आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकन हार्ट असोसिएशनच्या मते, इतर ऋतूंच्या तुलनेत हिवाळ्यात रक्त घट्ट होते, ज्यामुळे गुठळ्या तयार होतात. हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकची बहुतेक प्रकरणे रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्यामुळे होतात. या हृदय आणि मेंदूच्या रक्तवाहिन्यांचा मार्ग अवरोधित करतात, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक येतो. तापमानातील घसरणीमुळे हृदयाच्या धमन्यांवर (कोरोनरी धमन्या) परिणाम होतो, ज्यामुळे त्या संकुचित होतात. अशा परिस्थितीत, रक्ताभिसरणादरम्यान, रक्तवाहिन्यांच्या आतील पटलांवर रक्ताचा दाब जास्त असतो. या स्थितीमुळे उच्च रक्तदाब होतो.
व्यायामामध्ये खंड नको-आहाराकडे विशेष लक्ष द्या { हिवाळ्यात थंड हवामानामुळे अनेक जण व्यायामाचा कंटाळा करतात. त्यामुळे व्यायामाद्वारे होणारे शारीरिक श्रम होत नाहीत. हे योग्य नाही. हिवाळ्यात चटपटीत-मसालेदार, स्निग्ध पदार्थ भूकेपेक्षा जास्त खाल्ल्यास कोरोनरी आर्टरी डिसीज (CAD) चा धोका वाढतो. वृद्धांनी, उच्च रक्तदाब, हृदयविकार असणाऱ्यांनी हिवाळ्यात उन्हं पडल्यावरच बाहेर फिरायला जावे. उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी मिठाचे सेवन कमी करावे. हिवाळ्यात घाम कमी येत असल्यामुळे शरीरातील मिठाचे प्रमाण वाढून रक्तदाब वाढू शकतो.
हिवाळा आणि हायपोथर्मिया हिवाळ्यात मुले, वृद्ध तसेच हृदय आणि मधुमेहाच्या रुग्णांमध्ये हायपोथर्मिया (शरीराचे तापमान कमी होणे) समस्या वाढतात. थरकाप, अशक्तपणा आणि थकवा ही याची सुरुवातीची लक्षणे आहेत. गंभीर परिस्थितीत धाप लागणे आणि शुद्धही हरपू शकते. हे टाळण्यासाठी उबदार कपडे परिधान करा.
जुनाट दमा हिवाळ्यात दम्याचा जोर वाढतो. सर्दी-खोकला, ताप याकडे दुर्लक्ष केल्यामुळे दम्याच्या समस्या वाढतात. श्वासनलिकेतील सूजेला दमा म्हणतात. दमा ही एक प्रकारची अलर्जी आहे. ज्या वस्तू किंवा वातावरणाची अॅलर्जी असेल ते टाळा. अॅलर्जिक राइनाइटिस
हवामान बदलल्यामुळे अॅलर्जिक राइनाइटिसचा प्रभाव वाढतो. सर्व वयोगटातील लोकांना याचा त्रास होऊ शकतो. यात नाक बंद होणे, खाज येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, शिंका येणे, कानात अडथळे येणे, डोळ्यांना खाज येणे, घसा खवखवणे इ. लक्षणे दिसतात. ज्या गोष्टींची अॅलर्जी आहे त्या टाळाव्यात.
सांधे आणि मणक्याच्या समस्या ज्या लोकांना संधिवात आणि मणक्याच्या समस्या जसे (सर्वाइकल स्पॉन्डिलाइटिस किंवा लंबर स्पॉन्डिलाइटिस) इत्यादींचा त्रास आहे, त्यांच्या त्रास हिवाळ्यात वाढतो. कारण थंडीमध्ये रक्तवाहिन्या आकुंचित होतात. परिणामी, सांध्यातील रक्तप्रवाह सुरळीत होत नाही. त्यामुळे सांधे आखडल्यानेे दुखण्याचे प्रमाण वाढते. सांधेदुखी आणि मणक्याच्या समस्यांनी त्रस्त असलेल्या लोकांनी तज्ज्ञ डॉक्टरांच्या सूचनांचे पालन करावे. फिजिओथेरेपिस्टचा सल्ला घेऊन व्यायाम करा. कॅल्शिअमयुक्त आहार जसे दूध, दुग्धजन्य पदार्थ-पनीर, दही, मठ्ठा यांचे सेवन करावे. हिवाळ्यात सकाळच्या कोवळ्या उन्हात अर्धा तास तरी बसावे, कारण हा व्हिटॉमिन-डी चा उत्तम नैसर्गिक स्त्रोत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.