आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Why Hollywood Does Not Show The Real India To The World? | Article By Kaweri Bamjai

चित्रपट:जगामध्ये वास्तविक भारत का दाखवत नाही हॉलीवूड?

औरंगाबाद25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अॅपलची उत्पादने तयार करणे ही छोटी बाब नाही. एकट्या आयफोनची निर्मिती करण्यासाठी जगातील २०० हून अधिक कंपन्यांना मेमरी चिप्स, ग्लास स्क्रीन इंटरफेस, केसिंग्ज, कॅमेरा इत्यादी तयार करावे लागते. अॅपल टीव्ही प्लसचा माजी गुन्हेगार ग्रेगरी डेव्हिड रॉबर्ट््सच्या याच शीर्षकाच्या बहुचर्चित पुस्तकावर आधारित ‘शांताराम’ चित्रपटदेखील आयफोनसारखाच आहे. कथा एका ऑस्ट्रेलियनने लिहिली आहे, मुख्य भूमिकेत एक इंग्रजी अभिनेता आहे, तो ऑस्ट्रेलियन उच्चारात बोलतो, चित्रपट थायलंडमध्ये शूट केला गेला आहे, तो मुंबईसारखा दाखवला आहे आणि अनेक देशांतील कलाकारांनी भारतीय भूमिका केल्या आहेत.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे भारतावर आधारित या मालिकेत क्वचितच भारतीय कलाकार आहेत. आणि जे आहेत ते पाश्चिमात्य देशांत प्रशिक्षित होऊन तेथे काम करतात. हॉलीवूड विविधतेबद्दल अत्यंत सावध असते, तेव्हा मुंबईवर आधारित त्याच्या एका मालिकेत शहराचे चित्रण केवळ त्याच त्या छायाचित्रांद्वारे केले गेले आहे, हे पाहून आश्चर्य वाटते. भारतावर आधारित प्रत्येक मोठ्या हॉलीवूड चित्रपटात अभारतीय व्यक्तीला मुख्य अभिनेता म्हणून निवडले जाते. यावरून ते आपल्या अभिनेत्यांना योग्य मानत नाहीत, हेच दिसून येते. डॅनी बॉयल ‘स्लमडॉग मिलेनियर’मध्ये जमालची मुख्य भूमिका साकारण्यासाठी अभिनेत्याच्या शोधात होता, तेव्हा त्याने सांगितले की, मी अनेक तरुण भारतीय अभिनेत्यांच्या ऑडिशन घेतल्या, परंतु त्या सर्वांचे सुडौल शरीर आणि चॉकलेटी चेहरे होते. त्यातल्या कुणाकडे बघून ते भुकेल्या, कमकुवत, पण महत्त्वाकांक्षी जमालची भूमिका साकारू शकतील, असे वाटत नव्हते. अखेरीस या भूमिकेसाठी इंग्लंडमध्ये जन्मलेल्या भारतीय वंशाच्या देव पटेलची निवड करण्यात आली.

डॅनीने म्हणालया हवे होते की, भारतीयांबद्दल जगाची जी धारणा आहे ती नेहमीच वास्तवाशी जुळत नाही. ‘शांताराम’ हा चित्रपट भारताविषयी पूर्वनियोजित धारणांच्या विरोधाभासांनी भरलेला आहे. मूळ कादंबरीतही तसे स्टिरिओटाइप असतील. पण एकमेकांशी जोडलेल्या जगात, जिथे अमेरिकन स्ट्रीमर्सना भारताच्या प्रचंड मध्यमवर्गातून पैसे कमावायचे आहेत, तिथे ते किमान कोणाला आणि कसे निवडायचे याबद्दल अधिक काळजी घेऊ शकतात. लक्षात ठेवा, ‘शांताराम’ची निर्मिती मीरा नायरद्वारे २००७ मध्ये होणार होती. यात लिओनार्डो डिकॅप्रियो मुख्य भूमिकेत आणि अमिताभ बच्चन रहस्यमय गँगस्टरच्या भूमिकेत असणार होते. सध्याच्या चित्रपटातील भूमिका सुदानमध्ये जन्मलेला इंग्लिश अभिनेता अलेक्झांडर सिदिग याने साकारली आहे. हॉलीवूडमधील लेखकांच्या संपामुळे मीरा नायरचा चित्रपट निर्माण होऊ शकला नाही.

आपण भारताला आपल्या डोळ्यांनी पाहण्यापेक्षा पाश्चिमात्य चष्म्यातून पाहणे का पसंत करतो? ‘गांधी’ किंवा ‘स्लमडॉग मिलेनियर’ ऑस्कर पुरस्कार जिंकतात, पण ‘सलाम बॉम्बे’ किंवा ‘लगान’ला तो मान मिळत नाही, याचे कारण काय? प्रादेशिक रंगभूमी आणि पारंपरिक लोककलेतून विकसित झालेल्या भारतीय सिनेमाच्या अनोख्या स्थानामुळे हे घडले आहे, असे ‘द लास्ट फिल्म शो’चे दिग्दर्शक पॅन नलिन यांचे मत आहे. आपली कथा सांगण्याची शैली आपल्या संस्कृतीशी सुसंगत आहे आणि ती आपल्याकडे इतके लोकप्रिय आहे की हॉलीवूड चित्रपट बॉक्स ऑफिसवर १०% पेक्षा जास्त कमाई करत नाहीत. जगात फार कमी ठिकाणी हॉलीवूड चित्रपट इतके कमी पैसे कमावतात. भारतीय चित्रपट उद्योगाला एक विशिष्ट परंपरा आहे आणि त्यात नृत्य व गायन अविभाज्य भाग आहे. त्यासाठी आपल्या कलाकारांना एका विशिष्ट खेळपट्टीवर परफॉर्म करावे लागते, ते भारताबाहेरील प्रेक्षक स्वीकारू शकत नाहीत. भारताला पाश्चिमात्य देशांत आपले यश साजरे करायला आवडते. आज अमेरिकेतील मनोरंजन उद्योगातील अनेक शक्तिशाली व्यक्ती भारतीय वंशाच्या आहेत, मग त्या नेटफ्लिक्सचे ग्लोबल टीव्ही हेड बेला बजारिया असोत किंवा वॉर्नर ब्रदर्सच्या ड्रामा डेव्हलपमेंटच्या प्रमुख पारुल अग्रवाल असोत. अशा परिस्थितीत आपण विचार करू शकतो की, हॉलीवूड भारताबद्दलच्या पूर्वनिर्धारित धारणांपासून मुक्त होईल, असा दिवस कधी येईल? (ही लेखिकेची वैयक्तिक मते आहेत.)

कावेरी बामजई पत्रकार आणि लेखिका kavereeb@gmail.com

बातम्या आणखी आहेत...