तासांचे अंतर असावे. जर्नल ओबेसिटी सोसायटीच्या मते, रात्री कॅलरीज बर्न करण्यासाठी अतिरिक्त वेळ लागतो.
{ सोशल मीडियावर अधिक वेळ : फोनची स्क्रीन स्क्रोल करत असताना अर्ध्या तासाऐवजी एक तास कसा जातो, हे तुम्हाला कळणार नाही. पण, त्याचा परिणाम पोटावर गोठलेल्या चरबीच्या रूपात होतो. अनेक अभ्यासांतून हे सिद्ध झाले आहे की, तुम्ही रात्री उशिरापर्यंत अंथरुणावर पडून तुमचा फोन वापरत असाल तर फोनचा निळा प्रकाश तुमची झोप खराब करतो. झोपेअभावी चयापचय मंदावते आणि आरोग्यासाठी हानिकारक गोष्टी खाण्याची इच्छा होते. त्यामुळे लठ्ठपणा, पोटाची चरबी वाढते.
{ जेवणाकडे लक्ष नसणे : टीव्ही, लॅपटॉप किंवा फोनच्या स्क्रीनकडे पाहताना स्नॅक्स, चिप्स खायला अनेकांना आवडते. यात जास्त लक्ष स्क्रीनवर राहते आणि भूक नसतानाही हे सर्व पदार्थ खाल्ले जातात. त्यामुळे पोटावर चरबी जमा होते.
{ मोठ्या ताटात जेवणे : बऱ्याचदा लोकांना मोठ्या ताटात जेवायला आवडते. पण, असे मोठ्या ताटात जेवण घेतल्याने जास्त खातो, ज्यामुळे लठ्ठपणा वाढतो आणि लठ्ठपणा वाढल्याने पोटाची चरबीही वाढते. कॉर्नवॉल विद्यापीठाच्या अभ्यासातूनही ही गोष्ट सिद्ध झाली आहे. त्यामुळे आपल्या आहाराचेे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी शक्य तेव्हा लहान ताटात जेवावे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.