आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Why Is Authoritarianism Emerging In European Countries? | Article By Dr. Vedpratap Vaidik

दृिष्टकोन:युरोपियन देशांत का उदयास येत आहे हुकूमशाही प्रवृत्ती?

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतातील काही बुद्धिजीवी मित्र मला विचारत आहेत की, युरोपात पुन्हा मुसोलिनी व हिटलरचा उदय होणार आहे का? हा प्रश्न त्यांना का विचारावा वाटत आहे? कारण भारताच्या राजकारणात त्यांची घुसमट होत आहे. त्यांना वाटत आहे की, राष्ट्रवादाच्या नावाखाली ज्या देशांत जे काही घटक उदयास येत आहेत त्यांचे चारित्र्य फॅसिझम आणि नाझीवादाच्या धर्तीवर असेल. अनेक युरोपियन देशांतील उजव्या विचारसरणीचे नेते इकडे लोकप्रिय होत आहेत. जवळपास १०० वर्षांपूर्वी इटलीत मुसोलिनींचा उदय कट्टर राष्ट्रवादी व विस्तारवादी विचारसरणीमुळे झाला होता. जर्मनीत हिटलरच्या उदयामागे ज्यूंचा द्वेष आणि पहिल्या महायुद्धातील पराभव होता. इकडे इटलीत जियोर्जिया मेलोनी पंतप्रधान होताच जगातील लोकशाही बुद्धिजीवींचे कान टवकारले आहेत. कारण इटली हा युरोपातील तिसरा सर्वात मोठा देश आहे आणि मेलोनी एकेकाळी मुसोलिनी समर्थकांच्या भक्त होत्या. त्यांनी ज्या दोन पक्षांसोबत मिळून सरकार बनवले त्यातील मत्तेओ साल्विनींचा पक्ष कट्टर राष्ट्रवादाचा प्रचार करतो. मेलोनी आता अनेक वर्षांपासून मुसोलिनींचे नावही घेत नाहीत. त्या युरोपियन सं‌घाच्या वर्चस्वाला आव्हान देतील. लोकसंख्या वाढवणे व कर कमी करण्यासाठी अनेक पावले उचलतील.

जवळपास हीच स्थिती फ्रान्समध्येही आहे. तिथे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन आहेत, पण त्यांना मरीन ली पेन यांनी कडवी झुंज दिली आहे. २०२२ च्या निवडणुकीत त्यांना ४१ टक्के मते मिळाली. त्या कट्टर राष्ट्रवादी आहेत. त्या युरोपियन संघाचा हस्तक्षेप कमी करू इच्छितात. जागतिकीकरण आणि अमेरिकन वर्चस्वाच्याही विरोधक आहेत. त्यांनी युक्रेनवरील रशियन हल्ल्याला विरोध केला आहे, पण त्या रशियासोबत फ्रान्सचे संबंध सुधारण्याच्या बाजूने आहेत. तसेच फ्रान्सला मुस्लिम प्रभावापासून मुक्त करू इच्छितात. त्या ‘नाटो’च्या लष्करी तावडीतूनही फ्रान्सला बाहेर काढू इच्छितात.

अशाच प्रकारे स्वीडनमध्ये गेल्या महिन्यात झालेल्या निवडणुकीत ‘ब्ल्यू ब्लॉक’ पक्षाला २० टक्क्यांपेक्षा अधिक मते मिळाली. या पक्षाचे नेते स्वत:ला लोकशाहीवादी म्हणवतात, पण ते मूलत: ‘नवे नाझी’ आहेत. तेदेखील ज्यू-मुस्लिमांचे विरोधक आहेत. बाहेरील लोकांनी स्वीडनमध्ये स्थायिक होऊ नये असे त्यांना वाटते. स्वीडनच्या नव्या आघाडी सरकारमध्ये परस्परविरोधी विचारसरणीचे पक्ष आहेत. त्यामुळे तिथे कट्टरवादाची उत्पत्ती होईल, असे वाटत नाही. मात्र, स्वीडिश राजकारणात कट्टर राष्ट्रवाद्यांचा प्रभाव वाढत चालला आहे. पूर्व युरोपातील अनेक देश अनेक दशके सोव्हिएत संघाच्या प्रभावाखाली होते. मात्र, आता तिथे उजवे आणि राष्ट्रवादी सरकारे आहेत. हंगेरीत कट्टर उजवा पक्ष ‘फिडेज’चे नेते व्हिक्टर ओरबन पाचव्यांदा पंतप्रधान झाले. ओरबन यांना लोक हुकूमशहा आणि भांडवलशहा मानतात. अशाच प्रकारे पोलंडमध्ये राष्ट्रपती आंद्रेजेज डूडा यांचे सरकार दंडुक्याच्या बळावर चालणारे म्हटले जाते. सर्बियामध्येही अलेक्झांडर वुचिक यांची निरंकुश सत्ता आहे. उत्तर आयर्लंड आणि ब्रिटनमध्ये तणाव वाढत आहे. उत्तर आयर्लंडचा कट्टर राष्ट्रवादी पक्ष ‘सिन फीन’लाही यंदा संसदेत खपू जागा मिळाल्या. त्यांनी उत्तर आयर्लंडची ब्रिटनच्या तावडीतून सुटका करण्याचा निर्धार केला आहे. फिनलंड, एस्टोनियातही उजवे पक्ष निरंतर आघाडी घेत आहेत. जर्मनीही स्थलांतरितांमुळे खूप त्रस्त आहे. तसेही जर्मनीचे लोक हिटलरी धोरणांचे समर्थन करत नाहीत, पण तिथेही कट्टर राष्ट्रवाद्यांना १२ ते १५ टक्के मते मिळत आहेत.

लोकशाहीच्या या बालेकिल्ल्यांमध्ये हुकूमशाही प्रवृत्ती का उदयास येत आहेत? एके दिवशी त्या जगाला तिसऱ्या महायुद्धात झोकू शकतील अशा कोणत्याच धोक्याची शक्यता मला तरी दिसत नाही. तथापि, वाढते आर्थिक संकट व सामाजिक तणावामुळे काही कट्टरवादी घटकांना युरोपात महत्त्व दिले जात आहे. मात्र, आता फॅसिझम व नाझीवादाचे दिवस गेले. त्यांना कुठेच पूर्ण बहुमत मिळत नाही. अमेरिकन वर्चस्व, नाटोचा फास ही राष्ट्रे सैल करू इच्छितात, पण लोकशाहीची नितांत गरज असावी, असेही त्यांना वाटते. कट्टरवादी लोकही सत्ताधारी होताच आपला रंग बदलायला लागतात. जसे इटलीमध्ये होत आहे. (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत) डॉ. वेदप्रताप वैदिक भारतीय परराष्ट्र धोरण परिषदेचेे अध्यक्ष dr.vaidik@gmail.com

बातम्या आणखी आहेत...